मेष काळाचे चक्र कोणाहीकरिता थांबत नाही. कोणताही निर्णय घाईने घेऊ नका. व्यापार-उद्योगात स्पर्धकांच्या गोटात काय चालले आहे याकडे नीट लक्ष ठेवा. पशाची आवक वाढवण्याकरिता प्रयत्न कराल. नोकरीमध्ये तुमच्या संस्थेत होणारे बदल कोडे निर्माण करतील. तुमचे विचार उघडपणे व्यक्त करू नका. घरामध्ये मोठय़ा व्यक्तीच्या जीवनात काही घडामोडी अचानक घडण्याची शक्यता आहे. त्यांना सांभाळून घ्यावे लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृषभ तडकाफडकी कोणताही निर्णय घेण्याचा तुमचा स्वभाव नाही. बऱ्याच वेळेला कुटुंबातील व्यक्तींना काय वाटेल याचा तुम्ही आधी विचार करता आणि नंतर निर्णय घेता. व्यापार-उद्योगात नवीन आíथक वर्षांकरिता काही बेत आखून ठेवले असतील तर त्यामध्ये फेरफार होण्याची शक्यता आहे. स्पर्धकांकडे लक्ष ठेवा. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या शब्दाला मान द्या. कामाच्या स्वरूपात बदली पाहिजे असेल तर प्रयत्न करा. घरामध्ये सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडाव्यात असा तुमचा हट्ट असेल.

मराठीतील सर्व भविष्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Astrology from 7 to 13 april
First published on: 07-04-2017 at 01:05 IST