गिरणी कामगारांच्या संपामध्ये वडिलांची नोकरी सुटली आणि तो कुटुंबासह सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातल्या आपल्या मूळ गावी परतला. तिथेच शिकून पोटा-पाण्यासाठी त्याने मुंबईची वाट धरली. त्या महानगरीत  रस्त्यावरच्या निराधार मुलांमध्ये तो रमायला लागला. त्यांचे प्रश्न, त्यांची सुख-दु:खं समजावून घेतानाच त्याला समाजात निराधार वृद्धांची अवस्था अतिशय बिकट असल्याचं प्रत्यक्ष अनुभवातून ध्यानात आलं. मग त्याने त्यांच्यासाठी काम करण्याचा निर्णय घेतला. अपंग, अनाथ वृद्धांना आधार देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात अणाव इथे बबन परब या काकांसह त्याने वृद्धाश्रम सुरू केला. पहिल्या दोन-तीन वषार्ंतच या निराधार वृद्धांप्रमाणेच समाजातल्या अपंग, मतिमंद, मनोरुग्ण इत्यादी घटकांच्या प्रश्नांनाही थेट भिडण्याचा पर्याय त्याने स्वीकारला. त्यासाठी त्याने संस्था स्थापन केली  ‘जीवन आनंद’! आणि त्याचं नाव संदीप परब.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अणावच्या वृद्धाश्रमापाठोपाठ मुंबई-गोवा महामार्गावर कणकवलीपासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर पणदूर या गावी २ ऑक्टोबर २०१३ रोजी संस्थेतर्फे ‘संविता आश्रम’ हे केंद्र सुरू करण्यात आलं. त्यानंतर दोन वर्षांच्या काळात या ठिकाणी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई, कोल्हापूर इथूनही  ५२ निराधार वृद्ध, भिन्न वयोगटाचे स्त्री-पुरुष आणि बालकं दाखल झाली आहेत. त्यात १६ वृद्ध, २५ मनोरुग्ण, ५ बालकं आणि ३ अपंगही  शिवाय कोणताही कौटुंबिक आधार नसलेल्या तिघाजणांना शालेय-महाविद्यालयीन शिक्षणासाठी संस्थेने आधार दिला आहे. संदीपसह १५-२० कार्यकर्ते त्यांच्या जीवनात आनंद फुलवण्याचा प्रयत्न करत आहेत.

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jeevan anand sanstha ratnagiri
First published on: 02-10-2015 at 01:30 IST