प्रसिद्ध युट्यूबर कॅरी मिनाटी (Carry Minati)याच्या Youtube चॅनेलला हॅकर्सनी लक्ष्य केलं आहे. स्वतः कॅरी मिनाटीने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन याबाबत माहिती दिली. क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनसाठी कॅरीच्या चॅनेलला हॅक करण्यात आल्याची माहिती आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कॅरी मिनाटी यूट्यूबवर गेमिंग चॅनेल CarryisLive चालवतो. या चॅनेलवर तो गेमिंगशी संबंधित व्हिडिओ शेअर करत असतो. याच चॅनेलला हॅकर्सनी लक्ष्य केलं होतं. CarryisLive या गेमिंग चॅनेलव्यतिरिक्त अजय नागर उर्फ कॅरी मिनाटीचं ‘CarryMinati’ या नावाने युट्यूबवर मुख्य चॅनेल आहे. दोन महिन्यांपू्र्वी सोशल मीडियावर टिकटॉक विरुद्ध युट्यूब अशी लढाई सुरू होती. त्यात टिकटॉकवर टीका करणाऱ्यांमध्ये कॅरी मिनाटी आघाडीवर होता. टिकटॉक वापरणाऱ्यांची खिल्ली उडवणारा त्याचा एक व्हिडिओ युट्यूबवर तुफान व्हायरल झाला होता, पण नंतर पॉलिसीचं उल्लंघन केल्याचं सांगत युट्यूबने तो व्हिडिओ आपल्या प्लॅटफॉर्मवरुन हटवला होता. त्यावेळी कॅरी मिनाटी सर्वाधिक चर्चेत आला होता.


दरम्यान, हॅकर्सनी कॅरीच्या CarryisLive चॅनेलचं डिस्क्रिप्शन बदलून बिटकॉइनच्या डोनेशनची मागणी केली होती. याशिवाय डोनेशनसाठी काही व्हिडिओ शेअर करण्यात आले होते. हॅकर्सनी बिहार पूरसंकटाचा कॅरी मिनाटीचा जुना व्हिडिओ शेअर करुनही बिटकॉइनच्या डोनेशनची मागणी केली होती. त्यानंतर लगेचच कॅरी मिनाटीने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन याबाबत युट्यूबकडे तक्रार केली. आता त्याचं युट्यूब अकाउंट पूर्ववत झाल्याचं समजतंय.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youtuber carryminatis channel hacked hackers ask for bitcoin donations sas
First published on: 27-07-2020 at 11:57 IST