07 July 2020

News Flash

राशिभविष्य : दि. ८ ते १४ मे २०२०

चंद्र-नेपच्यूनच्या लाभ योगामुळे मनाची चंचलता वाढेल. भावनांना आवर घालाल.

(संग्रहित छायाचित्र)

सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष चंद्र-नेपच्यूनच्या लाभ योगामुळे मनाची चंचलता वाढेल. भावनांना आवर घालाल. नोकरी-व्यवसायात अतिगुंतागुंतीच्या प्रसंगातून मार्ग शोधाल. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभदायी ठरेल. सहकारी वर्ग मदतीसाठी पुढे येईल. जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण कराल. विचारविनिमयाने अंतिम निर्णयाप्रत पोहोचाल. व्यावहारिक गोष्टींची काळजी घ्याल. कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य सांभाळा. तणावामुळे डोकेदुखीचा त्रास वाढण्याच्या शक्यता अधिक आहेत. पित्तविकार बळावतील.

वृषभ चंद्र आणि शुक्र या दोन स्त्री ग्रहांच्या समसप्तम योगामुळे  परिस्थितीवर आपल्या योग्य वागणुकीने मात कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे पाठबळ मिळवाल. सहकारी वर्गाकडून नव्या तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करून घ्याल. जोडीदाराच्या ज्ञानाचा समाजाला फायदा होईल. गरजूंच्या साहाय्यासाठी मदतीचा हात पुढे कराल. कौटुंबिक वातावरणातील ताण कमी करण्याची जबाबदारी स्वीकाराल. उत्सर्जन संस्थेच्या समस्यांवर उपाययोजना करा.

मिथुन चंद्र-मंगळाच्या लाभ योगामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. नव्या समस्या सोडवण्यासाठी बुद्धीला चालना द्याल. नोकरी-व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी शक्य तेवढे सर्व प्रयत्न कराल. सहकारी वर्गावर सोपवलेली कामगिरी त्यांच्याकडून वेळेत पूर्ण करून घ्याल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रातील अपेक्षा पूर्ण होणे लांबणीवर पडेल. त्याला भावनिक आधाराची गरज भासेल. कौटुंबिक वातावरण धिराचे आणि संयमाचे ठेवाल. शिस्तीचा अवलंब कराल.

कर्क चंद्र-गुरूच्या लाभ योगामुळे घेतलेल्या मेहनतीचे चीज होईल. नोकरी-व्यवसायात यश मिळण्यास विलंब लागेल, पण कष्टाचे फळ मिळेल. धीर सोडू नये. फार पुढचा विचार न करता वेळेशी सादर व्हावे. सहकारी वर्गाची साथ चांगली मिळेल. आपल्या मुद्दय़ाकडे सर्वाचे लक्ष वेधून घ्याल. आपल्या प्रसंगावधानामुळे मोठी हानी टळेल. जोडीदाराची मनस्थिती द्विधा होईल. आपण त्यास योग्य मार्गदर्शन कराल. दिलासा द्याल. कुटुंबात उत्साही वातावरण ठेवाल.

सिंह चंचल चंद्र आणि धाडसी मंगळाच्या केंद्र योगामुळे उत्साह आणि अधिकाराच्या नादात भांडणाच्या प्रसंगाला सामोरे जाण्याची शक्यता! नीतिनियमांचे पालन करा. नोकरी-व्यवसायात ज्येष्ठ वरिष्ठांच्या आदेशांचे तंतोतंत अनुकरण कराल. सरकारी कामे ल्यशस्वी होण्यासाठी सर्व बाजूंनी प्रयत्न करणे आवश्यक! जोडीदाराच्या कामातील उत्साह मावळू देऊ नका. त्याला संकटाला सामोरे जाण्याची प्रेरणा द्याल. रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवा.

कन्या रवी आणि चंद्र या दोन आरोग्यकारक ग्रहांच्या नवपंचम योगामुळे परिस्थितीत सुधारणा होईल. हाती घेतलेल्या कामांना गती मिळेल. नोकरी-व्यवसायात नवीन कल्पना मांडाल. याला आधी वरिष्ठांकडून पािठबा मिळणार नाही. पण धीर सोडू नका. सहकारी वर्गाकडून कामे मार्गी लावाल. कायदा हातात घेऊ नका. जोडीदार आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पूर्ण करेल. कुटुंबातील सदस्यांच्या समस्या, अडचणी विचारपूर्वक दूर कराल.

तूळ  मनाचा कारक चंद्र आणि बुद्धीचा कारक बुध यांच्या नवपंचम योगामुळे भावना व व्यवहार यांच्यात समतोल राखाल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. नोकरी-व्यवसायात फायदेशीर व्यवहार कराल. सहकारी वर्गाला वेळेत काम पूर्ण करणे शक्य होणार नाही. आपल्या ताब्यात नसलेल्या गोष्टींचा विचार करून फार त्रास करून घेऊ नका. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. वाद टाळा. रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. हाडे, सांध्याचे आरोग्य सांभाळा.

वृश्चिक चौकस बुध आणि जमावाचा कारक ग्रह प्लुटो यांच्या नवपंचम योगामुळे समाजोपयोगी कामात सहभागी व्हाल. आपल्या छंदांतून नवनिर्मिती कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांकडून वाहवा मिळवाल. सहकारी वर्गाचे प्रश्न समजून घ्याल. नव्या जबाबदाऱ्या स्वीकाराल. नवे करार कराल. मित्रमंडळींच्या मदतीने कठीण प्रसंगाला तोंड द्याल. जोडीदाराचा आधार मिळेल. कौटुंबिक वातावरण आरोग्यदायी राहील. कफ आणि पित्त विकार डोके वर काढतील.

धनू  चिकित्सक बुध आणि प्रगल्भ, संशोधक शनी यांच्या नवपंचम योगामुळे औषधी विज्ञानात परिणामकारक प्रगती कराल. नोकरी-व्यवसायात अभ्यासपूर्ण प्रकल्प सादर कराल. सरकारी कामे धीम्या गतीने पुढे जातील. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात आलेल्या अडचणींमुळे त्याची चिडचिड वाढेल. एकमेकांना सांभाळून घेणे फार गरजेचे आहे. आíथक गणिते नव्याने मांडाल. कुटुंब सदस्यांच्या स्वास्थ्याचा विशेष विचार कराल. काळजी करू नका पण सावधानी बाळगा.

मकर शनी-चंद्राच्या लाभ योगामुळे जिद्द व चिकाटीने हाती घेतलेले काम पूर्णत्वास न्याल. मेहनतीचे फळ मिळेल. नोकरी-व्यवसायात आपल्या कष्टाचे चीज होण्यास विलंब होईल, पण धीर सोडू नका. सहकारी वर्गाला नव्या गोष्टींचे मार्गदर्शन व प्रशिक्षण द्याल. जोडीदाराच्या कार्यात मोलाची मदत कराल. कौटुंबिक जबाबदाऱ्या दोघे मिळून यशस्वीपणे पार पाडाल. ज्येष्ठांच्या आज्ञेचे पालन कराल. दंड, खांदे दुखतील. पित्ताचा त्रास सतावेल. व्यायाम करा. पथ्य पाळा.

कुंभ रवी आणि नेपच्यूनच्या लाभ योगामुळे सर्जनशीलतेला वाव मिळेल. समाजोपयोगी व शारीरिक-मानसिक आरोग्यास हितकारक असे लेखन कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. सहकारी वर्गाला मदतीची गरज भासेल. विधायक कार्यासाठी वेळेचा सदुपयोग कराल. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात उत्तम कामगिरी बजावेल. कुटुंब सदस्यांचा पािठबा मिळेल. घरातील वातावरण उत्साही राहील. गरजूंना मदत कराल. पाठ व कंबर सांभाळा.

मीन चंद्र-शुक्राच्या नवपंचम योगामुळे प्रेम, माया, ममता यांचा नव्याने अनुभव घ्याल. नातेसंबंध दृढ होतील. नोकरी-व्यवसायात नवी आव्हाने पेलाल. वरिष्ठांचा पािठबा मिळाला नाही तरी सहकारी वर्गाची चांगली साथ लाभेल. जोडीदाराला आíथक घडी नीट बसवण्यात साहाय्य कराल. उत्तम नियोजन कराल. घरातील ज्येष्ठ मंडळींचा भक्कम आधार मिळेल. आरोग्य चांगले राहील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2020 12:34 am

Web Title: astrology from 8th to 14th may 2020 rashibhavishya dd70
Next Stories
1 राशिभविष्य : दि. १ ते ७ मे २०२०
2 राशिभविष्य : दि. २४ ते ३० एप्रिल २०२०
3 राशिभविष्य : दि. १७ ते २३ एप्रिल २०२०
Just Now!
X