lp04lp05पोलर बेअरची मादी ऑक्टोबरमध्ये बर्फाळ गुहेत सुप्तावस्थेत (हायबरनेशन) जाते आणि तब्बल अडीच महिन्यांनी ती पिल्लाला जन्म देते. जन्मानंतर साधारण सात-आठ दिवसांनी पिल्लाला घेऊन ती गुहेच्या बाहेर येते. माता आणि पिल्लाचा एकत्र फोटो घेणाऱ्या छायाचित्रकाराला मात्र गुहेच्या बाहेर शंभर- दोनशे फुटांवर तिष्ठत बसावे लागते. विक्रम पोतदार यांना हे छायाचित्र मिळविण्यासाठी तब्बल नऊ दिवस रोज दहा तास वाट पाहावी लागली, तेव्हा कोठे पंधरा मिनिटासाठी या मायलेकरांचे दर्शन झाले. ‘चर्चिल कॅनडा’च्या सुमारे चार-पाच हजार चौरस किलोमीटरच्या बर्फाळ प्रदेशात तब्बल उणे ३० ते ५० अंश वातावरणात पोलर बेअरच्या मायलेकरांचे हे छायाचित्र टिपणे म्हणजे मोठे आव्हानच होते. कपडय़ाचे सहा थर चढवून तहान- भूक विसरून हे छायाचित्र मिळवणे म्हणजे एक तपश्चर्याच म्हणावी लागेल.