जॉर्डन, इस्रायल, सीरिआसारखे देश वसलेले आहेत ते वाळवंटातल्या डोंगरांमध्ये. पण त्यांना लाभलेल्या इतिहास, धर्म, संस्कृती या सगळ्यांच्या वारशामुळे त्यांचं वैशिष्टय़पूर्ण असं स्थान आहे.

अरबस्तान म्हणजे वाळवंट, डोंगर आणि अशा डोंगरांवर, पायथ्याशी वसलेली वेगवेगळी राष्ट्रे. जॉर्डन, इस्रायल, सीरिआ, इजिप्त, इराक ही राष्ट्रे एकमेकांना बिलगूनच आहेत. जास्त करून सीरिआत असलेले हे देश दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्रजांनी करारानुसार स्वतंत्र केले. ज्यू धर्म येथे बऱ्याच ठिकाणी प्रचलित होता. प्रथम येशू आपली शिकवण लोकांना देत. त्यानंतर दोन हजार वर्षांनी प्रेषित महंमद यांचे जॉर्डन, इस्त्रायल व सीरिआ येथून भ्रमण झाले lp107असल्याने या जागा ज्यू, ख्रिश्चन व मुस्लिम बांधवांसाठी पवित्र आहेत.
सख्खी भावंडे एकमेकांच्या कुरापती काढून भांडत असतात तसेच हे देश क्षुल्लक कारणांसाठी सतत लहानमोठय़ा लढाया करत असतात. त्यामुळे सर्वच ठिकाणी पोलीस व सशस्त्र सैनिकांचा पहारा असतोच. टुरिस्टस्ना ते त्रास देत नाहीत, पण नेम सांगता येत नाही. असो. आम्ही आमची इस्रायली टुर आटपली. सी ऑफ गलीली येथून जॉर्डन रिव्हरवरील पूल ओलांडून शेख हुसेन बॉडर्रला आलो. तेथे आमची सामानासकट रीतसर तपासणी होऊन जॉर्डनची राजधानी अमानच्या दिशेने निघालो. हे शहर ग्रीक रोमन संस्कृतीचा ठेवा आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये.
जॉर्डनला येऊन जेराश आणि पेट्रा ही दोन ठिकाणे पाहिली नाहीत तर तुम्ही इथे आलाच नाहीत असे धरून चला. राजधानी अमानच्या उत्तरेकडे अजलून कॅसल व जेराश ही रोमन सिटी आहेत. अजलून कॅसल हा बाराव्या शतकातील सलाउद्दीनच्या काळातला किल्ला. तिथे पूर्वी मोमानी, शार, झोल अशा मुस्लिमांमधील जमाती तर रबादी या ख्रिश्चन जमातीच्या काही पोटशाखा होत्या. मुस्लिमांच्या मानाने ख्रिश्चनांची संख्या कमीच होती. आजही जॉर्डनमध्ये ख्रिश्चन आहेत, पण फारसे नाहीत. मंगोलांच्या आक्रमणानंतर तिथल्या मामलुक जमातीच्या सरदाराने कॅसल परत मिळवून आपली रसद, दारूगोळा ठेवण्यासाठी त्याचा उपयोग केला. बायझांटीन राजवटीतही तसाच वापर केला गेला. तसं पाहिलं तर सलाउद्दीननंतर त्याचा कोठार म्हणूनच वापर केला गेला.
lp108
जेराश ही मात्र रोमन भरभराटीतील सिटी. ग्रीक-रोमन राजवटीत ते होते गेरसा. इजिप्त, सीरिआ, इस्रायल देशांपासून सोयीचे, तसेच डोंगरावर असल्याने पाऊसपाणी चांगले, जमीन सुपीक अशा अनेक कारणांमुळे रोमन राज्यकर्त्यांनी तेथे वसाहत करण्याचे ठरविले. अलेक्झांडर हा इजिप्त येथून मेसोपोटेनिया येथे जाताना या गावी भेट देऊन गेला. त्याने गेरसाचे जेराश असे नाव बदलले. जेराश ही नगरी ती शेकडो वर्षे जमिनीखाली गाडली गेली होती. कुणा जर्मन शास्त्रज्ञाने उत्खननात ती शोधून काढली असे आम्हाला सांगितले गेले. या देशात सीरिआ, पॅलेस्टाइन देशांमधले लोक घुसतात. त्यांच्यासह स्थानिकांनीही गाडलेल्या नगरीचा शोध लावल्यावर काही दगड, मूर्ती चोरून नेल्या. पण आता सरकारने त्यावर कडक बंदी घातली आहे.
दीड ते दोन मैलांचा परिघ असलेले जेराश हे आपल्याला त्यांच्या कल्पकतेची झलक दाखवते. पुढे राजा हेड्रिअन येथे आला असताना त्यांच्या स्वागतार्थ उभारलेली भव्य ह्रेडीअन आर्च इथे आहे. तेथील भिंतीवर लिहिलेले लॅटिन भाषेतील उतारे अजूनही शाबूत आहेत. येथून आत प्रवेश केल्यावर आपण येतो तेच २०० मी. व्यास असलेल्या व्यासपीठावर, कोलोनेड फोरमवर. सभोवार उंच उंच दीड दोनशेच्या आसपास कोरिंथीन स्टाइलचे खांब. शिवाय दोन स्तरांवर लोकांना बसण्यासाठी पायऱ्या. संध्याकाळच्या वेळेस भेटण्याचे स्थान (वासुनाका) किंवा सभा, सण समारंभासाठी उपयुक्त जागा. अशा विविध कारणांमुळे याला कारदो- व्यासपीठ म्हणावे की नाका याची जरा गडबडच होते. ते काही असो, जागा मात्र भव्यदिव्य.

Hindu Muslim binary In Narendra Modi lone Muslim MP Choudhary Mehboob Ali Kaiser
एकमेव मुस्लीम खासदाराने सोडली साथ; म्हणाला, “मोदींच्या सत्ताकाळात द्वेष वाढला”
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
Katchatheevu island controversy
विश्लेषण: कच्चथीवू बेटावर ‘या’ हिंदू राजांनी केले होते राज्य? त्यांचा रामाशी नेमका संबंध काय होता?
village maps
गाव नकाशे नसल्याने मच्छीमारांचे अस्तित्व धोक्यात, पंचवीस वर्षांपासून प्रतीक्षा

lp113
इथूनच पुढे आपला जेरसा या गावात प्रवेश होतो. रस्त्याच्या दुतर्फा कोरिंथीन खांब, पावसात पडणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यास हमरस्त्याची आखणी. गावात दोन देवतांची देवळे होती. पैकी एक आर्टीमिस तर दुसरे झुस देवतेचे. झुसचे देऊळ गावाच्या मध्यभागी थोडय़ा उंचवटय़ावर तर आर्टिमीसचे थोडे दूर सर्वात उंचावर. देवळाच्या षटकोनी सभामंडपाच्या कोरिंथीन खांबांपैकी अकरा खांब अजूनही उभे आहेत. गावात ठिकठिकाणी असलेल्या कोरिंथीन खांबांची संख्या हजारावर आहे. त्या काळी जेराशला ‘पाँपेई ऑफ ईस्ट’ असे संबोधले जाई. रोमन भाषेत पाँपेई म्हणजे खांब.
दीड फूट व्यासाचे दगड एकावर एक रचून शेंडय़ावर नक्षी काम केलेले पाँपेई, त्यामुळे सुशोभित व्यासपीठ किंवा वासुनाका, देवालय व रस्त्याकडे असलेले पाहून आपल्याला नवल न वाटले तरच आश्चर्य. आता आपण गावात शिरतो तो मार्ग पूर्वी नव्हता. जसे आपल्याकडे पूर्वी चार रस्ते, सात रस्ते मिळत अशा फ्लोरा फाऊंटन, हाजी अली सर्कल येथे हौद असत त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत नसे, अगदी तसाच हौद असलेला चौरस्त्यांचा नाका येथे पाहायला मिळाला. त्या काळच्या वाहतुकीने कसे जावे याच्या खुणा पाहिल्या. गावात येण्यासाठी पूर्वेला डोंगर उतार- चढायच्या पायऱ्या संपल्यावर आपल्याला समोर झुस देवतेचे देऊळ, उजवीकडे गाव आणि डावीकडे कोलोनेड फोरम दिसतो. देवाला भेट करण्याच्या वस्तू ठेवण्याच्या जागाही कनिष्ठ, उच्च व राजघराण्यांसाठी राखीव होत्या. देवळाच्या भिंतींचा काही भाग, खांब अजूनही व्यवस्थित आहेत. भिंतीत खिडकी दिसते. तेथे झूसची मूर्ती असावी. बळी देण्याचा चौथरा आहेच. आर्टिमिसचे देऊळ इतके प्रशस्त नाही. दोनही देवळांत उंच छताला आधार म्हणून कोपऱ्यात खांब आहेत. उजवीकडे गाव पार डोंगरापर्यंत पोहोचलेले. तिथे शेतीवाडीची सोय.
lp109
दूरवरून जॉर्डन नदीचे पाणी अ‍ॅक्वी डक्टमार्गे गावात येई. तिथे कमळासारखी पाणपोई होती. भिंतीत केलेल्या पाइमधून पाणी तेथे येई व लोक इथूनच पाणी भरत असत, असे सांगितले गेले. शेजारीच पब्लिक बाथ, सॉनाची व्यवस्था होती तर गावच्या चांभार चौकशा करणाऱ्यांसाठी सार्वजनिक सुलभ शौचालयही होते. खाली थोडय़ा अंतरावर ग्रीक ऑथरेडॉक्स चर्चच्या खाली सेनेगॉगमधील जमिनीवर असलेले मोझेक डिझाईन त्या वेळेचा इतिहास चित्ररूपाने सांगतात. दोन हजार प्रेक्षक मावतील असा अंडाकृती हीपोड्रोम मात्र अजूनही घोडागाडय़ांची शर्यत, ग्लॅडिएटर फाइटस् अशा खास कार्यक्रमांसाठी वापरला जातो. तसेच अँफी थिएटर. पाच हजार प्रेक्षकांसाठी असलेल्या या खुल्या मंचावर विविध कार्यक्रम होत. त्या वेळी माइकची व्यवस्था नव्हती तर प्रेक्षकांच्या आसनाखाली असलेल्या भिंतीत लहानमोठी छिद्रे ठेवून ध्वनी परावर्तित करण्याची सोय केली होती. अजूनही तिथे ख्यातनाम कलावंतांचे कार्यक्रम, म्युझिक कॉन्सर्टस्, फॅशन शोज होतात.
lp110
पेट्रा हे देखील जेराशप्रमाणेच पर्यटकांचे भेट देण्याचे ठिकाण. ख्रिस्तपूर्व ३१२ वर्षे नेबाटिअन ह्य जमातीचे कारावान, म्हणजे व्यापाऱ्यांचे विश्रांती स्थान. डेड सी व रेड सी ह्यंच्या मध्यावर असल्याने इजिप्त, अरेबिया, इराक ह्या देशांतून वाहतूक करताना पेट्रा हे मोक्याचे गाव. तसेच अरेबियातील अगरबत्ती, चायनीज सिल्क, भारतीय मसाले यांच्या विक्रीसाठी अरबस्तानातील व्यापारी केंद्र. इथले वाळवंटातील डोंगर लालगुलाबी रंगाचे म्हणून पेट्रा हे रोझसिटी म्हणूनही ओळखले जाते. हे गाव डोंगर पोखरून केल्याने नेबाटिअन्सनी नैसर्गिकरीत्या असलेले दगडातील व जमिनीतील झरे, फ्लॅश फ्लडमुळे आलेले पाणी धरणांमध्ये, जमिनीखाली टाकीत साठवून वाळवंटातील गावी पाण्याची व्यवस्था केली होती. फ्लॅश फ्लड म्हणजे जसे ढगफुटी, धरण फुटणे अशा आपत्तींमुळे खालच्या पातळीवरील जागी एकदम पाणी वेगात येणे.
अमानकडून पेट्राकडे येताना जवळच्या डोंगरात गुहांसारख्या जागा दिसतात. पूर्वी या गुहांमध्ये लोक राहत, पण आता सुरक्षेसाठी सरकारने त्या खाली करायला लावल्या आहेत. तसं पाहिलं तर आपल्याला पेट्राही रस्त्यावरून दिसत नाही. बसला थोडे खाली जावे लागते. टुरिस्ट सेंटरमधून पुढे थोडी पायपीट केल्यावर आपण प्रवेशापाशी येतो. लगेच उजवीकडे गुहेसारखी जागा आहे, पण काही वर्षांपूर्वी पर्यटक तेथे गेले असताना एकदम फ्लॅश फ्लडमुळे पाणी आल्याने ते सर्व वाहून गेले, म्हणून ती जागा बंद आहे.
lp111
इथले डोंगर हे सँड स्टोन्स असल्याने जमिनीतील घटकांप्रमाणे ते रंगीत झाले आहेत. वाटेत जाताना पाणी आणण्यासाठी पाइप, फिरस्ते किंवा त्यांचे घोडे पाणी पिताना सांडलेले पाणी गोळा करण्याची व्यवस्था आपल्याला दिसून येते. काही ठिकाणी दगडांवर कोरलेली शिल्पे आपण व्यवस्थित पाहू शकतो हे मुख्य. पेट्रा ह्या जागी फिरताना आपण उंचउंच डोंगरांच्या खिंडीतून फिरत असल्याने सारखा ऊन-सावलीचा खेळ असतो. त्यामुळे सावलीत असताना थंड, तर उन्हात आल्यावर कडकडीत ऊन. त्यामुळे इथे येताना डोक्यावर टोपी, हलकासा स्वेटर, आणि दोन-तीन वेळा थोडेसे खाण्याची, पाण्याची व्यवस्थित सोय करावी. कारण सबंध दिवसाच्या प्रवासात फक्त एके ठिकाणीच पाणी, कोल्डड्रिंक्स, वेफर्स मिळू शकते. असो.
lp112पेट्रानगरीच्या शेवटाला नेबाटीयन्सचा खजिना आहे. पूर्वी इथे काही संपत्ती असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. पण ही एकच वास्तू अजूनही पाहण्यासारखी आहे. दगडाच्या नैसर्गिक आकाराने त्याला पाऊस पाण्यापासून सांभाळले आहे. नंतरची जमात बेडोविन, आणि नंतरच्या स्वाऱ्यांनी धनलोभाने आतल्या भागात बरीच नासधूस केली असल्याने आत जाता येत नाही. दर्शनी भागावर बंदुकीच्या गोळ्यांनी पडलेली छिद्रे दिसतात. पण बाहेरील शिल्प छानच आहे. याच्या पुढे डावीकडून वादीरम् हा अरबस्थानातील वाळवंटाचा भाग सुरू होतो, तर उजवीकडे उंचउंच डोंगर संपल्याने उन्हातूनच आपल्याला जावे लागते. या भागात लोकांनी डोंगरात आपल्या ऐपतीप्रमाणे खोदून थडगी बांधली आहेत. राजांच्या कबरी मजली- दोन मजली उंचीच्या आहेत, तर सामान्यांच्या दगडावर दगड रचून केलेल्या आहेत.
lp117मुसाचा भाऊ अ‍ॅरन याच्या कबरीमध्ये जाण्यासाठी व्यवस्थित पूर्वीच्याच पायऱ्या आहेत. आतमध्ये सर्व रिकामेच आहे, पण दगडातील वेगवेगळ्या रंगांमुळे छान दिसते. बाकीच्या ठिकाणांपेक्षा इथले अँफी थिएटर जरा लहान आहे. उच्च वर्गीयांची आसने एकमेकांपासून वेगळी होती, तर सामान्यांची जोडूनच. गावाची रचना टिपिकल तत्कालीन होती. कोरिंथीन खांब असलेला रस्ता, तसेच देऊळही होते. तिथूनच पुढे अ‍ॅरन माऊंटनवरील उंच ठिकाणी जाता येते. त्या जागेवरून दूर वादीरम् म्हणजे तिथले वाळवंट आणि गाझाची वेस दिसू शकते. काही ठिकाणी कबरींचे रोमन काळात चर्च बनले. कधीकधी जॉर्डनमधले ख्रिश्चन प्रार्थनेसाठी जमतात असे म्हणतात.
lp114
वादीरम् हा वालुकामय भाग व मध्येमध्ये डोंगर. म्हणून त्याला व्हॅली ऑफ मून असे म्हणतात. या ठिकाणी एक तर जीपमधून किंवा उंटावर बसून जाता येते. काही डोंगरांवर नेबाटिअन्स, बेडोविन जमातीच्या लोकांनी त्यावेळी चित्रे कोरली आहेत. हे ठिकाण वाळवंटातील चित्रीकरणासाठी सिनेमासृष्टीत फारच पॉप्युलर आहे. इंडियाना जोन्स, अरेबिअन नाइट्स तसेच आपल्याकडील क्रिश-थ्री, आणखीही बरेच चित्रपट येथे चित्रित झाले आहेत. वादीरम् येथे राहण्याची सोय तंबूत केली जाते. वाळवंटात दिवसा अति गरम, रात्री गारेगार असे वातावरण असल्याने त्यानुसार पांघरुणाची सोय असते. येथे रात्री सामुदायिक भोजन असते. जसे आपल्याकडे काही भागात पोपटी करतात तसेच इथे झार्ब करतात.
हा वालुकामय प्रदेश असल्याने खड्डा करणे कठीण असते, म्हणून वाळूमधे जमेल तसा खड्डा करून त्यात पिंप ठेवतात. त्यात खाली थोडा विस्तव ठेवून जाळीवर किंवा बिडाच्या भांडय़ात बकऱ्याची तंगडी, कोंबडी, बटाटे, अंडी असे पदार्थ ठेवतात. ते झाकणाने बंद करून वर ओलसर गोणपाटावर वाळू पसरतात व वर परत विस्तव करतात. हा बार्बेक्यूचा प्रकार तयार व्हायला पाच-सहा तास लागतात. तोपर्यंत आपण आजूबाजूला फिरून यायचे. तयार झाल्यावर झार्ब फारच चविष्ट लागतो. झार्बचा आस्वाद घेतल्यावर रात्री खाटेवर लवंडून निरभ्र आकाशातील तारे पाहण्याची मौज काही औरच.
lp116
निसर्गाची स्थित्यंतरे व्हायला लाखो वर्षांचा अवधी लागतो. तेव्हा कुठे आपण ते आपल्या वर्तमानात पाहू शकतो. अशाच रीतीने मृत समुद्र तयार झालेला आहे. आफ्रिकन व अरेबिअन भूस्तर यामध्ये हालचाल होऊन मेडिटरीन सीचा काही भाग खचला व त्यामुळे जॉर्डन रिफ्ट व्हॅली झाली. या व्हॅलीमधे इस्रायलमधला सी ऑफ गलीली, जॉर्डन रिव्हर, मृत समुद्र तयार झाले. मृत समुद्र हा जगातला खाऱ्या पाण्याच्या सरोवरांपैकी एक आहे. तो समुद्रसपाटीपासून ४२९मी.खाली आहे तर त्याची खोली ३०४ मी. आहे. या लेकमधील पाणी बाहेर जायला वाव नसल्याने प्रखर सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन होते. त्यामुळे पाण्यातील मिठाचे प्रमाण ३४ टक्के आहे. अशा वातावरणामुळे पाण्यात कोणतीही जीवसृष्टी नाही. आजूबाजूच्या परिसरात झाडेही नाहीत.
lp115मृत समुद्र जॉर्डनच्या पूर्वेला व इस्रायलच्या पश्चिमेला असा दोनही देशांत पसरल्याने त्याची लांबी ५० कि.मी. आहे. पाण्यात विद्राव्य क्षार, खनिजे भरपूर असल्याने तेथील मातीचा फेशिअल पॅक, वेगवेगळी क्रीम्समधून असा ब्युटीथेरपीमध्ये वापर होतो. तसेच काही चामडय़ाच्या रोगांमध्ये उपयोग होतो. पर्यटक मृत समुद्र पाहायला आले तर किनाऱ्यावरील मातीत लडबडल्याशिवाय जात नाहीत. साध्या पाण्यात सहसा बुडणाऱ्या वस्तू या पाण्यात मुळीच बुडत नाहीत तर आपणही पाठीवर पडून खुशाल मासिक चाळू शकतो. पण पोहायचे म्हटले तर महाकठीण.
सर्व इतिहास, झार्ब, डेड सीची गंमत अनुभवायची असेल तर जॉर्डनला नक्कीच यावे लागेल.
गौरी बोरकर -response.lokprabha@expressindia.com