सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रसार हा केवळ महाराष्ट्रापुताच मर्यादित राहिला नाही. त्याने राज्याच्या, देशाच्या सीमा केव्हाच ओलांडल्या. परराज्यातील मंडळेही आपल्या मित्र मंडळाच्या माध्यमातून अनेक उपक्रम करत. त्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाला प्राधान्य असे. असेच एक महाराष्ट्र मित्र मंडळ गुजरातमधील वापी येथे सुरु झाले. या मंडळाने सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला. अर्थात त्यामागे केवळ उत्सवी भूमिका नव्हती तर काही तरी विधायक कामदेखील करायचे होते. त्यामुळे २५ वर्षांपूर्वी गणेशोत्सवाच्या माध्यमातून जमा झालेला निधी त्यांनी मराठी शाळेची स्थापना करण्यासाठी वापरला. बालवाडीपासून सुरुवात केलेली ही शाळा आज रौप्यमहोत्सवी वर्ष पूर्ण करत आहे. नंतरच्या काळात अनेक दानशूर लोकांनी दिलेल्या देणगीमुळे शाळेला भव्य इमारत मिळाली आहे. महाराष्ट्र मित्र मंडळ वापीने गणेशोत्सवाच्या माध्यमातून साकारलेल्या या रौप्य महोत्सवी उपक्रमाची ही विशेष नोंद.

Dombivli Crime News
डोंबिवली : शालेय विद्यार्थ्यांना ड्रग्ज विकणाऱ्या ६५ वर्षाच्या महिलेला अटक
Sarees given on ration by the women of Jawhar returned to the government
साडय़ा नको, शाश्वत रोजगार द्या! जव्हारच्या महिलांकडून रेशनवर दिलेल्या साडय़ा शासनाला परत
Competition with sakhar gathi coming from Gujarat in sakhar gathi business for gudhi padwa 2024
पाडव्यासाठीच्या साखर गाठी व्यवसायात गुजरातशी ‘गाठ’
Wardha Lok Sabha
राष्ट्रवादी २५ वर्षांनंतर पुन्हा वर्ध्याच्या रिंगणात