रात्रीच्या जेवणानंतरची शतपावली हा जुन्या काळातील लोकांच्या दिनक्रमाचाच एक भाग होता. आपल्या आजी-आजोबांना विचारून पाहा! अनेकांना ही शतपावली केल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखेच वाटत नाही. चालण्याच्या व्यायामाचे फायदे आपण यापूर्वी पाहिले आहेतच. पण जेवणानंतरच्या चालण्याचे फायदे काय, शतपावली किती वेळ आणि कशी केली तर चांगले ते पाहूया

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चालण्याचा व्यायाम अगदी पूर्वीपासून फायदेशीर समजला जातो. जेवणानंतरचे चालणे अर्थात शतपावली हा घाम गाळून करण्याचा व्यायाम नव्हे, पण तो पचनासाठी चांगला असे सांगितले जाते. शतपावली दोन्ही जेवणांनंतर केली तरी चालते. पण रात्रीच्या जेवणानंतर केलेले अधिक चांगले. एरवी आपण जेव्हा व्यायामासाठी चालतो तेव्हा ‘ब्रिस्क वॉक’ला म्हणजे भरभर चालण्यावर भर दिला जातो. शतपावली मात्र भरभर चालून करायची नसते. जेवल्यानंतर फार वेगाने चालल्यास पचन कमी होईल. सावकाश आणि जास्तीतजास्त २० ते २५ मिनिटेच शतपावली करून भागते. जेवणाचे समाधान अशा सावकाश केलेल्या शतपावलीतून मिळते.

मराठीतील सर्व लोकआरोग्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health benefits of walking
First published on: 16-04-2016 at 02:24 IST