१. एका मोबाइलची छापील किंमत २० हजार रुपये आहे. दुकानदाराने तो फोन १८,५०० रुपयांना विकला. तर त्याने ग्राहकाला किती टक्के सूट दिली?
२. अजय, सचिन, राहुल, सौरव आणि अनिल या पाच जणांच्या वयाची सरासरी २६ वर्षे आहे. त्यात महेंद्रसिंगचा समावेश झाल्यानंतर सहा जणांचे सरासरी वय २४ वर्षे होते. तर महेंद्रसिंगचे वय किती?
३. एका सांकेतिक लिपीमध्ये सर्व ऱ्हस्व स्वरांच्या जागी दीर्घ स्वर वापरले जात असतील, उदाहारणार्थ. अ ऐवजी आ, इ ऐवजी ई, उ ऐवजी ऊ याप्रमाणे. तर त्या लिपीत ‘वाशी’ आणि ‘वाघ्या’ हे शब्द कसे लिहावेत?
४. राजीवने एका व्यवसायासाठी १ लाख रुपयांचे कर्ज घेतले. पाच वर्षांनी त्याने कर्जाची पूर्ण परतफेड केली. त्यावेळी त्याला ५० हजार रुपये इतके व्याज द्यावे लागले. तर, व्याजाचा दर किती?

उत्तरे :
१) साडे सात टक्के
२) १४ वर्षे
३) वाशी, वाघ्या
(कारण त्या लिपीत केवळ ऱ्हस्व अक्षरेच बदलली जात आहेत..)
दरसाल दर शेकडा व्याजाचा दर १० टक्के