सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष रवी व चंद्र या महत्त्वाच्या ग्रहांच्या लाभ योगामुळे अधिकार व मानसन्मान चालून येतील. नोकरी-व्यवसायात अपेक्षित यश मिळवाल.  जोडीदारासह विचारांची देवाणघेवाण कराल. एखाद्या मुद्दय़ावर दुमत झालेच तरी तो बाजूला सारून इतर बाबतीत योग्य निर्णय घ्याल. श्वसन व उत्सर्जन संस्थेचे आरोग्य जपावे.

वृषभ चंद्र-बुधाच्या लाभ योगामुळे नवे विषय आत्मसात कराल. लेखन व वाचन उपयोगी पडेल. नोकरी-व्यवसायात आपले मुद्दे प्रभावीपणे मांडाल. सहकारी वर्गाच्या समस्या वरिष्ठांच्या निदर्शनास आणून द्याल. जोडीदाराला पािठबा द्याल. कौटुंबिक अडचणी सोडवताना ज्येष्ठ मंडळींचा सल्ला उपयोगी ठरेल.

मिथुन चंद्र-नेपच्यूनच्या केंद्र योगामुळे बुद्धीला चालना मिळेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. कामासाठी प्रवास कराल. सहकारी वर्ग मदतीसाठी तयार असेल. जोडीदारासह सूर चांगले जुळतील. कुटुंबात आनंदवार्ता समजतील. त्यामुळे कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. आíथक बाजू भक्कम होईल. पचन व उत्सर्जन संस्थेचे विकार बळावतील. वैद्यकीय उपाय आवश्यक!

कर्क चंद्र-शुक्राच्या केंद्र योगामुळे कल्पनाशक्तीचा विकास होईल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या मताप्रमाणे काम पुढे न्याल. कौटुंबिक वातावरण आनंदी व उत्साही राहील. जोडीदारासह वैचारिक देवाणघेवाण होईल. मित्रमंडळी व नातेवाईक यांच्या भेटीगाठी ठरतील. पित्त व कामाच्या तणावामुळे डोकेदुखी वाढेल.

सिंह चंद्र-बुधाच्या युतीयोगामुळे समयसूचकता दाखवाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. अनुभवातून बरेच काही शिकायला मिळेल. सहकारी वर्गाला मदत कराल. मानसन्मान वाढेल. जोडीदारासह एकमताने निर्णय घ्याल. जनरीत सांभाळून समाजाला प्रगतीचा मार्ग दाखवाल. रक्तदाबावर नियंत्रण ठेवा.

कन्या शनी-चंद्राच्या केंद्र योगामुळे मानसिक स्थर्य कमी होईल. पण आत्मविश्वास ढळू देऊ नका. नोकरी-व्यवसायात स्वीकारलेली जबाबदारी नेटाने निभावून न्याल. जोडीदाराची मानसिक स्थिती जपावी लागेल. कौटुंबिक वातावरण तणावरहित ठेवण्याचा प्रयत्न कराल. सर्दी-खोकल्यावर औषधोपचार करा.

तूळ बुध-नेपच्यूनच्या केंद्र योगामुळे व्यवहार चातुर्याने अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधाल. सहकारी वर्गाला आपला दृष्टिकोन समजावून सांगाल. सहकारी वर्गाकडून फार मोठी मदत मिळेल. जोडीदार त्याच्या जबाबदारीच्या ओझ्याखाली दबून जाईल. त्याची चिडचिड वाढेल. कौटुंबिक वातावरण शांत ठेवण्याची कसोटी आता आपली असेल. रक्ताभिसरण संस्थेचे आरोग्य जपा.

वृश्चिक रवी-हर्षलच्या नवपंचम योगामुळे गटाचे नेतृत्व स्वीकाराल. अधिकारपद भूषवाल. सहकारी वर्गाकडून काम वेळेत पूर्ण करून घेताना कायद्याचा बडगा दाखवावा लागेल. जोडीदारासह सूर चांगले जुळतील. आíथक बाबीतील निर्णय एकमताने घ्याल. लहान-मोठे प्रवास कराल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. ओटीपोटाचे दुखणे, पडणे, मार लागणे या संबंधात काळजी घ्यावी.

धनू चंद्र-मंगळाच्या युतीयोगामुळे अधिकार गाजवण्याची चांगली संधी मिळेल. नोकरी-व्यवसायात परदेशासंबंधित कामाला प्राधान्य द्यावे लागेल. सहकारी वर्गाच्या मदतीने आíथक गणिते सुटतील. जोडीदाराची बाजू शांतपणे ऐकून घ्यावी.  कौटुंबिक वातावरण ठीक राहील. घसा धरणे, सुजणे, इंफेक्शन होणे हे त्रास संभवतात.

मकर शनी-चंद्राच्या लाभ योगामुळे चंद्राच्या चंचलतेला शनीच्या चिकाटीचा लगाम बसेल. किचकट कामे संयम राखून हातावेगळी कराल. सहकारी वर्गाच्या समस्या समजून घ्याल. जोडीदारासह वैचारिक देवाणघेवाण कराल. त्याचा दृष्टिकोन विचारात घ्याल. कौटुंबिक वातावरण शांत व आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कराल.

कुंभ गुरू-चंद्राच्या लाभ योगामुळे विद्य्ोचा व्यासंग जोपासाल. बौद्धिक उत्कर्ष साधाल. नोकरी-व्यवसायात नव्या योजना अमलात आणाल. जोडीदाराची सुयोग्य साथ मिळेल. तो  प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल. कुटुंब सदस्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. नातेवाईक व मित्रमंडळी मदतीसाठी धावून येतील. वातविकाराने त्रस्त व्हाल. घरगुती उपाय करावेत.

मीन बुध-नेपच्यूनच्या केंद्र योगामुळे नावीन्याची झलक दाखवाल. पारंपरिक रूढींचे पालन करून त्यास नवा दृष्टिकोन द्याल. नोकरी-व्यवसायात अडचणीतून मार्ग काढून पुढे जाल. सहकारी वर्ग आनंदाने कामाची जबाबदारी स्वीकारतील. जोडीदाराचा सल्ला मानणे लाभदायक ठरेल. सर्दी, डोकेदुखी यांचा त्रास सहन करावा लागेल.