– जय पाटील
दिवाळी म्हणजे आनंद वाटण्याचा काळ. आपापल्या परिने इतरांच्या आयुष्यात आनंदाची किरणं आणण्यासाठी यापेक्षा उत्तम निमित्त नाही. अभिनेत्री करीना कपूरनेही या दिवाळीच्या निमित्ताने असाच काहीसा प्रयत्न केला आहे. त्यासाठी तिला मदत केली आहे इन्स्टाग्रामने. करीना या दिवाळीला आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर लघु उद्योगांना पाठिंबा दर्शवून त्यांना प्रोत्साहन देण्याचं आवाहन ग्राहकांना करणार आहे. आपल्या उत्पादन किंवा सेवांची प्रस्थापित प्रसारमाध्यमांद्वारे जाहिरात करणं अनेक लघु उद्योजकांना परवडत नाही. अशा वेळी ते समाजमाध्यमांद्वारे जगभरातील लक्षावधी संभाव्य ग्राहकांपुढे येण्याचा प्रयत्न करतात. आपल्या विविध उत्पादनांचं मार्केटिंग करण्यासाठी, त्यांना प्रसिद्धी देण्यसाठी ती विकण्यासाठी अलिकडच्या काळात अनेक लघु उद्योजक इन्स्टाग्रामचा यशस्वीरित्या वापर करत आहेत. काही उद्योजक आपल्या उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी इन्स्टाग्राम एन्फ्लुएन्सर्सची मदत घेतात.

बागकाम करण्याची आवड असलेल्या करीनाने माय बगिचा या बागकामाशी संबंधित उद्योगाला इन्स्टाग्रामद्वारे पाठिंबा दर्शवला आहे. आपल्या पोस्टमध्ये करीना म्हणते, ‘इन्स्टाग्रामवर मला रोजच काहीतरी खास आढळतं. मला बागकाम करणं खूप आवडतं. माझ्या या आवडीतूनच माझी ओळख माय बगिचाशी झाली. अहमदबादस्थित या उद्योगाने अनेकांच्या घरांत हिरवाई फुलवली आहे. असे अन्यही हजारो लघु उद्योग आहेत ज्यांना तुमच्या प्रेमाची, पाठबळाची आवश्यकता आहे. या दिवाळीला मी माझ्या प्रियजनांच्या जीवनात हिरवाई आणणार आहे. माय बगीचाला नवी सुरुवात करण्यासाठी साहाय्य करणार आहे. तुम्ही कोणत्या उद्योगाला प्रोत्साहन देणार आहात?’

 

Instagram वर ही पोस्ट पहा

 

Every day, I discover something new and special on Instagram… thanks to all of you, my amazing community and IG family. Recently, my love for gardening led me to @mybageecha, a wonderful small business from Ahmedabad that is helping make India and its homes greener. There are millions of other small businesses that use instagram and need our love and support right now to make their nayi shuruaat. This Diwali, I will be gifting my loved ones something green and beautiful from MyBageecha, and support mybageecha’s nayi shuruaat. Thrilled to be partnering with @instagramforbusiness to support the small and mighty small businesses of India. Which small business’ nayi shuruaat are you going to support this Diwali? #igloverunsdeep #FromMyBageechaToYours #supportsmall

रोजी Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan) ने सामायिक केलेली पोस्ट

‘फ्रॉम मया बगीचा टू युअर्स’, ‘सपोर्ट स्मॉल’ असे हॅशटॅग्ज वापरून तिने इतरांनाही अशा लघुउद्योगांना साहाय्य करण्याचं आवाहन केलं आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी मात्र लघु उद्योगांविषयी किंवा त्यांना साहाय्य करण्याविषयी चर्चा करण्याऐवजी तिच्या गर्भवती असण्याविषयी आणि त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर झळाळणाऱ्या तेजाविषयीच अधिक चर्चा केलेली दिसते.