राशिभविष्य : दि. १२ ते १८ नोव्हेंबर २०२१

रवी-गुरूचा केंद्रयोग हा अडचणींवर मात करून पुढील मार्ग दाखवणारा योग आहे.

साप्ताहिक राशिभविष्य
साप्ताहिक राशिभविष्य : असा असेल तुमचा आठवडा

सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com
मेष रवी-गुरूचा केंद्रयोग हा अडचणींवर मात करून पुढील मार्ग दाखवणारा योग आहे. रवी आणि गुरू या दोन बलाढय़ पुरुष ग्रहांमुळे परिस्थितीमध्ये सुधारणा होईल. नोकरी-व्यवसायात मेहनतीने स्वत:ला सिद्ध करून दाखवाल. आराखडे खरे ठरतील. वेळ वाया घालवू नका. वरिष्ठ आपली बाजू घेतील. सहकारी वर्गाला मदत करावी लागेल. मुलांचे अतिलाड नको. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. हवामानातील बदलाचा पोटावर परिणाम होईल.

वृषभ रवी-चंद्राचा नवपंचम योग हा यश आणि कीर्ती देणारा योग आहे. कष्टाचे चीज होईल. नोकरी-व्यवसायात अपेक्षित निर्णय जाहीर होतील. वरिष्ठ आणि सहकारी वर्गाकडून पािठबा मिळेल. जोडीदाराच्या अडचणी विचारपूर्वक सोडवाल. एकमेकांच्या साथीने समस्येतून मार्ग सापडेल. मुलांचे आíथक प्रश्न सुटतील. घरातील वाद चव्हाटय़ावर न आणता सामोपचाराने मिटवाल. कामाचा ताण कमी करण्यासाठी आपले छंद जोपासाल.

मिथुन चंद्र-बुधाचा नवपंचम योग हा कामात उत्तेजन देणारा योग आहे. बुधाच्या बुद्धिमत्तेला चंद्राच्या उत्सुकतेची जोड मिळेल. स्मरणशक्तीचा योग्य उपयोग कराल. वरिष्ठांच्या निरीक्षणातून आपली लहानशी चूक सुटणार नाही. सहकारी वर्गाच्या साहाय्याने परिस्थिती हाताळण्यात मदत होईल. जोडीदाराला काम आणि घरच्या जबाबदाऱ्या यातील समतोल साधणे कठीण जाईल. डोळ्यांची काळजी घ्यावी. उत्सर्जन संस्था जपावी. विश्रांती आवश्यक!

कर्क चंद्र-गुरूचा लाभ योग हा उत्कर्षकारक योग आहे. चंद्राची नवनवीन गोष्टी शिकण्याची लालसा आणि गुरूचे ज्ञानाचे भांडार यांचा मिलाप होईल. नोकरी-व्यवसायात नवी जबाबदारी आनंदाने स्वीकाराल. वरिष्ठांच्या प्रश्नांना सामोरे जाताना कामातील बारकावे लक्षात ठेवावे. सहकारी वर्गाची मदत होईल. जोडीदाराच्या कामात अडथळे येऊन निर्णय लांबणीवर पडतील. मुलांना शिस्त लावणे गरजेचे भासेल. वरचेवर पोट बिघडल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.

सिंह चंद्र-शुक्राचा नवपंचम योग हा नवी उमेद देणारा योग आहे. नोकरी-व्यवसायातील काही निर्णय खंबीरपणे घ्यावे लागतील. वरिष्ठ आपली नियुक्ती जोखमीच्या कामगिरीवर करतील. सहकारी वर्ग कामानिमित्त प्रवास करेल. नवे करार करताना घाई करू नये. जोडीदाराच्या कामाचा ताण वाढेल. मुलांच्या कष्टाचे चीज होईल. कौटुंबिक वातावरण थोडेफार तापेल. समजून घेणे शक्य नसले तरी शब्दाने शब्द नक्कीच वाढवू नये. पायातील शिरा आखडतील.

कन्या चंद्र-नेपच्यूनचा लाभयोग हा स्फूíतदायक योग ठरेल. चंद्राच्या चंचलतेला नेपच्यूनची स्फूर्ती उपयोगी पडेल. आपले नवे विचार मांडाल. नोकरी-व्यवसायात आपल्या नव्या उपक्रमाला मान्यता मिळेल. वरिष्ठ आपल्याला हिताचा सल्ला देतील. सहकारी वर्गासह शाब्दिक वाद करू नका. अतिचिकित्सा टाळावी. जोडीदाराच्या साथीने कौटुंबिक पातळीवर मोठी उडी घ्याल. मुलांना शैक्षणिक संधी उपलब्ध होतील. रक्तवाहिन्यांच्या कार्यात बिघाड होण्याची शक्यता!

तूळ चंद्र-मंगळाचा नवपंचम योग हा उत्साहवर्धक योग आहे. काही प्रेरणादायी घटना घडतील. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. नोकरी-व्यवसायात अधिकार पद भूषवाल. ज्येष्ठ वरिष्ठ यांचे पाठबळ मिळवाल. रखडलेली कामे मार्गी लावताना नवी कामे दुर्लक्षित करू नका. सहकारी वर्ग नव्या संकल्पना मांडेल. जोडीदाराचा अट्टहास मान्य कराल. मुलांना स्वावलंबी बनवाल. पोटाचे विकार बळावतील. पथ्य आणि औषधोपचार यांची गरज भासेल.

वृश्चिक बुध-हर्षलचा समसप्तम योग हा संशोधक योग ठरेल. अग्नी राशीतील हर्षल व संतुलित बौद्धिक राशीतील बुध एकमेकांचे सकारात्मक गुणधर्म वाढवण्यास पूरक ठरतील. नोकरी-व्यवसायात हाती घेतलेल्या कामांना गती येईल. वरिष्ठ आणि सहकारी वर्ग यांच्यातला दुवा बनाल. सर्व जबाबदाऱ्या स्वत:वर ओढावून घेऊ नका. आपल्या मर्यादांचे भान ठेवा. कौटुंबिक सदस्य प्रवास करतील. मुलांच्या कामात समाधानकारक प्रगती दिसेल. डोळ्यांची काळजी घ्यावी.

धनू चंद्र-शुक्राचा लाभ योग हा कलात्मक योग आहे. चंद्राच्या कुतूहलातून शुक्राची कला नव्या रूपात सादर कराल. बौद्धिक बाजूदेखील उत्तम प्रकारे सांभाळाल. नव्या संकल्पना राबवताना नव्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल. वरिष्ठांचा विश्वास संपादन करूनही अडचणी सहजी दूर होणार नाहीत. जोडीदाराची मदत घेऊन सातत्य टिकवाल. मित्रमंडळी मदत करतील. डोके दुखणे, पित्त होणे आणि डोळे चुरचुरणे असे त्रास संभवतात.

मकर शनी-चंद्राचा लाभ योग हा शिस्तीचे धडे देणारा योग आहे. चंद्राच्या चंचलतेला शनीच्या सातत्याची जोड मिळाल्याने मोठे आव्हान पेलून धराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांकडून कौतुक होईल. आपल्या अधिकाराचा योग्य उपयोग कराल. सहकारी वर्गाने जमा केलेल्या माहितीचा लाभ होईल. मुलांना प्रवास योग येईल. जोडीदाराचा सल्ला हितावह ठरेल. नातेवाईकांच्या मदतीला जावे लागेल. वातविकार नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यायाम आणि पथ्य आवश्यक!

कुंभ रवी-नेपच्यूनचा नवपंचम योग हा मानसन्मान वाढवणारा योग आहे. वडीलधाऱ्या मंडळींकडून पािठबा मिळेल. नव्या कार्यात स्फूर्ती लाभेल. नोकरी-व्यवसायात वेगळ्या पद्धतीचा अवलंब कराल. वरिष्ठांच्या पसंतीस उतराल. सहकारी वर्ग अनपेक्षितरीत्या मदत करेल. जोडीदाराची कामे मार्गी लागतील. कामाचा वेग वाढेल. मुले आपल्या जबाबदाऱ्या नेटाने पार पाडतील. कामाच्या व्यापामुळे आणि ताणामुळे दमणूक होईल. पर्यायी मार्ग तयार ठेवा.

मीन चंद्र-शुक्राचा केंद्रयोग हा कल्पकतावर्धक योग आहे. चंद्र व शुक्र या स्त्री ग्रहांचा उपयोग कामातील रस वाढवण्यासाठी होईल. कामाची पत सुधारेल. नोकरी-व्यवसायात अपेक्षित बातमी समजेल. वरिष्ठ आपल्याबद्दल सकारात्मक विचार करतील. सहकारी वर्गाचे अंदाज खरे ठरतील. मेहनतीचे फळ मिळेल. जोडीदाराच्या अडचणी समजून घ्याव्या लागतील. मुलांना स्वातंत्र्य द्याल. पाठ, मणका आणि डोळे यांची विशेष काळजी घ्यावी लागेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Astrology from 12 to 18 november 2021 rashibhavishya bhavisha dd

Next Story
जवानांसाठी प्राण केव्हा तळमळणार?
ताज्या बातम्या