आमच्या सीनियर्सनी आमच्यासाठी कॉलेजमध्ये फ्रेशर्स पार्टी आयोजित केली आहे. पण त्या दिवशी नक्की काय घालायचं हे लक्षात येत नाही. पार्टी कॉलेजमध्ये संध्याकाळी आहे. मी कोणता ड्रेस घालू शकते?
– पायल कनोजिया, १८.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कॉलेजमध्ये नव्याने येणाऱ्या मुलांना कॉलेजचे वातावरण, सीनियर्स यांच्यासोबत छान टय़ुनिंग जमावं आणि कॉलेजविषयीची अनावश्यक भीती जावी म्हणून फ्रेशर्स पार्टी दिली जाते. या पार्टीमध्ये आपण सर्वात ‘कूल’ दिसावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. पायल, अशी संधी अजिबात सोडू नकोस. फ्रेशर्स पार्टीसाठी एलिगंट ड्रेस कधीही उत्तमच असतात. त्यामुळे स्केट्रर ड्रेस छान पर्याय आहे. हे ड्रेस कमरेपर्यंत फिटेड असतात आणि नंतर त्याला फ्लेअर असतो. पेन्सिल किंवा टँक ड्रेससुद्धा घालू शकतेस. यांच्यासोबत कूल लेदर जॅकेट छान दिसेल. ऑफ शोल्डर ड्रेसचा पर्याय आहेच की.. फ्लोरल किंवा पेस्टल शेड्सचे ड्रेस निवड. तुला ड्रेस घालायचा नसेल तर फिटेड डेनिम किंवा लेदर पँट्स फ्लोव्ही टय़ुनिक छान दिसतात. त्यासोबत पार्टीवेअर ब्लेझर घालता येईल. लेदर पेन्सिल स्कर्ट आणि पारदर्शी शर्ट पण घालता येईल. अशा पार्टीजसाठी पेन्सिल हिल्स घालू शकतेस. पण तुला ते घालता येणार नसतील तर वेजेस घालायला हरकत नाही. फक्त एक लक्षात राहू दे की, आत्मविश्वासाने तुझा लुक कॅरी कर.. अ‍ॅण्ड यू गॉना रॉक..

More Stories onफॅशनFashion
मराठीतील सर्व फॅशन पॅशन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fashion
First published on: 10-07-2015 at 01:07 IST