Google ची व्हिडिओ सेवा पुरवणारे लोकप्रिय अॅप YouTube ला अमेरिकेच्या फेडरल ट्रेड कमिशनने 170 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 1227 कोटी रुपये दंड ठोठावला आहे. बेकायदेशीरपणे लहान मुलांच्या गोपनीयतेचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा दंड ठोठावण्यात आला आहे. लहान मुलांची खासगी माहिती त्यांच्या पालकांची परवानगी न घेता चोरल्याचा आणि ही माहिती स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी थर्ड पार्टीला विकल्याचा आरोप YouTube वर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

13 वर्षांपेक्षा लहान मुलांचा डेटा गोळा करण्याला लगाम लागावा यासाठी अमेरिकेमध्ये वर्ष 1998 मध्ये एक कायदा बनवण्यात आला होता. हा कायदा अस्तित्त्वात आल्यापासून एखाद्या कंपनीला फेडरल ट्रेड कमिशन आणि न्यू-यॉर्क अॅटॉर्नी जनरल ऑफिसद्वारे आकारण्यात आलेली ही सर्वाधिक दंडाची रक्कम आहे. वर्ष 2013 मध्ये हा कायदा दुरूस्त करुन यामध्ये कूकीजचा देखील समावेश करण्यात आला होता. या कूकीजद्वारे इंटरनेटवर कोणत्याप्रकारचा कंटेंट अधिक पाहिला जातो याचा अंदाज येतो. गुगलकडून दंडाच्या रक्कमेपैकी 136 मिलियन डॉलर ‘एफटीसी’ला आणि न्यू-यॉर्क अॅटॉर्नी जनरलला 34 मिलियन डॉलर दिले जातील.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youtube 170m fine for collecting childrens personal data sas
First published on: 05-09-2019 at 13:27 IST