मेष ज्या व्यक्तीचा सहवास तुम्हास बराच काळ लाभला होता, त्या व्यक्तीच्या लांब जाण्यामुळे एक प्रकारची पोकळी जाणवेल. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात तुम्हाला धडाडीचे काम करावेसे वाटेल. नवीन गुंतवणूक अपरिहार्य होईल. नोकरीच्या ठिकाणी तुम्हालाच स्वयंभू बनावे लागेल. घरामध्ये त्याच त्याच विषयावर पुन्हा पुन्हा चर्चा झाल्याने तुम्हाला थोडासा कंटाळा येईल. देणीघेणी, डागडुजीकरिता चार पसे राखून ठेवा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृषभ कल्पनेच्या विश्वामध्ये रमणारी तुमची रास नाही. व्यक्तिगत बाबतीत तुम्ही थोडेसे हळवे बनाल. व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात आठवडय़ाची सुरुवात आणि शेवट तुमच्या दृष्टीने लाभदायक ठरेल. आपण केलेल्या कष्टाचे चीज झाले आहे असे तुम्हाला वाटेल. कामगारांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे लागेल. नोकरीमध्ये एखादे काम पूर्ण करण्याकरता तुम्ही अथक मेहनत घ्याल. तुमचा कामाचा दर्जा उत्तम राहील. घरामध्ये एखादा बेत ठरवताना गरमागरम चर्चा होईल. तुम्ही तुमचे विचार इतरांना पटवून द्याल.

मराठीतील सर्व भविष्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Astrology 19th to 25th may
First published on: 19-05-2017 at 01:01 IST