मेष तुमच्या राशीमध्ये स्वाभाविक नेतृत्व आहे. अपेक्षित व्यक्तींकडून साथ न मिळाल्याने तुम्हाला एकटय़ाने काम करावे लागेल. व्यापारउद्योगात  प्रत्येक कामाचे नियोजन कागदावर मांडून ठेवणे चांगले. पशाची आवक सुधारण्याची लक्षणे दिसतील. नोकरीच्या ठिकाणी पूर्वी ठरविलेले काम वरिष्ठांनी अचानक बदलल्यामुळे तुमचा गोंधळ उडेल. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींच्या वागण्याचा अर्थ लावणे कठीण होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृषभ या आठवडय़ात ‘विना सहकार नाही उद्धार’ याची आठवण ठेवा. गोड बोलून सभोवतालच्या व्यक्तींकडून मदत मिळवा. व्यापारउद्योगात  एखादे अवघड काम मार्गी लावण्याचा तुम्ही निश्चय कराल. गरजेइतके पसे मिळतील, पण ते शिल्लक राहणार नाहीत. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्या कामाची स्तुती करतील. त्यांना तुमच्याकडून जास्त काम करून घ्यायचे असेल, हा त्यांचा मतलब नंतर लक्षात येईल. घरामध्ये पाहुण्यांची ये-जा राहील. त्यांच्याबरोबर बरेच कार्यक्रम ठरतील. खर्च बजेटबाहेर जाईल.

मिथुन काळाची गरज आणि बदलत्या वातावरणाचा परिणाम यामुळे कार्यपद्धतीमध्ये फेरफार करणे भाग पडेल. व्यापारी वर्गाला गिऱ्हाईकांना खूश करण्याकरिता एखाद्या चाकोरीबाहेरच्या मार्गाचा विचार करावासा वाटेल. त्यावर शिक्कामोर्तब करण्यापूर्वी आकडेमोड करणे आवश्यक आहे.  नोकरदार व्यक्तींना वरिष्ठ त्यांच्या पद्धतीने काम करण्याचे स्वातंत्र्य देतील. त्यामुळे ज्या कामातून  जास्त फायदा आहे असे काम ते स्वीकारतील. आवडती व्यक्ती लांब गेल्याने पोकळी जाणवेल.

कर्क सर्व ग्रहमान काही महत्त्वाचे बदल सूचित करणार आहे. जे निर्णय घेण्यामध्ये काही कारणाने विलंब झाला होता ते घेण्याचे धाडस तुमच्यात निर्माण होईल. व्यापारउद्योगात नवीन आणि जुन्या पद्धतींचा अवलंब करून फायदा करून घ्याल. उत्पन्न वाढविणारे काम मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार व्यक्तींना त्यांच्या चांगल्या कामामुळे वरिष्ठ वेगळ्या प्रोजेक्टकरिता निवडण्याची शक्यता आहे.  कामाच्या व्यापामुळे घराकडे म्हणावे तसे लक्ष देऊ शकणार नाही.

सिंह असे म्हणतात की, ज्या वेळेला सर्व काही ठीक चालू असते त्या वेळी सभोवतालच्या व्यक्ती आपल्याला खूश ठेवून त्यांचा मतलब साधतात; पण या आठवडय़ात ‘कठीण समय येता कोण कामास येतो’ याची तुम्हाला आठवण येईल.  व्यापार-उद्योगात भविष्यामध्ये काही तरी मिळविण्याकरिता आज तुम्हाला गरसोय सहन करावी लागेल. घरामधल्या व्यक्तींना तुमची अडचण समजेल; पण ते बघ्याची भूमिका घेतील.

कन्या तुमच्या करियरमध्ये एखादे अवघड काम तुम्ही जिद्दीच्या जोरावर पार पाडाल. व्यक्तिगत जीवनात मात्र काही कारण नसताना इतरांकरिता तडजोड करावी लागेल. व्यापारउद्योगात आपली लक्ष्मणरेषा ओळखून तुम्ही काम केलेत तर ते चांगल्या पद्धतीने पार पडेल. नोकरीमध्ये एखादे अवघड काम तुम्ही मार्गी लावण्यासाठी तुम्हाला काही ठिकाणी शॉर्टकट शोधून काढावा लागेल. घरामध्ये आवडत्या व्यक्तीकडून गोष्टीला नकार मिळाल्याने थोडीशी निराशा येईल. त्यामुळे आयत्या वेळी आपले कोणी नसते, याचा अनुभव येईल.

तूळ स्वभावत: तुमची रास चंचल नाही; पण कामामध्ये व्यग्र राहणे तुम्ही पसंत करता. या आठवडय़ात तुम्हाला प्रत्येक काम एकटय़ाने हाताळण्याची तयारी ठेवावी लागेल. व्यापार-उद्योगात सुरुवात थोडीशी खर्चीक होईल. नंतर पसे मिळाल्यावर तुमचे मन शांत होईल. नोकरदार व्यक्तींना एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर अशा पद्धतीने काम करावे लागेल. त्यामुळे एक चांगला अनुभव गाठीशी जमा होईल. घरामध्ये एखाद्या समस्येमध्ये तुम्ही मार्ग शोधून काढाल. सर्व जण तुमचे कौतुक करतील.

वृश्चिक ज्या वेळेला एखादी गोष्ट तुमच्या मनामध्ये असते त्या वेळी त्याचा तुम्ही पिच्छा पुरवता. त्याकरिता किती कष्ट पडतील याचा विचार करत नाही. याच कारणामुळे मनासारखे यश मिळेल. व्यापार-उद्योगात मनातील अनेक योजना आणि प्रकल्पा-करिता मोठय़ा प्रमाणावर भांडवलाची गरज भासेल. नोकरीमध्ये वरिष्ठ तुम्हाला गोंजारून आणि चुचकारून तुमच्याकडून जादा काम करवून घेतील. घरामध्ये प्रत्येकाचे तोंड वेगळ्या दिशेने असल्यामुळे कोणत्याही विषयावर एकमत होणार नाही.

धनू ज्या ठिकाणी जशी गरज असेल त्याप्रमाणे तुम्ही तुमचा पवित्रा बदलाल. सभोवतालच्या व्यक्तींना तुम्ही म्हणजे एक कोडे वाटाल. व्यापार-उद्योगाच्या भावनेपेक्षा व्यवहाराला जास्त महत्त्व द्या, नाही तर चुकीचा निर्णय होऊन बसेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ अचानक संस्थेच्या गरजेनुसार कामाच्या स्वरूपामध्ये बदल करतील. नवीन पद्धतीमुळे तुमचे कष्ट वाढण्याची शक्यता आहे. घरामध्ये छोटेमोठे खटके उडतील.

मकर एकटय़ाने काम करणे ही गोष्ट तुमच्या दृष्टीने वेगळी नाही; किंबहुना अशा पद्धतीने काम केलेले तुम्हाला या आठवडय़ात मिळेल. व्यापार-उद्योगात जी कामे पुढे करायची आहेत त्याचा आढावा घ्याल. अर्धवट राहिलेली कामे घाईगडबडीत पूर्ण कराल. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला थोडासा आळस येईल; पण वरिष्ठ स्वस्थ बसू देणार नाहीत. घरामध्ये लहान-मोठय़ा व्यक्तींच्या गरजांकडे लक्ष द्यावे लागेल.  अत्यावश्यक खर्च वाढल्यामुळे त्याचे नियोजन करावे लागेल.

कुंभ या आठवडय़ामध्ये उसने अवसान आणून तुम्हाला काम करायचे आहे. ज्यांच्यावर तुम्ही अवलंबून होता त्यांची काही तरी अडचण निघेल.  व्यापार-उद्योगात तुमचा कामाचा वेग चांगला राहील. एखादा निर्णय पटकन घेण्याकरिता कामाची पद्धत बदलाल. नोकरीच्या ठिकाणी टेबलवर्क आणि बाहेरचे काम अशी दोन्ही कामे तुम्हाला हाताळावी लागतील. घरामध्ये काही मुद्दय़ांवर तुमचे इतरांशी मतभेद होतील. तुमच्या वागण्या-बोलण्यामुळे गरसमज होणार नाहीत याची दक्षता घ्या.

मीन ‘इच्छा आहे तिथे मार्ग आहे’ हे तुम्ही तुमच्या कृतीतून सिद्ध कराल. प्रिय व्यक्तींची तुम्हाला साथ नसेल. व्यापार-उद्योगात धाडस करून एखादा मोठा हात मारावासा वाटेल. जोडधंदा असणाऱ्या व्यक्ती गिऱ्हाईकांना खूश ठेवतील. नोकरीत स्वत:चे महत्त्व वाढवण्याकरिता वरिष्ठांच्या पुढे पुढे कराल. कामाचा दर्जा वाढवण्याकरिता एखादे प्रशिक्षण घ्यावे लागेल. घरामध्ये सर्व आघाडय़ा सांभाळताना तुमची धावपळ उडेल.
विजय केळकर – response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व भविष्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Weekly astrology from 31 march to 6 april
First published on: 31-03-2017 at 12:37 IST