Jaswandi Marathi Gardening Tips: प्रत्येक संकष्टीला गणपती बाप्पाला आपल्या घरचं जास्वंद वाहावं अशी तुमचीही इच्छा होते का? पुढच्या संकष्टीपर्यंत तुमची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आजची ही गार्डनिंग टीप नक्की मदत करू शकते. आपल्या घरच्या लहानश्या कुंडीत आपण जास्वंदीचं रोप लावून त्याला फुलांनी भरून टाकू शकता. यासाठी आपल्याला नवा एकही रुपया खर्च करण्याची गरज लागणार नाही. उलट फेकून वाया जाणाऱ्या गोष्टी वापरून तुम्ही हा जुगाड करू शकाल. आता हा जुगाड काय आहे, जास्वंदाच्या रोपाला आपल्याला नेमकं कोणतं खत, किती प्रमाणात घालायचं हे सगळं आपण सविस्तर पाहूया.

SP गार्डनिंग मराठी या युट्युब चॅनेलवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये जास्वंदाच्या रोपासाठी डाळ तांदूळ धुवून झाल्यावर फेकून द्यायचं पाणी कसं वापरायचं हे दाखवण्यात आलं आहे. या व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे, डाळ व तांदूळ धुतलेल्या पाण्यात अनेक सूक्ष्म पोषकसत्व असतात. हे पाणी रोपाला देण्याचा फायदा असा की, उन्हाळ्यात अनेकदा रोपाला लागलेल्या कळ्या सुद्धा तीव्र सूर्य किरणांमुळे पिवळ्या पडतात, म्हणजेच सुकून गळून जातात. हे टाळण्यासाठी डाळ तांदळाच्या पाण्याचा फायदा होऊ शकतो. आपल्या या जुगाडाला फुल्ल प्रूफ करण्यासाठी आपल्याला याच पाण्यात आणखी एक गोष्ट मिसळायची आहे, ती म्हणजे दही.

डाळ तांदळाच्या पाण्यात आपल्याला दही घालायचे आहे. थोडं आंबट आणि जुनं दही असावं, एक लिटर डाळ तांदळाच्या पाण्यात एक मध्यम आकाराच्या चमच्याइतकं दही मिसळावं. महिन्यातून एकदा नायट्रोजन युक्त खत रोपाला दिल्याने फांद्या भक्कम होण्यासाठी फायदा होतो.

Video: जास्वंदाच्या रोपासाठी जुगाड

हे ही वाचा<< महिन्यातून एकदा तुरटी वापरल्यास गुलाब, जास्वंद, मोगऱ्याच्या रोपांना येतील भरपूर कळ्या; प्रमाण व पद्धत बघा, (Video)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जास्वंदाच्या रोपाची काळजी कशी घ्यावी?

दरम्यान जास्वंदाच्या रोपाची निगा राखणे सुद्धा खूप गरजेचे आहे. पानांना बुरशी लागणे, कळ्यांना कीड लागणे हे टाळण्यासाठी अधून मधून जास्वंदाच्या रोपावर कडुलिंबाच्या तेलाचा स्प्रे करावा. माती १५ दिवसातून एकदा हलवून वर खाली करावी, ज्यामुळे माती भुसभुशीत होते. सुरुवातीची दीड ते दोन इंच माती सुकल्यावर मग पाणी घालावं पाणी घालण्याआधी माती भुसभुशीत करून घ्यावी. तसेच महिन्यातून एकदा नायट्रोजन युक्त खत रोपाला द्यावे, गांडूळ खताचा पर्याय सर्वोत्तम ठरतो. १० ते १२ इंचांची कुंडी असेल तर दोन मुठी गांडूळ खात पुरते.