कर्करोगाचे वाढते प्रमाण हा चिंतेचा विषय बनला आहे. म्हणूनच जगभरात विविध प्रकारच्या कर्करोगासंबंधीच्या प्रबोधनार्थ कॅन्सर दिन पाळला जातो. २० मार्च ‘वर्ल्ड ओरल हेल्थ डे ’ आहे.

भारतात आढळणाऱ्या सर्व प्रकारच्या कॅन्सरपैकी मुखाचा कॅन्सर पहिल्या तीन क्रमांकामध्ये आढळतो. ग्लोबकॉन माहिती अहवाल २००८ नुसार मुखाच्या कॅन्सरचे स्त्री-पुरुषांमधील प्रमाण एकूण लोकसंख्येच्या ७.५ प्रतिलक्ष असे आहे. अन्न व पाणी या मनुष्याच्या मूलभूत गरजांची पूर्ती मुखाद्वारेच केली जाते. म्हणून मुखाचे आरोग्य स्वास्थ्यरक्षणासाठी अत्यावश्यकच असते.

Mixed trend in global markets and selling by investors in banking finance and consumer goods stocks
पाच सत्रातील तेजीला खिंडार; नफावसुलीने ‘सेन्सेक्स’ला सहा शतकी झळ
pune ranks among the forgetful passengers
विसरभोळ्या प्रवाशांमध्ये पुणेकर देशात पाचव्या स्थानी! जाणून घ्या कोणत्या वस्तू विसरतात…
nestle India shares slip after reports says baby food contain high levels of added sugar
नेस्लेला ८,१३७ कोटी बाजार भांडवलाची झळ; दुग्धजन्य पदार्थांबाबतच्या वृत्ताने भांडवली बाजारात समभागात घसरण
Industrial production rate advanced 5.7 percent in February
औद्योगिक उत्पादन दर फेब्रुवारीमध्ये ५.७ टक्क्यांपुढे

या कॅन्सरमध्ये समाविष्ट अवयव

ओठ, हिरडय़ा, गाल, गालाची अंतत्वचा, जीभ, टाळू, हनुवटी, जिभेच्या खालील भाग, पडजीभ, गलग्रंथी, घसा, दात, दाढेच्या मागील भाग

संभाव्य कारणे

* विविध स्वरूपातील तंबाखू उत्पादनाचे सेवन

* धूम्रपान – बिडी, सिगारेट, सिगार, चिलीम, हुक्का, चुट्टा धूम्रपान

* धूरविरहित तंबाखू सेवन – खैनी, गुटखा, पानमसाला, मावा सेवन, तंबाखूचे पान चघळणे, मशेरी व त्याची टूथपेस्ट हिरडय़ांवर लावणे, तपकीर नाकाव्दारे ओढणे

* अति मद्यपान

* मुखाची अस्वच्छता,  क्षोभकारक माऊथ वॉशचा सतत वापर, दात कोरणीसारख्या टोकदार वस्तूंचा सतत वापर, तीक्ष्ण दाताने मुखातील विशिष्ट भागाचे सतत घर्षण होणे

* उष्ण, विदाही, आंबट, खारट पदार्थ, मांसाहार, बेकरीचे पदार्थ, आंबवलेले पदार्थ यांचे सतत व वारंवार सेवन

* मानसिक ताण

 लक्षणे

* मुखामध्ये वेदनारहित पांढरा चट्टा दिसून येणे

* वारंवार तोंड येणे, मुखगत व्रण, बोलण्यास त्रास होणे

* गिळण्यास त्रास होणे, तोंडाला चव नसणे, गलप्रदेशी ग्रंथी वाढणे, भूक मंदावणे, वजन कमी होणे

आधुनिक तपासण्या

* मुखपरीक्षण ,बायॉफ्सी, ब्रश बायॉफ्सी

*FNAC (Fine Needle Aspiration Cytology) Orthopantomogram  OPG)

* सी.टी. स्कॅन (डोक्याचा व मानेचा)

* पेट स्कॅन

आधुनिक चिकित्सापध्दती

* शस्त्रकर्म ,रेडिओथेरॅपी, केमोथेरॅपी , इम्युनोथेरॅपी, टारगेटेड थेरॅपी, पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट

आयुर्वेदिक चिकित्सा

* शमन चिकित्सा (आयुर्वेदिक औषधी चिकित्सा) – व्याधी निर्माण करणाऱ्या वाढलेल्या वात,पित्त,कफ दोषांना मुखावाटे औषधे देऊन साम्यावस्थेत आणणारी तसेच भूक व पचन सुधारणारी शमन चिकित्सा

* शोधन चिकित्सा (पंचकर्म) – प्रकुपित दोषांना जवळच्या मार्गाने बाहेर काढून शरीरशुध्दी करणारी शोधन चिकित्सा. प्रामुख्याने वमन (उलटीच्या औषधाने उलटी करविणे), बस्ति (गुदमार्गाने औषधी तेल / तूप किंवा औषधी काढे यांचा एनिमा देणे), नस्य (नाकपुड्यांतून औषधी तेल / तूपाचे थेंब सोडणे)

* उपक्रम – गंडूष (औषधी काढे किंवा तेलाने गुळण्या करणे), आयुर्वेदिक औषधी सिध्द तूप/ तेल तोडांच्या आतून लावणे, आयुर्वेदिक चूर्णाने / पेस्टने दात घासणे

* पथ्यकर आहार – विहार – पचण्यास हलका परंतु पोषक, गिळण्यास सहज, व्यवस्थित शिजवलेला, मउढ, हिरवी मिरची-मसालेदार- तेलकट – तिखट पदार्थ वर्जति पथ्यकर अशा आहारविषयक तसेच स्वास्थ्यरक्षक विहाराबाबत मार्गदर्शन

* समुपदेशन – सकारात्मक दृष्टीकोन रूजविणे, आत्मविश्वास वाढवणे, मानसिक आरोग्य टिकवणे यासाठी समुपदेशन उपयुक्त ठरते.

सर्व स्टेज व ग्रेडच्या मुखाच्या कॅन्सरमध्ये रेडिओथेरॅपी ही अत्यावश्यक चिकित्सा आहे. मात्र रेडिओथेरॅपीच्या दुष्परिणामांच्या भीतीने अनेक रूग्ण ही चिकित्सा नाकारतात. मात्र रेडिओथेरॅपीबरोबर आयुर्वेदिक चिकित्सा घेतल्यास रेडिओथेरॅपीच्या दुष्परिणामांची तीव्रता बऱ्याच अंशी कमी होते.

*  रेडिओथेरॅपीचे दुष्परिणाम – मुखगत व्रण (तोंडात जखमा होणे), तोंडामध्ये रुक्षता (कोरडेपणा), जाणवणे, अति लालास्त्राव (खूप लाळ सुटणे), तोंड उघडण्यास त्रास होणे, गिळण्यास त्रास होणे, चव नसणे, भूक मंदावणे,मळमळ होणे,अशक्तपणा ,वजन कमी होणे.

* रेडिओथेरॅपीच्या दुष्परिणामांमध्ये आयुर्वेदिक चिकित्सा –

* शमन चिकित्सा – आयुर्वेदिक औषधे उदा. यष्टीमधु, वासा, आमलकी, दूर्वा, सारिवा

* नस्य (यष्टीमधु तेल/घृतासारखे आयुर्वेदिक औषधी सिध्द तेल / तूप नाकामध्ये सोडणे)

* बस्ति – औषधी तेल किंवा तूपाचे एनिमा

* गंडूष (त्रिफळा व हळदीच्या काढ्याने गुळण्या करणे)

* मुखप्रतिसारण (आयुर्वेदिक औषधी सिध्द तूप तोंडात आतून लावणे उदा. यष्टिमधु घृत)

* शिरोधारा – डोक्यावर औषधी तेलाची धार सोडणे

* मऊ व पौष्टिक आयुर्वेदिक आहार

प्रतिबंधात्मक उपाय

* दात हिरड्यांची व जीभेची स्वच्छता, मुख अंतर्गत स्वच्छतेसाठी सकाळी उठल्यावर, झोपण्यापूर्वी कडू व तुरट चवीच्या वनस्पतींच्या (वड, खैर, निंब, करंज) काष्ठाचा / चूर्णाचा वापर

दातांच्या स्वच्छतेसाठी त्रिफळा चूर्णाचा  मधासह वापर

* जिभेवरील चिकटपणा नाहीसा होऊन जीभ स्वच्छ होण्यासाठी धातू अथवा फ्लॅस्टिकच्या पट्टीचा उपयोग

* तोंडातील चिकटा व दुर्गंधी नाहीशी होण्यासाठी किंचित उष्ण पाणी, तिळतेल, दूध, औषधी काढा यांच्या गुळण्या

तंबाखू उत्पादनाचे सेवन पूर्णत  वर्ज्य

* मुखाचे आरोग्य उत्तम राखणे हेच मुखाच्या कॅन्सरला प्रतिबंध करणारे प्रमुख साधन आहे.

* खाल्लेल्या अन्नाचे पचन उत्तम होणे व नित्यनियमित प्राकृत मलप्रवृत्ती होणे या गोष्टीही मुखाच्या कॅन्सरच्या प्रतिबंधासाठी आवश्यक आहेत.

२० मार्च ‘वर्ल्ड ओरल हेल्थ डे ’ निमित्त ‘इंटिग्रेटेड ट्रीटमेंट व रिसर्च सेंटर’, वाघोली, पुणे तर्फे शनिवार दिनांक २४ मार्च २०१८ रोजी इंटिग्रेटेड ट्रीटमेंट व रिसर्च सेंटर, वाघोली, पुणे येथे (सकाळी १० ते ४) तसेच रविवार दिनांक २५मार्च २०१८ रोजी मुंबईमध्ये शारदा मंगल कार्यालय , मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय बििल्डग, दादर -पूर्व येथे (सकाळी ९ ते १२) मुखाच्या कॅन्सरग्रस्त रूग्णांसाठी आयुर्वेदिक चिकित्सा सल्ला शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

वैद्य स. प्र. सरदेशमुख ictrcpune@gmail.com