News Flash

नेल आर्ट घरी करता येईल?

मला नेलपेंट लावायला आवडतं. पण वेगवेगळ्या ओकेजन्सला वेगवेगळे कलर्स कसे निवडावे. तसंच नेलआर्ट घरच्या घरी करता येऊ शकतं का? कारण दरवेळी पार्लरला जाणं खर्चीक असतं.

| April 10, 2015 01:06 am

नेल आर्ट घरी करता येईल?

मला नेलपेंट लावायला आवडतं. पण वेगवेगळ्या ओकेजन्सला वेगवेगळे कलर्स कसे निवडावे. तसंच नेलआर्ट घरच्या घरी करता येऊ शकतं का? कारण दरवेळी पार्लरला जाणं खर्चीक असतं.
– कृतिका, २०

खरं सांगू कृतिका नेलपेंट्स लावणं हा आपल्या ड्रेसिंगमधला छोटासा भाग आहे. पण म्हणतात ना, स्मॉल थिंग्स मेक्स डिफरन्स. नेलपेंट्स तसंच काम करतात. एकतर त्याला कितीतरी छटा असतात, त्या पाहतानाच कलिजा खल्लास होतो, परत हव्या त्या पद्धतीने तुम्हाला त्यात प्रयोग करता येतात. आता तुझ्या प्रश्नाकडे येताना, नेलपेंट निवडताना सगळ्यात पहिले सध्या कोणते रंग ट्रेंडमध्ये आहेत हे जाणून घेऊ या. इंग्लिश कलर्स नेलपेंट ट्रेंडमध्ये आहेत. त्यामुळे फुशिया, बेबी पिंक, फिकट जांभळा, फिकट पिवळा, आकाशी असे रंग वापरता येतील. सोबत नेव्ही, र्बगडी, ग्रे या गडद रंगांच्या शिमर शेड्स सुद्धा ट्रेंडमध्ये आहेत. वेल्व्हेट फिनिश नेलपेंट नव्याने या सिझनमध्ये आले आहेत. न्यूड शेड तर कधी आऊट ऑफ फॅशन होणं शक्यच नाही. त्यामुळे हे रंग वापरून पाहा. आता प्रश्न कधी कोणती शेड वापरायची, तर सकाळी शक्यतो लाइट शेड्स वापराव्यात आणि रात्री पार्टीसाठी शिमर शेड्स वापरता येतील. लाल रंगाची तुझ्या स्कीन टोनला जुळून येणारी शेड निवडलीस तर ती सिंपल ड्रेसलासुद्धा फोकसमध्ये आणते. न्यूड शेड कधीही वापरता येते. आता नेलआर्टबद्दल बोलायचं झालं तर, घरच्या घरी छोटं पेंट ब्रश वापरून नक्कीच प्रयोग करता येतात. हल्ली बाजारात नेलआर्टच्या स्ट्रिप्स मिळतात. त्या वापरून नखांचं विभाजन करून हवं ते रंग लावता येतात. सोबत नेल ग्लिटर्स, स्टड, अ‍ॅक्सेसरीज ट्राय करूच शकतेस.

आमच्या ऑफिसमध्ये फ्रायडे ड्रेसिंगचं कल्चर आहे. पण तेव्हा जीन्स टी-शर्ट सोडल्यास वेगळे पर्याय ट्राय करता येऊ शकतात का?
– चिन्मय, २६

फ्रायडे ड्रेसिंग ही संकल्पना मुळात पाश्चात्त्यांची. अमेरिका, युरोपात शनिवार-रविवार ऑफिसेस बंद असतात. शुक्रवारी सगळेच सुट्टय़ांची स्वप्नं रंगवत असतात. त्यामुळे या दिवशी मीटिंग्स वैगरे फारशा नसतात. त्यामुळे ऑफिसमध्ये थोडं कॅज्युअल ड्रेसिंग करून यायला परवानगी असते. भारतात हे कल्चर आता रुळू लागलंय. नेहमीच्या फॉर्मल्समधून थोडी विश्रांती घेण्यासाठी फ्रायडे ड्रेसिंगचा पर्याय मस्त असतो आणि या दिवशी प्रयोगांना पूर्ण वाव असतो. अर्थात तुम्हाला काही बेसिक नियम पाळावेच लागतात. त्यामुळे चिन्मय तुझी जास्त पर्याय मिळत नसल्याची शंका बरोबर आहे. पण जीन्सच्या ऐवजी तू कधी ट्राऊझर ट्राय केली आहेस का? बेसिक, स्ट्रेट फिट ट्राऊझर विथ स्ट्राइप शर्ट छान दिसतं. कॉटन स्कार्फ गळ्याभोवती गुंडाळून छान स्टाइल स्टेटमेंट मिळतं. कधीतरी हॅट घालायला हरकत नाही. अँकल लेन्थ डेनिम्स सध्या बाजारात दिसू लागल्यात. नेहमीच्या डेनिम्सऐवजी या डेनिम्ससोबत सॉक्सशिवाय शूज घालून मस्त यंग लुक मिळतो. टी-शर्टवर शर्ट घालायची स्टाइल तर मुलांसाठी कधीही हिट असतेच, पण एखाद्या दिवशी टी-शर्टसोबत गळ्याभोवती लाइट वेट स्वेटर गुंडाळून जाऊ शकतोस. यात उन्हाळा आड येणार नाही. कारण स्वेटरचा अ‍ॅक्सेसरी म्हणून वापर करायचाय.
Untitled-1

आवाहन
फॅशनच्या संदर्भात तुमचे काही प्रश्न, शंका असल्यास जरूर पाठवा किंवा ‘लोकप्रभा’ला ई-मेल पाठवा. पाकिटावर किंवा ई-मेलच्या विषय रकान्यात ‘फॅशन पॅशन’ असा उल्लेख करावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2015 1:06 am

Web Title: fashion 11
टॅग : Fashion
Next Stories
1 जंपसूट्स कसे वापरायचे?
Just Now!
X