lp33यम्मी इडली विथ पिझा टेस्ट
साहित्य- एक भांडे तांदळाचा रवा, एक चमचा उडीद डाळ, एक चमचा मुगाची डाळ, एक चमचा चणाडाळ, एक चमचा पोहे, पिवळय़ा कणसाचा किसलेला कीस, एक वाटी पालक, आले, मिरची, पिझाचा मसाला, दीड चमचा तेल, दोन चमचे बटर, मक्याचे दाणे उकडलेले अर्धी वाटी, दोन टमाटे किसलेले, चिली फ्लेक्स, एक चमचा, आमचूर पावडर, एक चमचा, दोन चमचे टमाटो सॉस, अर्धा चमचा गरम मसाला, मीठ.
कृती- तांदूळ, डाळी व पोहे वेगवेगळे भिजत घालावेत व दोन तासांनी सगळय़ा डाळी व तांदूळ वाटून lp31घ्याव्यात. पालक धुऊन घेणे व तो मिक्सरमध्ये घालणे. त्याची पेस्ट करून त्या मिश्रणाची (डाळी व तांदळाचे) घालावी. किसलेले कणीस घालावे. मीठ घालावे. आले, लसूण, मिरची घालावी व सर्व एकत्र करून त्यात थोडे मीठ घालावे. फट्रसॉलट घालून छोटी इडली करावी.
मसाल्यासाठी – दोन चमचे तेल, दोन चमचे बटर, पाव वाटी मक्याचे उकडलेले दाणे, दोन किसलेले टमाटे, चिली फ्लेक्स, आमचूर पावडर, मीठ, तिखट, थोडा गरम मसाला हे सर्व एकत्र घालून एक उकळी आणावी. नंतर गॅस बंद करून त्यात गार झालेल्या इडल्या घालाव्या व जरा परतून घ्यावा व त्या प्लेटमध्ये घालून त्यावर चीझ व कोथिंबीर घालावी व खाण्यास देणे.

ड्रायफ्रुट समोसा
साहित्य – ४० ग्रॅम बदाम, ४० ग्रॅम काजू, ४० ग्रॅम अक्रोड, ४० ग्रॅम अंजीर, ४० ग्रॅम खजूर, तिखट, मीठ, धने-जिरे पूड, चाट मसाला, गरम मसाला, चिंचेची गोड चटणी, २०० ग्रॅम तिखट शेव (गाठीयाँ)
lp32बाहेरच्या आवरणासाठी- एक वाटी मैदा, १/२ वाटी बारीक रवा, चवीला मीठ, दीड डाव गरम केलेले तेल, २ चमचे दूध, आमचूर मसाला, गरम मसाला.
कृती – बदाम, काजू, अक्रोड यांचे बारीक तुकडे करावे. खजूर व अंजीर मिक्सरमध्ये थोडे फिरवून त्याम मिश्रणात गरम मसाला, आमचूर मसाला, चिंचेची गोड चटणी, तिखट शेव मिक्सरमधून फिरवून घेणे व ती या मिश्रणात घालावी. हे मिश्रण सर्व एकत्र करून घ्यावे.
बाहेरच्या आवरणासाठी मैदा, रवा, चवीपुरते मीठ, दीड पळी गरम तेल, २ चमचे दूध घालून सर्व एकत्र करावे व पाणी घालून घट्ट कणीक भिजवावी. नंतर त्याच्या पुऱ्या लाटाव्या व त्यात मधून कापून प्रत्येक पारीत मिश्रण भरून त्याला समोसाचा आकार द्यावा, ते तेलात तळावे. हे समोसे ७ ते ८ दिवस टिकतात.
नलिनी फाटक response.lokprabha@expressindia.com

Mumbai road accident 2 girls injured after being hit by speeding car shocking video
मुंबईत रस्ता ओलांडताना भीषण अपघात; चूक कुणाची? अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल
Chef Vikas Khanna's favorite kairicha thecha
शेफ विकास खन्ना यांचा आवडता कैरीचा ठेचा खाल्ला आहे का? नसेल तर एकदा खाऊन पाहा, ही घ्या रेसिपी
how to make dahi vada at home recipe
Recipe : हॉटेलपेक्षा भारी दहीवडा घरच्याघरी बनवा! काय आहे साहित्य अन् रेसिपी, पाहा…
How did the Barbie pink color craze spread around the world
बार्बी पिंक रंगाची क्रेझ जगभरात कशी पसरली? जाणून घ्या गुलाबी रंगाचा इतिहास