मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून ११५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
हाफिज सईदची अटक हा धोरणात्मक निर्णय; पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते आसिफ गफूर
मनोहर पर्रिकर भ्रष्टाचाऱ्यांचे नेते – संजय राऊत
गोव्यातील भाजपचे सर्व नेते भ्रष्टाचारी आहेत- संजय राऊत
पुणे: कॅम्प परिसरात वडिलांसोबत पदपथावरून पायी निघालेल्या तरुणीचा विनयभंग, संशयित आरोपी अनिलकुमार शेट्टीला लष्कर पोलिसांकडून अटक
पश्चिम रेल्वेच्या दोन लाचखोर वरिष्ठ अभियंत्यांना सीबीआयकडून अटक: टीव्ही रिपोर्ट
२६/११ सारखी रात्र पुन्हा येऊ नये, आम्ही सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला, पण आमच्या सहका-यांनी जीव गमावल्याचे दुःख – राकेश मारिया
नागपूरमध्ये गाडीची दुचाकीला धडक, बाईकवरील तरुणीचा मृत्यू
औरंगाबाद: मराठा समाजाच्या चक्का जाम आंदोलनाला हिंसक वळण; पोलिसांचा लाठीमार
Congress President Sonia Gandhi to not campaign in any of the five poll bound states, say sources.
— ANI (@ANI_news) January 31, 2017
पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत सोनिया गांधी प्रचार करणार नाही, सूत्रांची माहिती
#BudgetSession 2017 I आर्थिक सर्वेक्षण संसदेत सादर; मालमत्तांचा दर घटण्याचा अंदाज https://t.co/Hdf7dls4n3 #Parliament pic.twitter.com/TwFe4nhDV1
— LoksattaLive (@LoksattaLive) January 31, 2017
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला
न्हावाशेवा येथे २.२ कोटी रुपये किंमतीचे गुडंग गरम सिगारेटचे १५४ बॉक्स डीआरआयकडून जप्त, चौकशी सुरू
दहिसर टोलनाक्याजवळ चक्काजाममुळे १ ते २ किमी रांगा
पुणे: राम गणेश गडकरी यांचा पुतळा मनोहर मंगल कार्यालयात (मेंहेदळे गॅरेज) येथे आणला. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित.
मराठा आरक्षणावर २७ फेब्रुवारीला सुनावणी, मुंबई उच्च न्यायालयाकडून तारीख निश्चित
आत्तापर्यंत २६ कोटीहून अधिक जनधन खाती उघडण्यात आली – मुखर्जी
तीन कोटी किसान क्रेडीट कार्डचे लवकरच रुपे डिबेट कार्ड्समध्ये रुपांतर केले जाईल – मुखर्जी
गोरगरीबांचे जीवनमान सुधारण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना राबवल्या – मुखर्जी
आत्तापर्यंत २६ कोटीहून अधिक जनधन खाती उघडण्यात आली – मुखर्जी
राम गणेश गडकरी पुतळा प्रकरण; पुण्यातील संभाजी उद्यानाजवळ पोलीस बंदोबस्तात वाढ
मनसेला शिवसेनेसोबत युती करायची असल्यास त्यांनी मुंबई महापालिका निवडणूक लढवू नये – शिवसेना
दादर येथे चित्रा सिनेमा परिसरात होणार चक्काजाम आंदोलन
सीमा सुरक्षा दलाने पंजाबमधील टोटा सीमारेषेजवळ पाकिस्तानमधून आलेल्या दोन बोटी जप्त केल्या.
ओव्हरलोडमुळे देहूरोड येथे मालगाडी जागेवरच थांबली, मुंबई-पुणे रेल्वे वाहतुकीवर परिणाम
पंजाबमधील लुधियानामध्ये एका कारमधून ७५ लाख रुपयांची रोकड जप्त
पुणे- वाढीव सेवाशूल्कविरोधात प्रवासी मालवाहतूकदारांकडून चक्काजाम
गुजरातमधील दहेज भागात स्टर्लिंग कंपनीमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल
पुण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी होणार नाही, सूत्रांची माहिती, दोन्ही पक्षांकडून लवकरच होणार अधिकृत घोषणा
बसच्या संपामुळे, विद्यार्थ्यांचे हाल, पालकांना घेऊन जावे लागले मुलांना शाळेत
सकल मराठा मोर्चातर्फे आज राज्यभर ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन
चिंचवडजवळ रेल्वे रूळाला तडे गेल्याने मुंबईच्या दिशेने येणाऱ्या सर्व एक्स्प्रेस खोळंबल्या
भाजप-शिवसेना निवडणुकीनंतर एकत्र येतील – चंद्रकांत पाटील
पुणे पालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी नाही
भानुशाली यांचा सोमवारी संध्याकाळी भाजपमधून शिवसेनेत प्रवेश, निवडणुकीचं तिकीट नक्की झाल्याने शिवसैनिक नाराज
मुंबईः घाटकोपरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ, मंगल भानुशालींच्या गाडीची कार्यकर्त्यांनी केली तोडफोड.
मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; उमेदवारांची यादी अंतिम होण्याची शक्यता
हाफिज सईद पाकिस्तानमध्ये नजरकैदेत; पाकिस्तानी प्रसारमाध्यमांची माहिती
पुण्यातील मनसेचे गटनेते रवींद्र धंगेकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
टाकी साफ करण्यासाठी आतमध्ये उतरलेले कर्मचारी विषारी वायूने बेशुद्ध
लातूर: एमआयडीसीमध्ये तेल कंपनीत अपघात; विषारी वायूची गळती
कोल्हापुरातील ४५ हजार शेतकऱ्यांचे ११२ कोटींचे पीककर्ज माफ
मनसे युतीसाठी तयार आहे- बाळा नांदगावकर
बाळा नांदगावकर यांची लाईव्ह पत्रकारपरिषद
मोदी खूप बोलतात, चांगले बोलतात, फक्त कोणाचेही ऐकत नाहीत- राहुल गांधी
एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा १ फेब्रुवारीपासून हटवणार, रिझर्व्ह बँकेची घोषणा
एटीएममधून पैसे काढण्यावर असलेली मर्यादा १ फेब्रुवारीपासून हटवली जाणारः RBI
खंडाळा स्टेशनजवळील बोगद्याजवळ मोठा दगड कोसळला; एका रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू
भाजपने विजय मल्ल्यासंदर्भात केलेल्या आरोपांना काँग्रेसकडून उत्तर दिले जाण्याची शक्यता
भारतीय अर्थव्यवस्था वाईट अवस्थेत आहे- पी. चिदंबरम
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पी. चिदंबरम यांची दिल्लीत पत्रकार परिषद
खंडाळा स्टेशनजवळ बोगद्यात दगड पडून अपघात; एका रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू
बीसीसीआयच्या अध्यक्षपदी कॅगचे माजी महालेखापरिक्षक विनोद राय यांची नियुक्ती, रामचंद्र गुहा, विक्रम लिमये प्रशासकीय समितीवर
युतीसाठी अद्याप कुणाचा प्रस्ताव नाही-उद्धव ठाकरे
अमूल्य पटनाईक दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त
ना कमळ, ना हत्ती.. कोणीही सायकलचा सामना करू शकत नाही- अखिलेश यादव
शिवसेनेला सर्व ठिकाणी पारदर्शकता हवी, अनिल परब यांचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर
संघाची बदनामी केल्याप्रकरणी राहुल गांधी भिवंडीतील न्यायालयात हजर
पुणे: सातारा रोडवर मोठा अपघात, चव्हाणनगर कमानीजवळ पीएमपी आणि दुचाकीचा अपघात, चार जण जखमी
नाशिक येथे पंचवटी, भद्रकाली भागात अज्ञातांकडून दुचाकी, रिक्षांची जाळपोळ
उत्तरप्रदेशमध्ये बस आणि ट्रकचा अपघात, ६ प्रवाशांचा मृत्यू, २७ जण जखमी, १० जणांची प्रकृती गंभीर
दिल्लीतील राजघाट येथे राष्ट्रपती प्रणव मुखर्जींकडून महात्मा गांधींना त्यांच्या ६९ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
जम्मू काश्मीरमधील शोपिअन जिल्ह्यात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
लालबाग फ्लायओव्हरला भेग पडल्याने दोन्ही बाजूची वाहतूक बंद
मिस फ्रान्स इरीस मिटेनिअरेने पटकावला मिस युनिव्हर्सचा किताब
केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी साडे अकरा वाजता दिल्लीत सर्वपक्षीय बैठक
पुण्यातील इन्फोसिसमधील तरुणीच्या हत्येप्रकरणी संशयित सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेतले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानी नागरिकांवर अमेरिकेत बंदी घातल्यास आम्हाला फायदाच – इम्रान खान
भविष्यात पाकिस्तानी नागरिकांनाही अमेरिकेत प्रवेशबंदी, व्हाईट हाऊसने दिले संकेत
बिग बॉस मनवीर गुर्जर; मनवीर गुर्जरने ‘बिग बॉस रिआलिटी शो’च्या १०व्या पर्वावर आपले नाव कोरले.
सध्याच्या भाजपमुळे फडणवीस गुंडांचे मुख्यमंत्री वाटतात- उद्धव ठाकरे
पुण्याजवळील हिंजवळी येथील आयटी पार्कमधील इंजिनीयर तरुणीचा खून; हिंजवडी पोलीस घटनास्थळी
दुसऱ्या ट्वेंटी २० सामन्यात भारताचा इंग्लंडवर ५ धावांनी सनसनाटी विजय
मी काँग्रेससोबतच्या आघाडीविरोधात, प्रचाराला जाणार नाही- मुलायम सिंह यादव
नाशिक: भाजप नगरसेविका ज्योती गांगुर्डे मनसेमध्ये; राज ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
अहमदनगरमधील पांढरी पूलावर अपघात, टेम्पो-दुचाकीच्या धडकेत तिघांचा मृत्यू
मनसे नेते बाळा नांदगावकर मातोश्रीवर; युतीसाठी इच्छुक असल्याचा राज ठाकरेंचा निरोप
परभणीत पोलिसाकडून सात जणांवर चाकूने वार; २ महिला आणि पुरुषांवर वार
मोदीजी लोकांचं ऐकत नाहीत, फक्त आपल्या मनातलं लोकांना सांगतात- राहुल गांधी
ऑस्ट्रेलियन ओपन: पुरुषांच्या एकेरीत रॉजर फेडररचा राफेल नदालवर विजय
पश्चिम बंगालमध्ये तीन कारखान्यांना भीषण आग
तिन्ही दलाच्या बँड पथकाकडून सादरीकरण
प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याची सांगता
नवी दिल्लीत बीटिंग रिट्रीटचा सोहळा सुरू
गोवा विधानसभा निवडणूक: मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याकडून भाजपचा जाहीरनामा प्रकाशित; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती
खासदार नानासाहेब पटोले यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे नागपूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पटोले यांची प्रकृती स्थिर
मुंबई: काँग्रेसच्या वकारुन्निसा अन्सारी एमआयएममध्ये; काँग्रेसची गळती सुरूच
सोलापूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, सात विद्यमान नगरसेवकांचा पक्षाला रामराम
छत्तीसगडमधील दंतेवाडामध्ये पोलीस चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठा जप्त
लक्ष्मीदर्शनाचे विधान भोवले, अरविंद केजरीवाल यांच्यावर निवडणूक आयोग नाराज, आयोगाने दिले कारवाईचे संकेत
विदर्भच्या १६ वर्षांखालील क्रिकेट संघाने विजय मर्चंट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले, बीसीसीआयच्या स्पर्धेत विदर्भला पहिल्यांदाच विजेतेपद
भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाचे फिटनेस ट्रेनर राजेश सावंत यांचा संशयास्पद मृत्यू, दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये आढळला मृतदेह
ऑस्ट्रेलियन ओपन: मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीमध्ये सानिया मिर्झाचा पराभव
जयपूर आग्रा महामार्गावर धूक्यामुळे अपघात, ३० वाहनांची एकमेकांना धडक, १५ जण जखमी
सचिन तेंडुलकरच्या यशोगाथेकडे बघा, त्याने नेहमी स्वतःलाच आव्हान दिले आणि यातून तो विक्रमांचे नवनवीन शिखर गाठू लागला – मोदी
परीक्षकडे दबावाच्या दृष्टीकोनातून बघू नका, परीक्षेचा कालावधी हा उत्सवासारखा साजरा केला पाहिजे – मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ला सुरुवात
मुंबई: मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भाजप आमदार आणि नेत्यांची बैठक सुरु, उमेदवारांच्या यादीसंदर्भात करणार चर्चा
मलेशियामध्ये २८ पर्यटकांना घेऊन निघालेली बोट बेपत्ता, बोटमधील सर्वप्रवासी चीनचे नागरिक
राहुल गांधी घाबरले आहेत, आधीप्रमाणेच यंदाही राहुल गांधी यांचा पंजाबमध्ये पराभव करणार – सुखबिरसिंग बादल
ट्रम्प यांच्या निर्णयाला अंशतः स्थगिती, अमेरिकेतील न्यायालयाने विमानतळावर अडकलेल्या निर्वासितांना अमेरिकेत प्रवेश देण्यास मंजूरी दिली.
जाट आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हरयाणामधील अतिसंवेदनशील भागात जमावबंदी लागू
हरयाणामध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी जाट समाजाचे आंदोलन, राज्यभरात बंदोबस्तात वाढ, निमलष्करी दलाचे पथक तैनात
अखिलेश यादव आणि राहुल गांधी आज दुपारी संयुक्त पत्रकार परिषद घेणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी ११ वाजता ‘मन की बात’द्वारे देशवासीयांशी संवाद साधणार.
मुस्लीम निर्वासितांना अमेरिकेत प्रवेशबंदी, विमानतळावबाहेर ट्रम्प यांच्या निर्णयाविरोधात आंदोलन
३१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये १८ हजार स्पर्धक सहभागी झाले असून १२० परदेशी धावपटूही मॅरेथॉनमध्ये धावत आहेत.
पुणे मॅरेथॉनला सुरुवात, फुल मॅरेथॉनमध्ये ३० धावपटूंचा सहभाग
दाढीवाल्या बुवाला घाबरू नका! ठाण्यात विजय संकल्प मेळाव्यात भाजप नेत्यांचे टीकास्त्र
शिवसेना नव्हे.. २५ वर्षांत मुंबई सडली! मुख्यमंत्र्यांचा घणाघात; भाजपची ‘औकात’ दाखविण्याचा निर्धार
संजय लीला भन्साळींना झालेल्या धक्काबुकी प्रकरणी कठोर कारवाई करा; व्यंकय्या नायडूंच्या वसुंधराराजे यांना सूचना
शिवसेना दुटप्पी, धर्मयुद्ध होऊनच जाऊ द्या- मुख्यमंत्री
मराठी माणसाच्यामागे भाजप राहिला. मराठी-अमराठी भेद करायचा नाही- मुख्यमंत्री
कोस्टल रोड प्रकल्पामुळे कोळीवाड्यांना त्रास होणार नाही. त्यांचे पुनर्वसन सरकार करणार- मुख्यमंत्री
मुंबई मराठा माणसांची; मुंबईतून मराठी माणसाला कोणीही बाहेर काढू शकत नाही- मुख्यमंत्री
कोस्टल रोडबद्दल शिवसेनेची भूमिका दुटप्पी- मुख्यमंत्री
महानगरपालिकेत सत्ता आल्यावर गरिबांसाठी, मध्यमवर्गीयांसाठी काम करणार- मुख्यमंत्री
मुंबई-नवी मुंबई सागरी सेतूने जोडणार- मुख्यमंत्री
गेल्या २ वर्षांमध्ये सगळ्या सिग्नलवर सीसीटीव्ही- मुख्यमंत्री
जे सोबत येतील त्यांच्यासोबत किंवा त्यांच्याशिवाय परिवर्तन अटळ- मुख्यमंत्री
आम्ही करुन दाखवलो म्हणणारे नाहीत, आम्हाला जनताच सांगते तुम्ही करुन दाखवलं- मुख्यमंत्री
भाजपची औकात २१ फेब्रुवारीला दाखवू- मुख्यमंत्री
जनतेचा कौल पारदर्शी कारभाराला- मुख्यमंत्री
शिवसेना वैचारिक शत्रू नाही, मात्र भ्रष्टाचाराला विरोध आहे- मुख्यमंत्री
कोणासोबतही फरफटत जाऊ नका, हा धडा आम्हाला २५ वर्षांच्या युतीने दिला- मुख्यमंत्री
२५ वर्षे आमच्यामुळे तुमचा महापौर झाला- मुख्यमंत्री
मी पारदर्शकतेवर बोललो, ही माझी चूक आहे- मुख्यमंत्री
तुमच्यामुळे मुंबईचे नुकसान झाले- मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांकडून संजय राऊत यांना शकुनी मामाची उपमा
आजही शकुनी मामाच्या रुपात अनेकजण पाहायला मिळतात- मुख्यमंत्री
ताकद वाढली तरी ६० जागांचा प्रस्ताव दिलात, तेव्हाच समजलं तुम्हाला युती नकोय- मुख्यमंत्री
तुमच्या विचारांशी फारकत नाही, तुमच्या आचाराशी फारकत आहे- मुख्यमंत्री
युती तुटल्यामुळेच मुख्यमंत्री झालो- मुख्यमंत्री
विधानसभेवेळी युती तुटल्याने आम्हाला आमची ताकद समजली- फडणवीस
आम्ही विधानसभेवेळी कमीपणा घेतला होता, मात्र शिवसेनेने युती तोडली- फडणवीस
विधानसभेवेळी आम्ही १४७ जागा द्यायला तयार होतो, मात्र शिवसेनेने १५१ जागांचा हट्ट धरला- फडणवीस
आम्ही जुगलबंदी करणारे नाही, आम्ही नोटाबंदी करणारे लोक आहोत- फडणवीस
१९९३ची दंगल आठवणारे १९९५नंतरचा काळ विसरतात- शेलार
दुसऱ्याचा खून पाडून पक्ष मोठा करणे, ही आमची संस्कृती नाही- शेलार
भाजप हा विचारांचा पक्ष- आशिष शेलार
जेव्हा अहंकार माजला, तेव्हा त्याचा पराभव झाला- आशिष शेलार
हम किसी को छेडेंगे नहीं, किसीने छेडा तो छोडेंगे नहीं- आशिष शेलार
गोव्यात भाजपने पर्यटनाला चालना दिली- पंतप्रधान मोदी
७० वर्षांमध्ये त्यांनी जमा केलेले बाहेर काढतो आहे, म्हणून त्यांना त्रास होतो आहे- पंतप्रधान मोदी
गोव्याला स्थिर सरकार द्या; भाजपला बहुमत द्या- पंतप्रधान मोदी
गोव्याने देशाला पर्रिकरांच्या रुपात संरक्षणमंत्री दिला आहे, सर्जिकल स्ट्राइकची चर्चा संपूर्ण देशात आहे- पंतप्रधान मोदी
ज्यांचा निवडणूक आयोगावर विश्वास नाही, ते निवडणुकीच्या रणांगणात का उतरले आहेत ?- पंतप्रधान मोदी
पंजाब, गोव्यात एकाचवेळी निवडणूक व्हावी, यासाठी पंतप्रधान कार्यालयाने दबाव आणला असे काहींना वाटते- पंतप्रधान मोदी
इतर पक्षांना ते पराभूत होणार आहेत, याची कल्पना आहे- पंतप्रधान मोदी
लोकशाहीच्या पाकिटमारांना कोणाचेही भले पाहावत नाही- पंतप्रधान मोदी
गोव्याने काँग्रेसचे कुशासन पाहिले आहे- पंतप्रधान मोदी
ऑनलाइन व्हिसा, अरायव्हल व्हिसाचा फायदा गोव्याला होणार- पंतप्रधान मोदी
तुम्ही भाजपला पूर्ण बहुमत द्या, गोवा देशातील सर्वोत्तम राज्य होईल- पंतप्रधान मोदी
जळगावच्या नायब तहसीलदारांना चोरट्यांनी लुटले
रायगड: नेरळ येथे खदानीत बुडून दोन मुलींचा मृत्यू
ऑस्ट्रेलियन ओपन: सेरेना विल्यम्सने पटकावले २३ वे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद
ऑस्ट्रेलियन ओपन: महिलांच्या अंतिम फेरीत सेरेना विल्यम्सचा व्हिनस विल्यम्सवर ६-४,६-४ असा विजय
२९ जानेवारीला पंतप्रधान मोदींनी मन की बात करण्यास निवडणूक आयोगाची हरकत नाही- सूत्र
पुण्यात ‘हे राम… नथुराम’ नाटकाच्या प्रयोगाला विरोध; काँग्रेस, राष्ट्रवादी आणि संभाजी ब्रिगेडची अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाबाहेर घोषणाबाजी
मनसेकडून युतीबाबत प्रस्ताव आला असेल तर काही माहीत नाही, मनसेच्या प्रस्तावाबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील- संजय राऊत
कारने धडक दिल्यानंतर दुचाकीवरील तिघांचा मृत्यू
पुणे-सोलापूर मार्गावर अपघात; तिघांचा मृत्यू
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला तिसरा क्रमांक
शीना बोरा हत्याप्रकरण: पीटर मुखर्जी निर्दोष असल्याचा मुलाचा दावा
उद्धव ठाकरेंचे भाषणा आक्रमक पण शक्तीहीन; नागपूर तरूण भारतमधून टीका
शिवसेनेशी युती तुटल्यानंतर आता भाजपकडून अन्य मित्रपक्षांशी वाटाघाटींना सुरूवात
ताज्या बातम्या, घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकसत्ता अॅप अपडेट करून घ्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गोरेगाव येथे आज भाजपचा विजयी संकल्प मेळावा.
आज रात्री ११.४० ते उद्या पहाटे ५.५० वाजेपर्यंत ब्लॉक
मध्य रेल्वेमार्गावरील भायखाळा येथे पुलाचे काम सुरू
आज सँडहर्स्ट रोड ते करीरोड स्थानकादरम्यान विशेष ब्लॉक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पणजीत जाहीर सभा
नालंदा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॅा. विजय भटकर यांची नियुक्ती
मुंबई ते श्रीनगर विमानप्रवास न्यूयॉर्कपेक्षा महाग
राष्ट्रवादीच्या गडाला सुरुंग लावण्याचे भाजपचे प्रयत्न ; धैर्यशील मोहिते विरुद्ध संजय शिंदे
शिवसेना, भाजपची समाजमाध्यमांतून एकमेकांवर आगपाखड; डिजिटल तंत्रात भाजपची आघाडी
धमक असेल तर शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडावे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचे शिवसेनेला आव्हान
संजय लीला भन्साली यांच्यावर झालेला हल्ला निंदनीय – मधूर भंडारकर
डॉ. विजय भाटकर यांची नालंदा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती
बंगळुरुमध्ये बाईकवरुन गॅस सिलिंडर नेताना स्फोट, चार जण जखमी
पुणे रेल्वे पोलिसांनी जप्त केले अडीच कोटी रुपयांचे दागिने
भाजप आणि शिवसेनेची युती हवी होती, शिवसेनेचे विधान दुर्भाग्यपूर्ण, युतीचा फायदा दोन्ही पक्षांना – नितीन गडकरी
नवजोतसिंग सिद्धू यांच्याविरोधात अमृतसरमध्ये गुन्हा दाखल, शीख समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने फसवणूक करणा-या दोन भामट्यांना सीबीआयने केली अटक
जम्मू काश्मीरमधील अरु भागात भूस्खलन, अद्याप जीवितहानीचे वृत्त नाही
डोंबिवली एमआयडीसी कार्यालयात अधिका-यांना मारहाण केल्याप्रकरणी उल्हासनगर शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांना अटक
जयपूरमध्ये पद्मावती चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान राजपूत कर्णी सेनेचा हंगामा, संजय लीला भन्साली यांना धक्काबुक्की
स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूच्या जामीन अर्जावर ३० जानेवारीला सुनावणी
मुंबईतील लोअर परळ भागात राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपूट तानुक धाराने राहत्या घरी आत्महत्या केली – टीव्ही रिपोर्ट्स
कोलकाता विमानतळावरुन एका प्रवाशाला अटक, ७७ लाख रुपयांचे परकीय चलन आढळले
पुणे: कर्वेनगरमधील गोसावी वस्तीत शंतनु पुजारी (वय १९) याचा महापालिकेच्या वाहनाच्या धडकेत मृत्यू, पोलीस घटनास्थळी दाखल
पंजाबमधील जालंधरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला सुरुवात.
केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर ३१ जानेवारीरोजी दिल्लीत एनडीएतील घटक पक्षांची बैठक
पाच लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांकडून कर आकारणी नको; शिवसेना खासदारांचे अर्थमंत्री अरुण जेटली यांना पत्र
अहमदनगर- माजी आमदार शंकरराव गडाख यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी, तालुका विकास आघाडीची स्थापना
शिवसेनेचे मंत्री, आमदार सजग असते तर पक्षप्रमुखांना योग्य माहिती दिली असती-विनोद तावडे
डेस्क ऑफिसरने उपसचिवांची मान्यता न घेता पाठवले पत्र- विनोद तावडे
सरकारी कार्यालयातून देवदेवतांचे फोटो काढण्याचा अध्यादेश नव्हता- सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे
राजीनामा खिशातच ठेवला आहे. ज्यावेळी उद्धव ठाकरे आदेश देतील, तेव्हा राजीनामा देऊ- रामदास कदम
जम्मू काश्मीर: हिमस्खलनात मृत्यूमुखी पडलेल्या जवानांचा आकडा १४ वर; चार मृतदेह सापडले
ऑस्ट्रेलियन ओपन: सानिया मिर्झा-आयवन डोडिग मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक
केंद्रीय अर्थसंकल्प निवडणुकीनंतर जाहीर करण्याच्या मागणीसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे पंतप्रधान मोदींना पत्र
मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीवर शिवसेना खासदारांचा बहिष्कार
अर्थसंकल्पाच्या बैठकीवर शिवसेना खासदारांचा बहिष्कार
कोणीही रस्त्यावरुन प्रश्न विचारणार का? लोकांनी त्यांच्या मर्यादेत राहावे; किरीट सोमय्या यांच्या मुंबई महापालिकेती भ्रष्टाचाराच्या आरोपांना संजय राऊत यांचे प्रत्युत्तर
राज्य सरकार अस्थिर करायचे नाही, म्हणून सत्तेत आहोत- शिवसेना खासदार संजय राऊत
तिरूअनंतपूरम विमानतळावर रशियन नागरिकाचा मृतदेह आढळला.
शिवसेनेचे मंत्री १० वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार; धार्मिक फोटोबद्दल सरकारने काढलेले परिपत्रक मागे घेण्यासाठी भेट
युती तुटल्याचे नाटक नको, सेनेच्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत: जितेंद्र आव्हाड
पुण्यात विश्वजित कदमांच्या निवासस्थानी काँग्रेस नेत्यांची बैठक
शिवसेना-भाजपा युती तुटल्याचे अतीव दुःख: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे वक्तव्य
युती तुटल्याचा शिवसैनिकांकडून जल्लोष; घाटकोपर, कांदिवली चारकोपमधील शिवसेना शाखेसमोर फटाके फोडून आनंद व्यक्त केला
मुंबईत परिवर्तन होणारच; मुख्यमंत्र्यांनी उद्धव यांचे आव्हान स्विकारले
कानपूर टी-२०: भारताला पराभवाचा धक्का, इंग्लंडने ७ विकेट्सने सामना जिंकला
निवडणुकीच्या धामधुमीत कोण कोणाच्या बाजूला आहे हे समजत नाही- उद्धव ठाकरे
आप्पासाहेब धर्माधिकारींना पद्म पुरस्कार मिळाल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आनंद
सुनील प्रभू आणि स्नेहल आंबेकर व्यासपीठावर, उद्धव ठाकरेंकडून कामाचे कौतूक
उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या माजी महापौरांना व्यासपीठावर बोलावले
गोरेगावातील सभेच्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचे आगमन
आर या पारचा निर्णय आज ऑन द स्पॉट – सुभाष देसाई
शिवसेना स्वबळावर लढण्यास समर्थ; मुंबईतील मेळाव्यात सुभाष देसाईंचे वक्तव्य
कानपूर टी-२०: भारताचे इंग्लंडसमोर विजयासाठी १४८ धावांचे आव्हान
कानपूर टी-२०: इंग्लंडचा नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय
वाघा बॉर्डरवर प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
मनमाड-सवंदगाव फाट्याजवळ कार जळून खाक
जोरदार हिमवृष्टीमुळे हिमाचल प्रदेशातील कुल्लूमधील सर्व शाळा दोन दिवस बंद राहणार
जम्मू काश्मीरमधील लष्करी तळाजवळ हिमस्खलन; आतापर्यंत सहा जवानांचा मृत्यू
बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा नाराज; तिसऱ्यांदा अर्ज करुनही पद्मश्री पुरस्कार ज्वालाला पुरस्कार नाही
आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा म्हणून विशाखापट्टणममध्ये आंदोलन
जम्मू काश्मीरमध्ये हिमस्खलन; २ जवान बेपत्ता
रशियाचे भारतातील राजदूत अलेक्झांडर कदाकिन यांचे निधन
आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळण्यासाठी आंदोलन; पोलिसांकडून आंदोलक ताब्यात
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे ११ वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार; युतीबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होणार
मला झालेला आनंद शब्दांमध्ये व्यक्त करु शकत नाही; पद्मश्री जाहीर झाल्यानंतर गायक कैलाश खेर यांची प्रतिक्रिया
देवतांच्या प्रतिमा कार्यालयांबाहेर कसल्या काढता? – संजय राऊत
हिंदुत्व सांगण्याची लायकी नाही! – संजय राऊत
युतीचा निर्णय उद्धव ठाकरे उद्या जाहीर करणार- सुभाष देसाई
बोल्टला झटका, बीजिंग ऑलिम्पिकमधील सुवर्ण गमावण्याची वेळ
पद्मश्री पुरस्कारामुळे अधिक जोमाने काम करण्यास प्रेरणा मिळेल: ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी
मला पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याचे श्रेय कष्टकरी आणि शेतकऱ्यांना- शरद पवार
खेड्यांतील लोकांसाठी अधिक सुविधा पुरवल्या पाहिजेत. जेणेकरून त्यांचे राहणीमान सुधारेल. कृषीक्षेत्रालाही प्रोत्साहन दिले पाहिजे: राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
अजून आपण श्रेष्ठ नाहीत, आपल्यातील उणीवा ओळखायला हव्यात; प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचे देशाला संबोधन
गायक येशुदास, शरद पवार आणि मुरली मनोहर जोशी, पीए संगमा यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर
कोहली, साक्षी मलिक, दीपा कर्माकर यांना पद्मश्री
कैलाश खेर, अनुराधा पौडवाल, संजीव कपूर, कोहली पद्म पुरस्कारांचे मानकरी
राज्य सरकारकडून मंत्रालयातील धार्मिक फोटो काढण्याबाबतचे परिपत्रक; सरकारच्या भूमिकेमुळे शिवसेना नेते नाराज
मणिपूरमध्ये काँग्रेस आमदार आणि तृणमूल काँग्रेसच्या माजी खासदाराने भाजपमध्ये प्रवेश केला.
मातोश्रीवरील शिवसेनेच्या पुणे विभागातील नेत्यांची बैठक संपली, उमेदवारांच्या अंतिम यादीचा उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा.
भाजपच्या मानसिकतेचे दर्शन झाले; प्रियांका गांधींचा कटियार यांच्यावर पलटवार
जम्मू-काश्मीर: लष्कराच्या छावणीवरील हिमस्खलनामुळे बेपत्ता झालेल्यांपैकी सहा जवानांना वाचवण्यात यश
भारताच्या विकासात यूएई महत्वाचा भागीदार, भारतातील इन्फ्रा क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या यूएईचे आम्ही स्वागत करतो: पंतप्रधान नरेंद्र मोदी
बर्फवृष्टीमुळे श्रीनगर विमानतळावरून अनेक विमानांची उड्डाणे रद्द
जम्मू काश्मीरमधील सोनमर्ग येथे हिमस्खलनात एका जवानाचा मृत्यू, ८ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
काँग्रेसमध्ये प्रियंका गांधींपेक्षाही जास्त सुंदर नेत्या, भाजप नेता विनय कटियार यांचे वादग्रस्त विधान
पुण्यातील थेरगावमध्ये पतंगीचा मांजा वीजेच्या तारांमध्ये अडकल्याने स्फोट, ५ वर्षाचा मुलगा जखमी
सलमान खानला दिलासा, काळवीट शिकार प्रकरणातील सुनावणी २७ जानेवारीपर्यंत लांबणीवर
नाशिकमध्ये मनसेला आणखी एक धक्का, नगरसेवक गुलजार कोकणी काँग्रेसमध्ये दाखल
जलिकट्टूसंदर्भातील तामिळनाडू सरकारच्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान, ३० जानेवारीला होणार सुनावणी
नाशिकमधील तपोवानमध्ये गाईंच्या गोठ्याला आग, आगीत ४५ गाई जखमी, पशूवैद्यकांचे पथक घटनास्थळी दाखल.
छत्तीसगडमध्ये सशस्त्र सुरक्षा दलातील जवानाने केली सहका-याची हत्या, कांकेर जिल्ह्यातील घटना
गडचिरोलीतील मोहाली गावात वाघाच्या हल्ल्यात शिवानी रंगे या ६० वर्षीय वृद्धेचा मृत्यू
शरद यादव यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला – जदयूचे प्रवक्ते के सी त्यागी
कोलकाता विमानतळावर बांगलादेशी नागरिकाला अटक, विविध देशांमधील ९८ लाख रुपयांचे चलन सापडले
बिहारमधील दरभंगा येथे ट्रक आणि स्कूलबसमध्ये टक्कर, ५ विद्यार्थी जखमी
राम मंदिर भाजपसाठी आस्थेचा विषय, सध्या निवडणुकीतील मुद्दा नाही – उत्तर प्रदेशमधील भाजपचे प्रमुख केशव प्रसाद मौर्य
उत्तरप्रदेशमध्ये आचारसंहिता लागू झाल्यापासून ८४ कोटी २१ लाख रुपयांची रोकड जप्त, पोलीस आणि आयकर विभागाची माहिती.
छेडछाडीला कंटाळून लातूरमध्ये तरूणीची आत्महत्या
काळवीट शिकारप्रकरणी सलमान खान आज न्यायालयासमोर हजर होणार
२५ वर्षे वयापर्यंत व ३ वेळाच ‘नीट’ची परीक्षा देता येणार-टीव्ही वृत्त
गोवा: वास्कोतील तुरूंगामधील ४५ कैद्यांचा पळून जाण्याचा प्रयत्न
वसईत स्वाइन फ्लूचा रुग्ण
युती झाली तर शिवसेनेसोबतच…युती न झाल्यास भाजप स्वबळावर लढण्यास सक्षम- रावसाहेब दानवे
सहा आठवड्यात नोटीसला उत्तर देण्याचे आदेश
महाराष्ट्रातील आश्रमशाळांमध्ये ५०० विद्यार्थीनींचा मृत्यू; राष्ट्रीय मानवधिकार आयोगाची राज्य सरकारला नोटीस
६१ कोटी थकविणाऱ्या २४ जणांची मालमत्ता जप्त
मालमत्ता कर थकविणाऱ्यांवर नवी मुंबई महानगरपालिकेची धडक कारवाई
विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांची माहिती
मुंबई विद्यापीठाचे पेपर ऑनलाइन तपासले जाणार
उदगीरचे माजी आमदार चंद्रशेखर भोसले यांचे मंगळवारी पहाटे ४.३० वाजता ह्रदयविकाराने निधन
निती आयोगाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला
तिकीट नाकारल्याने काँग्रेसला रामराम; चारवेळा मिळवले होते नगरसेवकपद
मुंबई महापालिका : काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका वकारउन्नीसा अन्सारी यांचा एमआयएम मध्ये प्रवेश
महाराष्ट्रातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक; प्रजासत्ताक दिनाला प्रदान करण्यात येणार पदक
ठाण्यात शिवसेना स्वबळावर लढण्याची शक्यता, अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेणार
परिवहन करात वाढ केल्याच्या निषेधार्थ ३१ जानेवारीला राज्यभरात चक्का जाम.
पिंपरी चिंचवड येथील काळेवाडी भागात एकाचा फरशी डोक्यात घालून खून
आयआयएम सुधारणा विधेयकाला मंत्रीमंडळाची मंजुरी
डोंबिवली: साऊथ इंडियन असोसिएशन (एसआयए) महाविद्यालयाबाहेर तरुणाची चाकूने भोसकून हत्या
पुणे विद्यापीठ परिसरात पाच कुत्र्याच्या पिल्लांना विष देऊन मारल्याची घटना उघडकीस
नाशिक: शिवसेना कार्यकर्ता सुरेंद्र शेजवळ हत्याप्रकरण; तीन संशयितांना शिर्डीमधून अटक
मातोश्रीवरील शिवसेना नेते आणि विभागप्रमुखांची बैठक संपली
आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचलनायलय (ईडी) इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन (आयआरएफ) आणि झाकीर नाईकशी संबंधित लोकांची चौकशी करणार
पुणे: भाजप विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी. त्यांचे अपयश जनतेसमोर मांडणार- हर्षवर्धन पाटील
धुळे जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी शेख रौंदळ व त्यांच्या शिपाईला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
पिंपरी पोलीस ठाण्यात रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक, पाच घरफोड्या उघडकीस, २९ तोळे सोनेसह १० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत.
पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक कॉग्रेस पक्ष स्वबळावर लढ़विणार : कॉग्रेस जिल्हाध्यक्ष संजय जगताप
बटन सेल गिळल्यामुळे पिंपरी येथील दीड वर्षांची चिमुकली रुग्णालयात
भाजप मुस्लिम समाजाच्या आरक्षणाविरोधात – धनंजय मुंडे
राजकारणात आलो नसतो तर वकील झालो असतो – धनंजय मुंडे
भाजप सरकारने मुस्लिमांना बहिष्कृत नजरेने बघणे हे दुर्दैवी – धनंजय मुंडे
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता यावी यासाठी प्रयत्न करणार – धनंजय मुंडे
नोटाबंदीमुळे बेरोजगारीत वाढ होणार, यासाठी राज्य आणि केंद्र सरकार जबाबदार – धनंजय मुंडे
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे – धनंजय मुंडे यांची लोकसत्ता लाईव्ह चॅटमध्ये भूमिका
पोलीस खात्यातील रिक्त जागांविषयी चार आठवड्यांत उत्तर द्या, सुप्रीम कोर्टाचे सर्व राज्यांमधील गृहखात्यांना आदेश
पुणे: माजी उपमहापौर बंडु गायकवाड यांचा अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात प्रवेश
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेना नेते आणि विभागप्रमुखांची तातडीची बैठक बोलावली.
मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर एसटी बसला अपघात, दोन जण गंभीर जखमी
जम्मू काश्मीरमधील राजौरी येथे सुंदरबनी सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला, एका घुसखोराचा मृत्यू
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आज रात्री साडे अकराच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवरुन चर्चा करणार.
ओडीशामधील भुवनेश्वरमध्ये पर्यटकांना घेऊन जाणारी बस उलटली, ४० प्रवासी जखमी
जम्मू काश्मीरमधील हादूरा भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक
दिल्लीत भरधाव ट्रकची बसला धडक, १९ प्रवासी जखमी
मुंबईत जानेवारीमधील गत सहा वर्षांतील सर्वाधिक ३६ अंश तापमान
उदगीरचे माजी आमदार चंद्रशेखर भोसले यांचे मंगळवार (दि.२४) पहाटे ४.३०वाजता ह्रदयविकाराने निधन.
वडोदरा रेल्वे स्टेशन येथे शाहरूख खानला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी, पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये दोघे जखमी
मी निष्ठावंतांना घेऊन पुढे जाईन- उद्धव ठाकरे
ज्यांचा माझ्या नेतृत्त्वार विश्वास नसेल, त्यांनी बेधडक दुसरी वाट पकडावी- उद्धव ठाकरे
युतीसंदर्भात २६ तारखेला सविस्तर बोलेन- उद्धव ठाकरे
सध्या प्रश्न हा आहे की, आय लव्ह यू कसं म्हणायचं?- उद्धव ठाकरे
आपण सध्या कुंपणावर आहोत; निर्णय होत नाही तोपर्यंत शांत राहिलेलं बरं- उद्धव ठाकरे
मुंबई: षणमुखानंद सभागृहात शिवसैनिकांचा मेळावा; उद्धव ठाकरेंच्या भाषणाला सुरूवात
एमआयएम पक्षाकडून मुंबई महानगरपालिकेसाठी १३ उमेदवारांची यादी जाहीर
उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी जामीन देण्याची नारायण साईची याचिका सूरज उच्च न्यायालयाने फेटाळली
मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू
मस्जिद बंदरमध्ये झोपडपट्टीला लागलेली आग नियंत्रणात
सीएसटी रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी
जलद मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने सीएसटी स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी
शिवसेनेने जाहीरनामा ‘रिपीट करून दाखवला’ ; राधाकृष्ण विखे-पाटलांची खोचक टीका
मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाबाहेरच्या झोपडपट्टीला भीषण आग
शिवसेनेचा वचननामा अत्यंत बालिश; नारायण राणेंची टीका
शिवसेना कार्यकर्त्यांची फसवणूक करत आहे- नारायण राणे
शिवसेना-भाजप युती होणार नाही- नारायण राणे
चेन्नई – तामिळनाडू विधानसभेत जलिकट्टू विधेयक एकमताने मंजूर
जयपूर- भारतामध्ये समान नागरी कायदा असणे आवश्यक, बांग्लादेशी लेखिका तसलिमा नसरीन यांचे मत
मनसेचे माजी आमदार मंगेश सांगळे यांचा भाजपमध्ये प्रवेश
देसाईगंज नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार हरीश मोटवानी विजयी, भाजपचा केला पराभव
आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी शुभा राऊळ यांच्यासह तीन नगरसेवकांवर गुन्हा
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्प पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
टी-२० मालिकेसाठी अश्विन, जडेजाला विश्रांती; अमित मिश्रा, परवेज रसूलला संधी
शिवस्मारकाचा निधी गरीब मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करावा; ओबीसी संघर्ष समितीचे आवाहन
भाजपकडून दबावतंत्राचा वापर होत असल्याचा सेनेचा आरोप
शिवसेनेकडून उमेदवारांच्या मुलाखती सुरू असताना पोलिसांकडून चौकशीसाठी बोलावणे
नाशिक: राजकीय गुन्हे असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांना पोलिसांकडून नोटीस
पिंपरी चिंचवडमध्ये घरमालकाचा भाडेकरु महिलेवर चार वर्षे बलात्कार
इंग्लंडविरुद्धची ट्वेंटी २० मालिका: आर. अश्विन, जाडेजाला विश्रांती; अमित मिश्रा, परवेझ रसूलला संधी
देशाच्या शेतक-यांना कर्जमुक्त करावे हीच आमची मागणी – उद्धव ठाकरे
जो शिवसेनेच्या वचननाम्याविरूद्ध तो मुंबईद्रोही- उद्धव ठाकरे
माफियांना सोबत ठेवणारे माफियांबद्दल बोलतात, उद्धव ठाकरे यांचा किरीट सोमय्यांना टोला
नरिमन पॉईंट ते दहिसरपर्यंतचा कोस्टल रोड पूर्ण करणार- शिवसेना वचननामा
मुंबईत चार मोठे जलतरण तलाव उभारणार-शिवसेना वचननामा
मुंबईतील स्वच्छतागृह वाढवणार- शिवसेना वचननामा
आरेचा हरितपट्टा कायम राहणार – शिवसेना वचननामा
शालेय गणवेशातल्या विद्यार्थ्यांना बेस्टचा मोफत पास – शिवसेना वचननामा
मुंबई शहरात इ-वाचनालय उभारणार- शिवसेना वचननामा
ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारणार- शिवसेना वचननामा
सर्व मनपा कर्मचाऱ्यांना आरोग्य विम्याचे कवच- शिवसेना वचननामा
वारकरी भवनाच्या धर्तीवर मुंबईत डबेवाला भवन उभारणार- शिवसेना वचननामा
पालिकेच्या शाळेत शिकलेल्यांना मनपाच्या नोकरीत प्राधान्य – शिवसेना वचननामा
युतीच्या निर्णयाआधीच शिवसेनेचा वचननामा
‘जे बोलतो ते करून दाखवतो’ या टॅगलाइनखाली शिवसेनेचा वचननामा प्रकाशित
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई महानगरपालिकेसाठी वचननामा प्रसिद्ध
जलिकट्टू आंदोलनाला हिंसक वळण, आइस हाऊस पोलीस ठाण्याजवळ आंदोलकांनी गाड्या जाळल्या.
शिवसेनेकडून प्रस्ताव आल्याशिवाय चर्चा नाही, भाजपतील सूत्रांची माहिती- टीव्ही वृत्त
नागपुरात एकाच दिवसात दोन हत्येच्या घटना; तुकाराम नगरमध्ये बाल्या गावंडे या कुख्यात गुन्हेगाराची हत्या तर सदर बाजारात वेल्डिंग दुकानदाराची हत्या
तामिळनाडूमधील कोईम्बतूरमध्ये जलिकट्टूच्या समर्थनार्थ आंदोलन करणा-या १०० तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
पुणे: संभाजी उद्यानाबाहेर राम गणेश गडकरी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुप्षहार अर्पण करून विविध साहित्यिकांनी आदराजंली वाहिली.
कोणत्याही साहित्यकडे जात म्हणून पाहू नये: आमदार मेधा कुलकर्णी
पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आल्यावर राम गणेश गडकरी यांचा पुतळा बसविणार : आमदार मेधा कुलकर्णी
उत्तरप्रदेशमधून भाजपला हद्दपार करण्याचा माझा निर्धार – नरेश अग्रवाल
मी कोणत्याही जाणार नाहीये. मी अखिलेश यादवसोबतच आहे – नरेश अग्रवाल यांचे स्पष्टीकरण
उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाला धक्का, ज्येष्ठ नेते नरेश अग्रवाल आज भाजपमध्ये प्रवेश करणार-एएनआय
उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाला धक्का, ज्येष्ठ नेते नरेश अग्रवाल आज भाजपमध्ये प्रवेश करणार-एएनआय
प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित परेडच्या रंगीत तालीमनिमित्त दिल्लीवरून होणारी हवाई वाहतूक १०.३५ ते १२.१५ या कालावधीत बंद राहणार.
उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद येथे ५०० व १००० रूपयांच्या जुन्या नोटांच्या स्वरूपात १६ लाख रूपये जप्त.
बीडमध्ये शाळेत जाणा-या मुलीवर चाकूहल्ला, स्थानिकांनी हल्ला करणा-या २४ वर्षाच्या सतीश मंत्रीला चोप देत पोलिसांच्या हवाली केले
दिल्लीतील राजपथ येथे आज दिवसभर प्रजासत्ताक दिन परेडची रंगीत तालीम. सकाळी ९.५० वाजता विजय चौकातून होणार सुरूवात.
मुंबई विमानतळावर सव्वा किलो सोने जप्त, मिक्सरच्या सुट्या भागातून होत होती सोन्याची तस्करी
मुंबईतील कांदिवली लिंक रोडवर अपघात, दुचाकीस्वाराची एसटी बसला धडक, अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
भाजप आमदार राम कदम यांच्या भावाविरोधात मारहाणीचा गुन्हा, राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने दाखल केली तक्रार
जलिकट्टू समर्थकांची मागणी पूर्ण, आता मरिना बीच परिसर खाली करा – पोलिसांची भूमिका
जलिकट्टूच्या समर्थनार्थ मरिना बीचवर जमलेल्या आंदोलकांना हटवण्याचा प्रयत्न, पोलिसांची मोहीम सुरु
शिवसेनेच्या प्रस्तावाची वाट बघतोय, संजय राऊत यांच्या विधानाकडे लक्ष देत नाही – रावसाहेब दानवे
लष्कराकडून जवानांचा मुलांपेक्षाही चांगला सांभाळ – प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांची टिप्पणी
राजपथावर यंदा स्वराज्याची सिंहगर्जना घुमणार; प्रजासत्ताकदिनाच्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ लोकमान्य टिळकांच्या जीवनावर
कोलकाता वनडे: चुरशीच्या लढाईत इंग्लंडचा पाच धावांनी विजय, भारताने मालिका २-१ ने जिंकली
‘हे राम नथुराम’ नाटकाविरोधात नागपुरात जोरदार निदर्शने
मिरारोड भाईंदर रेल्वे स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची अप-डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत; वाहतूक २० मिनिटे उशिराने सुरू
गोवा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रकाशित; संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकरांची उपस्थिती
उत्तरप्रदेश: समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या युतीवर शिक्कामोर्तब; काँग्रेस १०५, समाजवादी पक्ष २९८ जागा लढवणार
अरुणाचल प्रदेश: आसाम रायफल्सच्या जवानांकडून दोन दहशतवादी ठार
कोलकाता वनडे: दुसऱयाच षटकात भारताला पहिला धक्का, रहाणे (१) क्लीनबोल्ड
कोलकाता वनडे: इंग्लंडचे भारतासमोर ३२२ धावांचे आव्हान
हिराखंड एक्सप्रेसच्या अपघाताची चौकशी करणार, दोषींना कठोर शिक्षा होणार – रेल्वेमंत्री सुरेश प्रभू
जलीकट्टू समर्थनार्थ करण्यात आलेल्या आंदोलनात तिघांचा मृत्यू; २८ जण जखमी
उत्तराखंडमधील डेहरादूनमध्ये तिकिटवाटपावरुन काँग्रेसमध्ये नाराजी, संतप्त कार्यकर्त्यांकडून कार्यालयात तोडफोड
युतीसंदर्भात मुख्यमंत्र्यांची भाजप नेत्यांसोबत बैठक, वर्षा बंगल्यावर भाजपचे वरिष्ठ नेते पोहोचले
पंजाब विधानसभा निवडणूक, अर्थमंत्री अरुण जेटलींच्या हस्ते जाहीरनाम्याचे प्रकाशन
सायना नेहवालने मलेशिया मास्टर्स स्पर्धा जिंकली, पोर्नपावे चोकयूवाँगचा केला पराभव
युतीबाबत अद्याप भाजपकडून प्रस्ताव आलेला नाही – उद्धव ठाकरे
महानगर पालिका निवडणुकीत युतीबाबत अद्याप निर्णय नाही- उद्धव ठाकरे
ठाणे- स्वच्छता करातून व्यापाऱ्यांची मुक्तता करण्याचे शिवसेनेचे आश्वासन
सिंगापूरच्या मॉडेलवर ठाणे चौपाटी विकसित करण्याचे शिवसेनेचे आश्वासन
सत्ता आल्यास ठाणेकरांसाठी स्वतंत्र धरण बांधणार- उद्धव ठाकरे
५०० फुटापर्यंतच्या घरात राहणा-या ठाणेकरांना मालमत्ता कर माफ, उद्धव ठाकरे यांची घोषणा
ऑस्ट्रेलियन ओपन: अँडी मरेचे ‘पॅकअप’, मिशा झ्वेरेव्हचा मरेवर धक्कादायक विजय
कोलकाता वनडे: भारताचा नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय, रहाणेला संधी
नवी दिल्ली- वाढत्या रेल्वे अपघातांवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी केली चिंता व्यक्त
अरुणाचल प्रदेशमधील जैरामपूर येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक
मुंबई विमानतळावर दोन किलो सोने जप्त, दुबईवरुन येणा-या प्रवाशाला अटक
तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांच्या उपस्थितीत आज सकाळी १० वाजता जलिकट्टूला सुरुवात होणार.
आंध्रप्रदेशमध्ये जगदलपूर – भुवनेश्वर एक्सप्रेसचे ८ डबे रुळावरुन घसरले, २३ प्रवाशांचा मृत्यू
जलीकट्ट केवळ निमित्त, हा सामान्यजनांचा
असंतोष!
शिक्षणाचे भगवेकरण करण्याचे भाजप सरकारचे षड्यंत्र – अजित पवार
काँग्रेस-सपच्या युतीबाबतचे गूढ कायम
मुंबई आग्रा महामार्गावर धुळ्याजवळ तीन वाहनांचा अपघात; वाहतुकीवर परिणाम
भाजपकडून ११४ जागांचा प्रस्ताव, आशिष शेलार यांची माहिती
शिवसेना-भाजपमधील तिसऱ्या फेरीची चर्चा निष्फळ; युती तुटण्याची शक्यता
दादर रेल्वे स्थानकात पेंटाग्राफ तुटला; मध्य रेल्वेची वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने
जलिकट्टूच्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करण्यासाठी २३ जानेवारी रोजी विधानसभेत सादर केले जाणार
तामिळनाडूचे मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम उद्या, रविवारी सकाळी १० वाजता ‘जलिकट्टू’चे उद्घाटन करणार
उत्तर प्रदेश निवडणूक: मुख्यमंत्री अखिलेश यादव उद्या, रविवारी सकाळी ११ वाजता समाजवादी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार
पंजाबच्या निवडणुकीत चांगली कामगिरी करू; अर्थमंत्री अरुण जेटलींनी व्यक्त केला विश्वास
घोटी शहरात घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट, दोन जण जखमी
भारतीय लष्कराचा जवान चंदू चव्हाण मायदेशी परतला
पुणे: वडगाव येथील दोन झोपड्यांना दुपारी साडेबाराच्या सुमारास आग, सिंहगड रोड अग्निशमन दलाच्या जवानांनी विझवली आग
भारतीय जवान चंदू चव्हाणची पाकिस्तानकडून सुटका, आज दुपारी ३ वाजता वाघा सीमेवर पोहोचणार
ठाणे महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी, नारायण राणे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत निर्णय (टीव्ही वृत्त)
पुणे: महापालिकेसमोरील शिवाजी पुलाजवळ नदीपात्रात वयोवृद्ध व्यक्तीचा मृतदेह सापडला
बिहार सरकारने दारुबंदीच्या जागृतीसाठी रोहाट जिल्ह्यात आयोजित केलेल्या मानवी साखळीत सहभागी झालेले चार विद्यार्थी पडले बेशुद्ध
पश्चिम बंगाल: इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी कोलकाता येथील मैदानावर टीम इंडियाचा जोरदार सराव
मुंबई: शिवसेना नेते मनोहर जोशी, रामदास कदम यांच्यासह ज्य़ेष्ठ नेते सेना भवनात दाखल, महापालिका निवडणुकीत भाजपसोबतच्या युतीबाबत चर्चेची शक्यता
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सेना भवनात दाखल
ठाणे महापालिका निवडणूक: काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या चर्चेसाठी नारायण राणे यांच्या निवासस्थानी बैठक सुरू
भारताचा क्रिकेटपटू सुरेश रैना रामगोपाल यादव यांच्या भेटीला
पाकिस्तानमध्ये कुर्रम एजन्सीच्या ईदगाह बाजारात स्फोट, १२ मृत्युमुखी
भाजपकडून २२७ जागांसाठी ५१३ उमेदवारांची यादी तयार- टीव्ही रिपोर्ट
सेनेशी युती झाल्यास भाजपची पर्यायी रणनीती तयार- टीव्ही रिपोर्ट
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ओबामा केअर आरोग्य कायद्याविरुद्ध केला आदेश पारित.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कमांडर्स कॉन्फरन्समध्ये होणार सहभागी.
पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; चौघांचा मृत्यू; १३ जखमी
केंद्र सरकार तामिळनाडूच्या विकासासाठी कटिबद्ध- पंतप्रधान मोदी
तामिळी जनतेच्या सांस्कृतिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू- पंतप्रधान मोदी
तामिळनाडूच्या वैभवशाली परंपरेचा आम्हाला अभिमान- पंतप्रधान मोदी
गाडीत तब्बल १०० प्रवासी असल्याची माहिती
जैसलमेर येथे राणीखेत एक्स्प्रेस गाडीचे १० डबे घसरले
नोटाबंदीच्या काळात एकदाही बनावट नोटा सापडल्या नाहीत; अर्थमंत्रालयाचा दावा
सामराज हॉटेलला लागलेली आग विझवण्यात यश
अंधेरीच्या चकाला भागातील सामराज हॉटेलला लागलेल्या आगीत ८ जण जखमी
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्तास्थानांवर युती सरकारचे नियंत्रण
आचारसंहिता भंगाच्या १८१ गुन्ह्य़ांमध्ये केवळ ८ प्रकरणांत शिक्षा
मुंबई- चकाला परिसरात हाॅटेलला आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल, बचावकार्य सुरू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन केले.
‘इस्लामिक कट्टरतावाद या पृथ्वीवरून नष्ट करणार’ नवे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांचा निर्धार
LIVE: शेजारी राष्ट्रांच्या समस्यांपासून आपण आपल्याला वाचवलं पाहिजे – राष्ट्राध्यक्ष ट्रम्प
LIVE: ‘अमेरिकन माल खरेदी करा, अमेरिकनांनाच नोकऱ्या द्या’ हाच आपला नवा मंत्र- राष्ट्राध्यक्ष ट्रम्प
LIVE: डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, शपथ घेतल्यावर अध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच करत आहेत भाषण
मनमोहन वैद्य यांनी धर्माच्या आधारे दिल्या जाणा-या आरक्षणावर भाष्य केले – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
शपथविधी सोहळ्यासाठी बराक ओबामा यांच्या अध्यक्षीय वाहनातून त्यांच्यासोबत डोनाल्ड ट्रम्प कॅपिटाॅल बिल्डिंगकडे रवाना
नागपूर महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढणार
डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला विरोध, वॉशिंग्टनमध्ये ट्रम्पविरोधकांचे आंदोलन
काही वेळातच डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी, सोहळ्याच्या ठिकाणी महत्त्वाच्या व्यक्तींचं आगमन सुरू, माजी राष्ट्राध्यक्ष जाॅर्ज बुश पत्नीसह दाखल
जम्मू काश्मीरमधील श्रीनगरजवळ पोलीस उपअधीक्षकांच्या गाडीवर दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, कोणीही जखमी नाही
राज्यात परिवर्तनासाठी पक्ष स्थापन केला, आगामी काळात सर्वांना ज्वालामुखी दिसेलच – विनायक मेटे
नाशिकमधील कालिदास नाट्यगृह दुरावस्थेप्रकरणी महापालिकेतील ४ अधिका-यांना नोटीस
देशातून जातीवर आधारित आरक्षण हद्दपार झाले पाहिजे: मनमोहन वैद्य, नेते, आरएसएस
गडचिरोलीतील देसाईगंज भागात भरधाव ट्रकने पोलीस शिपायाला चिरडले.
आयएनएस विक्रमादित्यमध्ये काढता येणार पैसे, एटीएम मशिन बसवण्याचा निर्णय, एटीएमची सुविधा असलेली पहिलीच युद्धनौका
राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी राज्य सरकारने लागू केलेल्या प्रभाग पद्धतीच्या अधिसूचनेला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान; याचिकेवर २५ जानेवारीला सुनावणी
पुणे: ग्वाल्हेर आणि किराणा घराण्याचे गायक पंडित व्यंकटेश कुमार आणि सहकारी यांच्या गायनाने यंदाच्या वसंतोत्सवाला सुरुवात
नागपूरमधील अरोली येथे पत्नी आणि मुलीची हत्या करुन ३२ वर्षीय तरुणाने केली आत्महत्या.
शेतक-यांना दिला देणारे निर्णय घ्या, अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदारांची अरुण जेटलींकडे मागणी
खैरलांजी प्रकरणातील पीडित भैयालाल भोतमांगे यांचे ह्रदयविकाराने निधन
उत्तरप्रदेशमधील सर्व ४०३ जागांवर लढणार, १२ पक्षांसोबत आघाडी करणार – राष्ट्रीय लोकदल
बीसीसीआय-लोढा समिती वाद: पुढील सुनावणी २४ जानेवारी रोजी
बीसीसीआय-लोढा समिती वाद:’अमायकस क्युरी’ने बीसीसीआयचा कारभार सांभाळण्यासाठी ९ जणांची नावे कोर्टासमोर बंद लिफाफ्यातून सादर केली
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक: शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेसाठी नेत्यांची बैठक सुरू
बीसीसीआय खासगी संस्था असली तरी तिचा सरकारवर देखील परिणाम होतो, कोर्टाकडे पुनर्विचाराची विनंती- अॅटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी
नारायण साई दोन ठिकाणांहून लढवणार निवडणूक
आसाराम बापूने केली ओजस्वी पक्षाची स्थापना, उत्तर प्रदेशात १५० जागा लढवणार
पुण्यातील आपटे रोडवरील रामी ग्रँड हॉटेलच्या पाचव्या मजल्याला आग, अग्निशामक दलाच्या २ गाड्या घटनास्थळी
पुणे मेट्रोच्या मार्गातील अडथळे दूर, हरित लवादाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती
सोलापूर महापालिकेतील सहाय्यक आयुक्त प्रदीप साठे यांना लाच घेताना अटक.
डोंबिवली पश्चिमेत वृद्धाला बोलण्यात गुंतवून लुबाडले, १७हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन भामटे पसार
पुणे- कोथरुड आणि चतु:श्रुंगी पोलिस स्टेशन हद्दीत २ ठिकाणी मंगळसूत्र चोरीच्या घटना
मध्यप्रदेशमधील भिंडमध्ये ट्रकची दुचाकीला धडक, २ वर्षाच्या मुलाच्या मृत्यूनंतर संतप्त जमावाने ट्रकला पेटवले
पश्चिम बंगालमधील हावडा येथे चप्पलमधून ८.३ कोटींच्या सोन्याच्या बिस्किटांची तस्करी करणाऱ्या आठ जणांना अटक.
हिंदुत्ववाद्यांसाठी जलिकट्टू एक धडा, ओवेसींचे वादग्रस्त वक्तव्य; समान नागरी कायद्याचा मुद्दा केला उपस्थित
अण्णाद्रमुक पक्षाचे खासदार उद्या दुपारी २ वाजता राष्ट्रपती प्रणव मुखर्जींची भेट घेणार
समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये १९१ उमेदवारांची यादी जाहीर केली. शिवपाल यादव यांना जसवंतनगरमधून उमेदवारी.
नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरण; सीबीआयचा अहवाल हायकोर्टात सादर
भरवर्गात शिक्षक पुढाऱ्याने केला विद्यार्थिनीचा विनयभंग, अलिबागमधील घटना
४९ लाख रूपयांच्या वीज चोरीप्रकरणी अभिनेत्री रती अग्निहोत्रीवर एफआयआर दाखल
रेस्तराँमध्ये हाफ, क्वार्टर प्लेटचीही ऑर्डर देता येणार!, लवकरच नव्या कायद्याची शक्यता
अमेरिकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात न्यूयॉर्क येथील ट्रम्प टॉवरबाहेर निदर्शने
जलिकट्टूच्या समर्थनात चेन्नईतील इग्मोर रेल्वे स्थानकावर द्रमूक खासदार कनिमोझी यांच्या नेतृत्वाखाली ‘रेल रोको’ आंदोलन
गुंडांच्या मदतीने निवडणूक जिंकणे हे काळे धन जमा करण्यापेक्षा वाईट, ‘सामना’मधून शिवसेनेचा भाजपवर निशाणा
मनसेचे आज शक्तिप्रदर्शन
आरोपही करायचे आणि युतीची चर्चाही करायची, हे योग्य नाही- अनिल परब
भाजप नेत्यांच्या बेताल वक्तव्यांबाबत सेनेचे नेते नाराज
सेनेच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंकडे व्यक्त केली नाराजी
युवराज सिंग ठरला ‘मॅन ऑफ द मॅच’
संसदेच्या ५० क्रमांकाच्या खोलीत आग; अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल