सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com
मेष चंद्र-शुक्राचा समसप्तम योग हा आपल्यातील निर्मितीक्षमतेला उत्तेजन देणारा योग आहे. नोकरी-व्यवसायातील कामकाज धिम्या गतीने पुढे सरकेल. वेळेचे नियोजन उपयोगी पडेल. जोडीदाराचा सहभाग उल्लेखनीय असेल. मुलांच्या समस्यांचा अतिविचार न करता त्यावर उपाय शोधावा. ताण घेतल्याने डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागेल. काळजी घ्यावी.

वृषभ चंद्र-नेपच्यूनचा केंद्र योग हा कलात्मकतेचा आदर करणारा योग आहे. नावीन्यपूर्ण पद्धतीने एखाद्या गोष्टीची रचना करणे सहज शक्य होईल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या सल्ल्याने मार्गक्रमण केल्याने प्रगती होईल. सहकारी वर्गाच्या साहाय्याने कामातील अडचणी दूर होतील. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात यश मिळेल. मुलांना योग्य दिशा द्याल. उत्सर्जन संस्थेचे विकार बळावतील. पथ्यपाणी सांभाळा.

Venus And Sun Yuti
हनुमान जयंतीनंतर ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? अनेक वर्षांनी ‘शुक्रादित्य राजयोग’ घडल्याने मिळू शकते व्यवसायात मोठे यश
Shukra Gochar 2024
शुक्राचे राशी परिवर्तन होताच जुळून आलेत ३ शुभ राजयोग; ‘या’ राशींचे बदलेल भाग्य? २३ एप्रिलपर्यंत होऊ शकतात फायदेच फायदे
1 to 7 April 2024 Weekly Horoscope
७ एप्रिलपर्यंत लक्ष्मी नारायणासह ३ राजयोग बनल्याने कर्क- कन्यासह ‘या’ राशी जगतील अच्छे दिन, १२ राशींचे भविष्य वाचा
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

मिथुन रवी-चंद्राचा नवपंचम योग हा कीर्ती आणि प्रसिद्धी देणारा योग आहे. मनातील संकल्पनेला आकार द्यल. नोकरी-व्यवसायात ज्येष्ठ वरिष्ठ मंडळींचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. सहकारी वर्गाच्या मदतीने मोठी व महत्त्वाची जबाबदारी पूर्ण कराल. कौटुंबिक वातावरण शांत राहील. जोडीदाराचा पाठिंबा मिळवाल. नात्यातील कटुता दूर कराल. उत्सर्जन संस्थेत बिघाड होईल. त्वचेचे विकार बळावतील.

कर्क चंद्र-बुधाचा समसप्तम योग हा चंद्राच्या कुतूहलाला बुधाच्या बुद्धिमत्तेची जोड देईल. त्यामुळे उत्तम कलाकृतीची निर्मिती कराल. नोकरी-व्यवसायात आळस झटकून कामाला लागावे. वरिष्ठांसह मतभेद होतील. जोडीदाराची कामे मंदावल्याने त्याची चिडचिड वाढेल. एकमेकांना समजून घेण्याची गरज भासेल. जबाबदारीची जाणीव मुलांना करून द्यावी. पाय वळणे, पेटके येणे असा त्रास संभवतो.

सिंह गुरू-चंद्राचा समसप्तम योग हा मार्गदर्शक योग आहे. नव्या कामात ज्येष्ठ, अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. हाती घेतलेली कामे जिद्दीने पूर्ण कराल. वरिष्ठ मंडळींचा पािठबा मिळवाल.  सहकारी वर्गाला त्यांच्या वैयक्तिक बाबीत मदत कराल. जोडीदारासह वेळ आनंदात जाईल. कर्तव्यपूर्तीचे समाधान मिळेल. मुलांची हुशारी दिसून येईल. गुडघे आखडतील. सांधे आणि मानेची काळजी घ्यावी.

कन्या गुरू-हर्षलचा लाभ योग हा बलवान योग आहे. गुरूचे ज्ञान, हर्षलचे तंत्रज्ञान यांची साथ मिळाल्याने संशोधनात्मक कामे वेग घेतील. सरकारी कामाला नवे वळण मिळेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या पाठबळामुळे नवे करार कराल. सहकारी वर्गाची साथ चांगली मिळेल. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात अधिक व्यस्त असेल.  मुलांच्या मेहनतीला योग्य दिशा द्या! ओटीपोटाचे दुखणे उद्भवेल.

तूळ चंद्र-गुरूचा नवपंचम योग हा कृतिशीलतेला नवी दिशा देणारा योग आहे. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा कल पाहून आपले विचार मांडावे. सहकारी वर्गासह वाद घालू नका. जोडीदाराच्या कामकाजाचा वेग वाढेल. कौटुंबिक वातावरण शांत ठेवणे आवश्यक! आर्थिक बाबींसंबंधित निर्णय घेताना फेरविचार करावा. मुलांच्या कामात, अभ्यासात प्रगती होईल. अंगदुखीमुळे सुस्ती येईल.

वृश्चिक चंद्र-हर्षलचा नवपंचम योग हा संशोधनास पूरक योग आहे. स्वभावातील चंचलतेला सकारात्मक वळण देऊन ऊर्जा सत्कारणी लावाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या पािठब्यामुळे कामाला गती येईल. मेहनत घ्यायची तयारी ठेवावी. सहकारी वर्गाला प्रशिक्षण द्याल. जोडीदाराची मते जाणून घ्याल. मुलांच्या गरजा वाढतील. अतिविचाराने दमणूक होईल. डोके जड होईल.

धनू चंद्र-मंगळाचा समसप्तम योग हा उत्साहवर्धक योग आहे. नव्या संकल्पना मांडाल आणि त्या अमलात आणण्यासाठी प्रयत्न कराल. नोकरी-व्यवसायात नवी जबाबदारी स्वीकाराल.  वरिष्ठांच्या विश्वासास पात्र ठराल. सातत्य सोडू नका. जोडीदाराचा पािठबा मिळेल. त्याच्या कामकाजात अडचणी येतील. मुलांच्या बाबतीत अतिभावुक होऊ नका. दंतविकार बळावतील.

मकर चंद्र-शनीचा समसप्तम योग हा चंद्राच्या उत्सुकतेला शनीच्या चिकाटीची जोड देणारा योग आहे. नव्या प्रकल्पासाठी आपली निवड होईल. उत्साह वाढेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा शब्द तंतोतंत पाळाल. जोडीदाराची चांगली साथ मिळाल्याने हुरूप येईल. कौटुंबिक नाती जोपासाल. मुलांना पाठबळ द्याल. स्नायूंमध्ये पेटके येतील. शिरा आखडतील. व्यायाम आणि विश्रांतीही आवश्यक!

कुंभ चंद्र-नेपच्यूनचा नवपंचम योग हा आपल्या भावभावनांना हेलकावे देणारा योग आहे. नोकरी-व्यवसायात वरिष्ठ आणि सहकारी वर्ग यांच्यातील वैचारिक दरी कमी करण्याचा प्रयत्न कराल. जोडीदाराच्या कामाचा व्याप वाढेल. कौटुंबिक बाबींमध्ये एकत्रितपणे लक्ष घालाल. नातेवाईकांचे गैरसमज दूर कराल. परिस्थितीचा मानसिक ताण घेऊ नका. अपचन व वाताचा त्रास होईल.

मीन मंगळ अणि शुक्र या एकमेकांना पूरक आणि पोषक ग्रहांच्या युतीयोगामुळे कलात्मक दृष्टीला धाडसी निर्णय घेण्यासाठी पुष्टी मिळेल. नोकरी-व्यवसायात आपल्या मताला फारशी किंमत मिळाली नाही तरी आपला मुद्दा सोडू नका. जोडीदाराचा सल्ला उपयोगी पडेल. मुले त्यांच्या आवडत्या क्षेत्रात बाजी मारतील.  रक्तवाहिन्यांच्या संबंधित त्रास उद्भवतील. वैद्यकीय उपचार घ्यावेत.