मेष कोणतेही काम करत असताना जेव्हा वेळ मिळेल त्यावेळी तुम्ही हलक्या फुलक्या क्षणांचाही आनंद घेता. व्यापार-उद्योगात जरी काम थोडे कमी असले तरी गरजेएवढे पसे मिळतील. नोकरीमध्ये वरिष्ठ तुम्हाला गोंजारून आणि चुचकारून एखादे वेगळे काम तुमच्याकडून करून घेतील. नातेवाईक आणि मित्रमंडळीबरोबर एखादा कार्यक्रम ठरला असेल तर तो आनंदात पार पडेल. महिला त्यांची हौस पुरवून घेतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृषभ भरपूर काम करण्याची तुमची इच्छा असेल, या स्वभावावर मुरड घालावी लागेल. व्यापार-उद्योगात जे पसे मिळालेले आहेत ते खर्च करताना तुम्हाला दु:ख होईल. तरीपण तातडीची देणी द्यावीच लागतील. जोडधंदा असणाऱ्यांनी वसुलीवर भर ठेवावा. नोकरीमध्ये प्रत्यक्ष काम कमी पण कामाचा दिखावा जास्त असेल. बेकार व्यक्तींनी त्यांच्या प्रयत्नात कसूर करून चालणार नाही. घरामध्ये प्रत्येक जण स्वत:च्या नादात असेल. खर्चाची जबाबदारी कोणीच घेणार नाही.

मिथुन वेगवेगळ्या वातावरणात वेगवेगळ्या व्यक्तींशी समरस व्हायला तुम्हाला आवडते. तशी संधी तुम्हाला या आठवडय़ात मिळेल. व्यापार-उद्योगात पूर्वी केलेल्या जाहिरातबाजीचा उपयोग होईल. केलेल्या कामाची गिऱ्हाईकांकडून स्तुती ऐकायला मिळेल. नोकरीच्या ठिकाणी जे काम इतरांवर सोपवलेले होते ते व्यवस्थितपणे पार न पडल्यामुळे अखेर तुम्हीच त्याचा फडशा पाडाल. घरामध्ये सर्वानुमते एखादा करमणुकीचा कार्यक्रम ठरेल. त्याचे नियोजन तुमच्या हातात असेल.

कर्क तुमच्या दृष्टीने जी महत्त्वाची कामे आहेत त्याला सप्ताहाच्या सुरुवातीला वेग द्या. व्यापार-उद्योगात वसुलीला महत्त्व द्या. त्यामध्ये जरी मागे-पुढे झाले तरी गिऱ्हाईकांना नाराज करू नका. एखादा नवीन आणि चांगला प्रकल्प तुमच्या मनात घोळत राहील. नोकरीमध्ये वरिष्ठ पूर्वी ठरविलेले एखादे काम हातात घेण्यासाठी आग्रह धरतील. घरामध्ये सर्वकाही छान असेल. पशाचा हिशेब कागदावर मांडल्यानंतर प्रत्येक गोष्ट बजेटबाहेर गेली आहे असे लक्षात येईल.

सिंह कामाच्या वेळी काम करायचे आणि इतर वेळेला थोडा आराम करायचा असा तुमचा मूड असेल. व्यापार-उद्योगात महत्त्वाची कामे अर्धवट राहिली असतील तर त्याचा तुम्ही पाठपुरावा कराल. पशाची आवक समाधानकारक असेल. नोकरीच्या ठिकाणी जी कामे पूर्वी काही कारणाने लांबवावी लागली होती ती हातावेगळी कराल. नवीन नोकरीच्या कामाला ताबडतोब वेग द्या. घरामध्ये जे काम तुम्हाला मनापासून आवडते त्यामध्ये लक्ष घालाल.

कन्या जी गोष्ट तुम्हाला मनापासून आवडते ती करायला मिळाल्यामुळे तुम्ही आनंदी आणि समाधानी दिसाल. व्यवसाय-उद्योगात कल्पना लढवून उलाढाल आणि फायद्याचे प्रमाण वाढविण्यास तुमचा भर राहील. नोकरीच्या ठिकाणी एखाद्या मीटिंगमध्ये तुमच्या बोलण्यामुळे तुम्ही इतरांवर छाप टाकाल. बेकार व्यक्तींना नोकरी मिळेल. घरामध्ये काही तरी नावीन्यपूर्ण कल्पना तुमच्या मनात येईल. प्रवासाचे बेत अर्धवट राहिलेले असतील तर ते पूर्ण करता येतील.

तूळ तुमच्या उत्साहाला उधाण आणणारे  ग्रहमान आहे. मनात आलेली इच्छा पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला चन पडणार नाही. व्यवसाय-उद्योगात  कोणत्याही कारणाकरिता कर्ज घेतले असेल तर त्याची परतफेड करा. जोडधंदा असणाऱ्यांचा खिसा गरम राहील. नवीन नोकरीकरिता प्रयत्न करणाऱ्यांना मुलाखतीत यश मिळेल. चालू असलेल्या कामात संस्थेचे प्रतिनिधित्व करण्याची तुम्हाला संधी मिळेल.

वृश्चिक तुमच्या हौशी आणि महत्त्वाकांक्षी स्वभावाला खतपाणी घालणारे  ग्रहमान आहे. जे काम तुम्ही हातात घ्याल, त्यातून आपला फायदा झालाच पाहिजे असा तुमचा आग्रह असेल.  व्यवसाय-उद्योगात एखादे तातडीचे काम नियंत्रणात आणण्यासाठी छोटा प्रवास कराल. जोडधंद्यातून कमाई होईल. नोकरीच्या ठिकाणी कामाच्या वेळी काम आणि इतर वेळेला अराम असे धोरण ठेवून वागाल. घरामध्ये सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडवून आणण्याकरिता इतरांशी गोड बोलाल.

धनू एका कष्टदायक पर्वाची सांगता झाल्यामुळे तुमच्या मनावरचा ताण कमी होईल. व्यापार-उद्योगात खर्च वाढल्यामुळे थोडासा तणाव आला असेल तर काळजी करण्याचे कारण नाही. कोणत्या तरी वेगळ्या मार्गाने पसा मिळाल्याने तुमचे मन शांत होईल. नोकरीच्या ठिकाणी सप्ताहाच्या सुरुवातीला एखादे बेचव काम करावे लागेल. नवीन नोकरीच्या शोधात सफलता मिळेल. घरामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे झाली पाहिजे असा तुमचा आग्रह असेल.

मकर प्रगती म्हटली की, बदल अनिवार्य असतात. तसे काही बदल आता नजरेच्या टप्प्यात असतील. त्यामळे कदाचित तुमच्या दैनंदिनीवर त्याचा परिणाम जाणवेल. व्यापार-उद्योगात पशाची आवक चांगली राहील. नोकरीमध्ये बदली हवी असेल तर जरुर प्रयत्न करा. काही जणांना देशात किंवा परदेशात नोकरीकरिता प्रयत्न करावासा वाटेल. चालू असलेल्या कामात तुमचा वेग उत्तम राहील. घरामध्ये तुमचे विचार इतरांच्या गळी उतरविण्यात तुम्ही सफल व्हाल.

कुंभ तुमची जिद्द आणि महत्त्वाकांक्षा वाढविणारे हे ग्रहमान आहे. प्रत्येक गोष्ट वेळेत पूर्ण करण्यावर तुमचा भर असेल त्यानुसार सर्व कार्यक्रम आखाल. व्यापार-उद्योगात तुम्ही केलेल्या कामाचे इतरांकडून कौतुक ऐकायला मिळेल. बाजारातील पत वाढविण्याकरिता एखाद्या सामूहिक कामात भाग घ्याल. नोकरीच्या ठिकाणी जे काम इतरांना जमले नाही ते काम तुमच्या वाटय़ाला आल्यामुळे तुमचा भाव वधारेल. घरामध्ये कुटुंबीयांसह समारंभाचा आंनद घ्याल.

मीन ग्रहमान सुधारल्यामुळे तुमच्यामध्ये उत्साहाची एक नवीन ऊर्मी निर्माण होईल. नेहमीच्या कामाचा आळस आला असला तरी तुम्ही जीवनाचा आस्वाद घ्यायचे ठरवाल. जी कामे पूर्वी काही कारणाने लांबवावी लागली होती त्यात लक्ष घालाल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याकरिता तुम्हाला पुढे पुढे करावेसे वाटेल. घरामधल्या व्यक्ती तुमच्याबरोबर एखाद्या करमणुकीच्या कार्यक्रमात सहभागी होतील. विवाह, वास्तुशांत वगरे कार्यक्रमात तुमचा पुढाकार असेल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व भविष्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Astrology
First published on: 04-11-2016 at 13:19 IST