सगळा मे महिना सैराटमय झाला होता. काही चित्रपटांना आपल्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलाव्या लागल्या. त्यामुळे आता जून महिन्यात मात्र भन्साळी बॅनरचा ‘लाल इश्क’, बोनी कपूर यांचा ‘लालबागची राणी’, एनएफडीसीचा ‘वीस म्हणजे वीस’, ‘चीटर’, ‘कुलकर्णी व्हर्सेस कुलकर्णी’ आणि ‘बर्नी’ या चित्रपटांबरोबरच ‘उदाहरणार्थ नेमाडे’ या डॉक्यु ड्रामाचीदेखील प्रतीक्षा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यंदाची उन्हाळी सुट्टी चढत्या तापमानाने गाजली, तशीच सैराटमुळेदेखील चर्चेत राहिली. यशस्वी चित्रपट म्हणून जेवढी चर्चा झाली नसेल तेवढी सैराटमुळे निर्माण झालेल्या तथाकथित जातीधर्माच्या वादाने ही भट्टी आणखीनच तापवली होती. पण अनेक वर्षांनतर चित्रपटगृहात गाण्यावर लोकांनी नाच वगैरे केला, समीक्षकांनी गौरवलं, जाणत्या प्रेक्षकांनादेखील भावला असं बरंच काही येथे जुळून आलं. अर्थातच ही चर्चा अजून बराच काळ सुरू राहील. एक मात्र नक्की की ‘चित्रपटाकडे चित्रपट म्हणून पाहावे’ अशी एक चर्चा यातून किमान पुढे आली. हा मुद्दा आपल्याकडे सिनेमा संस्कृती विकसित होण्याच्या दृष्टीने आशा पल्लवित करणारा भाग म्हणता येईल.

मराठीतील सर्व चित्रवार्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi movies releasing in june
First published on: 27-05-2016 at 01:15 IST