News Flash

१९ ते २५ डिसेंबर २०१४

मेष - एकदा एखादे काम हातात घेतले की तुम्ही त्याचा शेवटपर्यंत पिच्छा पुरवता. याच्यामुळे अनेक अवघड कामांमध्ये तुम्ही बाजी मारू शकता. आताही तुमची ही वृत्ती

| December 19, 2014 01:04 am

१९ ते २५ डिसेंबर २०१४

01vijayमेष एकदा एखादे काम हातात घेतले की तुम्ही त्याचा शेवटपर्यंत पिच्छा पुरवता. याच्यामुळे अनेक अवघड कामांमध्ये तुम्ही बाजी मारू शकता. आताही तुमची ही वृत्ती उपयोगी पडेल. व्यापार-उद्योगात अनेक विचार तुमच्या मनामध्ये गर्दी करतील. तुमच्या कल्पना प्रत्यक्षात उतराव्यात अशी तुमची जिद्द असेल. नोकरीच्या ठिकाणी एका वेगळ्या वळणावर तुम्ही येऊन पोहोचले असाल. त्यामध्ये नेमके काय घडेल याविषयी मनामध्ये थोडासा संभ्रम असेल. घरातील व्यक्तींना महत्त्वाची गोष्ट समजून सांगाल.

वृषभ अनेक गोष्टी एकाच वेळी तुम्हाला हाताळाव्याशा वाटतील. पण त्यातले नेमके तुम्हाला काय फायदेशीर ठरणार आहे याचा विचार करा. व्यापाराच्या क्षेत्रात माझे तेच खरे असा दृष्टिकोन न ठेवता बाजारातील चढउतारांकडे आणि स्पर्धकांकडे लक्ष ठेवा. त्यानुसार तुमचा पवित्रा ठरवा. नोकरीच्या ठिकाणी त्याच त्याच कामाचा कंटाळा येईल. घरामधल्या सर्वाच्या अपेक्षा बऱ्याच असतील. त्या पूर्ण करण्याकरिता तुम्हाला तारेवरची कसरत करून स्वत:च्या इच्छांना मुरड घालावी लागेल. त्याचा विचार करू नका.

मिथुन नावीन्याची तुम्हाला उपजत आवड असते. ते मिळविण्याकरता तुम्ही नेहमी धडपड करत असता. असा स्वभाव आता विशेषरूपाने जागृत होईल. व्यवसाय-उद्योगात जाहिरात आणि प्रसिद्धीचा मुबलक वापर करून स्वत:ची टिमकी वाजवण्याचा प्रयत्न कराल. विक्री आणि फायदा काही प्रमाणात वाढेल. नोकरीमधील नेहमीच्या कामाकडे तुम्ही फारसे लक्ष देणार नाही. पण त्यापेक्षा काही वेगळे असेल तर त्यात रस घ्याल. घरामध्ये कोणाशीही फटकून वागू नका. त्यावरून राईचा पर्वत व्हायला वेळ लागणार नाही.

कर्क खूप काम करणारी तुमची रास आहे. ज्या वेळी त्याचे फळ लगेच मिळत नाही त्या वेळी निराशा येते. तशी जरी आली तरी ती झटकून पुन्हा एकदा तुम्ही नव्या दमाने कामाला लागाल. व्यापार-उद्योगात एखादा वेगळा प्रोजेक्ट हाताळावासा वाटेल. मात्र घाईने त्याचा श्रीगणेशा करू नका. नोकरीमध्ये वरिष्ठ एखाद्या अनुपस्थित सहकाऱ्याचे काम तुमच्यावर विश्वासाने लादतील. घरामध्ये तुमचे प्रश्न आणि तुमची अडचण सगळ्यांना समजेल, पण मदतीला मात्र कोणीच येणार नाही. आवडत्या छंदात मन रमवा.

सिंह जीवनामध्ये कधी कधी आपल्याला मजेशीर अनुभव येतात. तसा अनुभव आता तुम्हाला येईल. तुमची गैरसोय आणि विलंब या दोन्ही गोष्टी टाळण्याकरता सीमेवरील शिपायाप्रमाणे सतर्क राहा. व्यवसाय-उद्योगात नेहमीच्या कामाचा मनस्वी कंटाळा येईल. नवीन संकल्पना मनात घोळेल. नोकरीमध्ये वरिष्ठ चाकोरीबाहेरील काम तुमच्यावर सोपवून जणू काही तुमची परीक्षाच पाहतील. घरामध्ये सगळ्यांच्याच अपेक्षा जास्त असल्यामुळे कोणाला किती महत्त्व द्यायचे असा तुमच्यापुढे प्रश्न निर्माण होईल.

कन्या एका विशिष्ट कालावधीनंतर चाकोरीबद्ध कामाचा आपल्याला मनस्वी कंटाळा येतो. अशा वेळी काही तरी वेगळे करावे असे वाटते. ही तुमची भावना कितीही तीव्र झाली तरी लगेचच काही घडणार नाही. त्यावर विचारमंथन कराल. नोकरीच्या ठिकाणी सर्वाना तुमच्या सल्ल्याचा आणि सक्रिय मदतीचा चांगला उपयोग होईल. नवीन नोकरीकरता प्रयत्न कराल. घरामध्ये काही नवीन विचार इतरांसमोर व्यक्त कराल. पण त्यांनी त्याला लगेचच मान्यता द्यावी, अशी अपेक्षा करू नका.

तूळ आपुलकीच्या व्यक्तीवरील प्रेम तुम्ही सहसा व्यक्त करत नाही. पण ज्या वेळी त्यांची अनुपस्थिती काही कारणाने जाणवते तेव्हा मात्र तुम्ही अस्वस्थ बनता. याची प्रचीती येईल. व्यवसाय-उद्योगात एखादे त्रासदायक काम बंद करावेसे वाटेल. पण गिऱ्हाईक असेच काम तुमच्या माथी मारतील. नोकरीमध्ये वरिष्ठांशी गोड बोलून नवीन कामात सहभागी होण्याचा हट्ट कराल. घरातील माहोल आनंदी आणि उत्साही असेल. सर्वजण तुमच्याकडून काहीतरी मिळावे म्हणून तुम्हाला खूश ठेवतील.

वृश्चिक कोणाकरताही न थांबता जी गोष्ट तुमच्या मनाला पटलेली आहे ती तुम्ही येनकेन मार्गाने साध्य करून घ्याल. व्यापार-धंद्यात कालाय तस्मै नम: हे मान्य करून जी परिस्थिती आहे त्यामध्ये काय चांगले करता येईल याचा विचार कराल. त्यासाठी धाडस करण्याची तयारी असेल. नोकरीमध्ये तुमच्या कामाच्या पद्धतीमध्ये संस्थेच्या आणि वरिष्ठांच्या गरजेनुसार बदल करणे क्रमप्राप्त होईल. त्याचा वेगळा फायदा मिळेल. घरामध्ये कर्तव्य हीच काशी हे जरी खरे असले तरी एखादा आनंदाचा क्षण अनुभवाल.

धनू गुरू हा तुमच्या राशीचा अधिपती आहे. तो तुम्हाला सतत पुढे ठेवण्याचा प्रयत्न करतो. आताही हाच दृष्टिकोन तुम्हाला उपयोगी पडेल. व्यापारातील अडून राहिलेल्या कामामध्ये तुमचे श्रम आणि दूरदृष्टी याचा उपयोग होईल. नवीन प्रोजेक्टसंबंधी आवश्यक व्यक्तींना भेटून त्यांच्याशी विचारविनिमय कराल. नोकरीमध्ये जरी कामाचा तणाव असला तरी तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करून फावल्या वेळात मौजमजेचा आनंद घ्याल. घरामध्ये तुमच्या आनंदी स्वभावामुळे सर्वजणांना तुम्ही हवे असाल. प्रसंगी तुमचा ‘रामा गडी’ होईल.

मकर सतत उद्योगात राहणे तुम्हाला आवडते. त्यानुसार तुम्ही चालू असलेले आणि एखादे नवीन काम यामध्ये गर्क दिसाल. व्यापार-उद्योगात जे पैसे मिळत आहेत त्यावर तुमचे समाधान नसल्यामुळे काही तरी वेगळे आणि भव्यदिव्य तुम्हाला करावेसे वाटेल. बेकार व्यक्तींनी कुठलेही काम कमी मानू नये. सध्याच्या नोकरीत तुम्हाला आवश्यक ते स्वातंत्र्य मिळेल. घरामध्ये सर्व काही ठीक असून तुम्ही मात्र तुमच्याच तंद्रीत असल्यामुळे वेळप्रसंगी इतरांचा राग सहन करावा लागेल.

कुंभ अत्यंत मितभाषी अशी तुमची रास आहे. सहसा तुमचे विचार तुम्ही इतरांना बोलून दाखवत नाही. पण या आठवडय़ात मात्र जे चांगले काम तुम्ही केले होते त्याविषयी इतरांशी भरभरून बोलाल. व्यवसाय-उद्योगामध्ये लहानसहान कामावर तुमचे समाधान होणार नाही. त्याऐवजी एखादा मोठा हात मारावा अशी भावना तीव्र होईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ असे काम तुमच्यावर सोपवतील, ज्यामध्ये इतरांना फारसे यश मिळाले नव्हते. त्यामुळे तुमचा भाव वधारेल. घरामध्ये तुमच्या विनोदी स्वभावामुळे वातावरण हलकेफुलके राहील.

मीन अनेक दिवस ज्या तुमच्या भावना दबून राहिल्या होत्या त्यांना आता वाव मिळाल्यामुळे तुम्ही आता उत्साही दिसाल. व्यापार-उद्योगात उत्पन्न वाढवण्याकरता खूप प्रयत्न कराल. वेळप्रसंगी रात्रीचा दिवस करण्याची तुमची तयारी असेल. नोकरीच्या ठिकाणी आपले कौशल्य वाढवण्याकरता वेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण घेण्याचे बेत आखाल. घरामध्ये एखादा कार्यक्रम ठरला असेल तर त्यामध्ये तुम्ही उत्सवमूर्ती बनाल. तुमची स्वत:ची हौसही तुम्ही भागवून घ्याल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2014 1:04 am

Web Title: horoscope 9
Next Stories
1 १२ ते १८ डिसेंबर २०१४
2 ५ ते ११ डिसेंबर २०१४
3 २८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०१४
Just Now!
X