शहरांमध्ये मिळेल तेवढय़ा जागेत कशाबशा बांधलेल्या घरांमुळे वास्तुशास्त्राचा अजिबात विचार होत नाही आणि अशा घरांच्या रचनेचा त्यात राहणाऱ्यांच्या स्वभावावर परिणाम होत असतो, असे या क्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे.
माणसाच्या बारूपाचा तसेच स्वभावाचा अंदाज त्याच्या जन्मकुंडलीवरून ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकाला लावता येतो. परंतु कालांतराने ह्य सर्वात बदल घडायला लागतो. आपल्या आजूबाजूची भौगोलिक, सामाजिक परिस्थिती, वातावरणातील बदल, प्रदूषण, इ. अनेक घटक ह्य बदलाला कारणीभूत होत असतात. ह्य सर्व घटकांबरोबरच एक अत्यंत महत्त्वाचा घटक आपल्या स्वभावावर प्रभाव टाकत असतो आणि तो म्हणजे आपली राहती तसेच कार्यालयीन वास्तू.
वास्तुशास्त्राचा आणि ज्योतिषशास्त्राचा अतिशय निकटचा संबंध आहे. वास्तुशास्त्राच्या नियमांना डावलून बांधलेल्या घरात राहण्याऱ्या व्यक्ती नेहमी कसल्याना कसल्या तरी मानसिक तणावाखाली जगताना आढळतात व याचा विपरीत परिणाम त्यांच्या नातेसंबंधांवर, मैत्रीवर व एकूणच आयुष्यावर होतो. तो कसा व कधी ते आपण आता पाहू.
अलीकडच्या काळात शहरांची लोकसंख्या वेगाने वाढत चालली आहे, राहण्याच्या तसेच कार्यालयीन जागांची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे वास्तुशास्त्राला खिजगणतीत न धरता इमारती उभ्या राहत आहेत.
वास्तूचे स्वभावावर परिणाम
वास्तुशास्त्रानुसार प्लॉट अथवा फ्लॅटचा आकार हा चौरस असावा (आयताकृती चालेल), परंतु या नियमाच्या विपरीत अशी अत्यंत वेडय़ावाकडय़ा आकाराची, दिशांचे महत्त्व लक्षात न घेता बांधलेली घरे दोष निर्माण करतात.
आपल्या घरातील दिशा ओळखण्यासाठी एक साधी कृती करता येईल. बाजारातून एक साधं होकायंत्र आणून घराची उत्तर दिशा शोधावी. त्यानुसार इतर दिशादेखील समजतील.
वास्तूशास्त्रानुसार अनेक निकषांवर दिशा सदोष अथवा निर्दोष ठरतात. अगदी ढोबळमानाने सांगायचे तर एखाद्या दिशेला शौचालय असेल, ती दिशा पूर्णपणे बंद असेल किंवा त्यादिशेला अपेक्षित असलेली व्यवस्था आली नसेल (म्हणजे एखाद्या दिशेला स्वयंपाकघर होणार असेल, पण ते झालेच नसेल) तर त्या असे घटक त्या दिशेमध्ये दोष निर्माण करतात. अर्थातच ती दिशा सदोष मानावी. असे दोष नसणे म्हणजेच ती दिशा निर्दोष मानावी.
अर्थात ही ढोबळ परिमाणे झाली. दिशेचे सदोष-निदोर्षत्व ठरविण्यासाठी वास्तूशास्त्रात अनेक निकष असून त्यासाठी सखोल अभ्यासाची गरज आहे. ढोबळ मानाने प्रत्येक दिशेचे सदोष निदरेषत्व आपल्यावर काय परिणाम करते ते पाहू.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पूर्व दिशा
निर्दोष असता :
स्वभाव प्रेमळ, त्यागी, कष्टाळू असतो. स्वत:हून दुसऱ्याच्या मदतीला धावून जातात. केवळ स्वत:च्याच कुटुंबाचा विचार न करता इतरांनाही कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच वागणूक देतात. प्रसिद्धीची आवड असते. संततीच्या बुद्धीत व ज्ञानात वाढ होते.
सदोष असता :
स्वभाव उतावळा, असंयमी, भावनेच्या आहारी जाणारा तसेच अव्यवहारी असतो. मन:स्थिती सतत द्विधा असते व त्यामुळे निर्णयक्षमतेचा अभाव असतो.

मराठीतील सर्व कव्हर स्टोरी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vaastu science and nature
First published on: 25-12-2015 at 02:22 IST