वर्षभराहून अधिक काळ रुळांवरून चालत जाताना एक वेगळीच ग्राफिटी योगेश बर्वेच्या लक्षात आली. रूळ समांतर आणि सरळ जातात. काही ठिकाणी बारीकशा वळणांनंतरही त्या समांतर जाण्यातून एक वेगळीच सरळ रेषा तयार होत जाते. खूप पुढे पाहिले तर कडक उन्हाळ्यात समोरच्या बाजूस रुळांवर एक मृगजळही दृष्टीस पडते. त्यातही त्या समांतर रेषा कधी धूसर होतात, कधी एकमेकांत मिसळतात. तरीही त्यातूनही ती एक सरळ जाणारी रेषा कायमच राहते. हेच सारे दृश्यात्मक भाषेत योगेशने मांडले आणि मग वसईतील रेल्वे कुंपणाची भिंतच कॅनव्हास झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onकलाArt
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Art
First published on: 23-01-2015 at 01:04 IST