lp53आल्याची स्वादिष्ट वडी

साहित्य – २ वाटी, ओले खोबरे कीस, दीड वाटी साखर, पाव किलो आलं, अर्धा वाटी साय

कृती – आले स्वच्छ धुऊन किसणीवर कीस करावा. पातेले गॅसवर ठेवून त्यात एक चमचा तूप घालून गरम करावे. त्यातच खोबरे कीस, आले कीस, साखर व साय एकत्र करून घालावे. सतत ढवळत राहावे. मिश्रण एकजीव होऊ द्यावे. त्या मिश्रणाचा घट्ट गोळा होत आला की ढवळणे थांबवावे. एका ताटात गरम तुपाचा हात फिरवावा. त्या ताटात हा गोळा काढून घेऊन व्यवस्थित थापून घ्यावे. दोन मिनिटांनी थंड झाल्यावर एकसारख्या वडय़ा कराव्या. स्वादिष्ट आलेवडी तय्यार.
मेघना वराडकर, मुंबई</strong>

lp54कोबीचे पोहे

साहित्य: १ वाटी जाडे पोहे, १ वाटी उभा चिरलेला कोबी, १/२ वाटी उभी चिरलेली सिमला मिरची, १/२ वाटी खारे शेंगदाणे, ३-४ चमचे साखर, १/२ लिंबाचा रस, चवीपुरते मीठ

फोडणीसाठी साहित्य : ३-४ मोठे चमचे तेल, १ चहाचा चमचा मोहरी, १ चहाचा चमचा जिरे, १/४ चहाचा चमचा हिंग, ८-१० कढिलिंबची पाने, २ चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १ मोठा चमचा तीळ,

सजावटीसाठी : चिरलेली कोथिंबीर

कृती : प्रथम जाडे पोहे पाण्याखाली स्वच्छ धुऊन घ्या. धुऊन झाल्यावर १५ मिनिटे बाजूला ठेवा. एका कढईत तेल तापवत ठेवा. तेल तापल्यावर त्यात मोहरी, जिरं, तीळ, हिंग, कढिलिंब आणि हिरव्या मिरच्या घाला. क्षणभर परता आणि नंतर त्यात चिरलेला कोबी आणि सिमला मिरची घाला. कोबी आणि सिमला मिरची घातल्यावर लगेचच त्यात साखर आणि मीठ घाला. त्यामुळे कोबीचा उग्र वास कमी होईल. तीन ते चार मिनिटे भाज्या परता. नंतर त्यात खारे शेंगदाणे घाला. नंतर आंच मंद करा आणि त्यात भिजवलेले पोहे घाला. कढईवर झाकण ठेवून ३-४ मिनिटे वाफ येऊ द्या. नंतर झाकण काढून लिंबाचा रस पिळा आणि हलकेच ढवळा. शेवटी कोथिंबीर पेरून गरम सव्र्ह करा.
अमरेंद्र मुळ्ये