१. अजय, अतुल, अमोल आणि मुकुंद या चौघांच्या वयाची सरासरी ५४ वर्षे आहे. त्यामध्ये अंशुमानच्या वयाचा समावेश केल्यास ही सरासरी ५६ वर्षे होते. तर अंशुमानचे वय किती वर्षे ?

२. एका रांगेत काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बसल्या आहेत. त्या रांगेत आराध्य हा उजवीकडून १४ वा आणि डावीकडून १२ वा असेल तर रांगेतील मुलांची एकूण संख्या किती ?

३. एक मुलगा पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. तिथून तो दोन वेळा उजवीकडे वळला. नंतर एकदा डावीकडे वळला व शेवटी मागे वळून उभा राहिला तर त्याचे तोंड कुठच्या दिशेला असेल?

४. एका संख्येच्या वर्गमुळातून ३६ वजा केले तर आपल्यास आठ या संख्येचा पूर्ण वर्ग मिळतो. तर मूळ संख्या कोणती?

सुरेशने रमेशकडून दरसाल दरशेकडा १५ टक्के दराने दहा हजार रुपये कर्ज घेतले. जर या कर्जाची परतफेड करताना त्याने तीन हजार रुपये व्याज दिले असेल तर त्याने एकूण किती कालावधीसाठी कर्ज घेतले होते?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्तरे :
१) अंशुमानचे वय ६४ वर्षे
२) रांगेतील मुलांची एकूण संख्या २५
३) उत्तर दिशेला
४) मूळ संख्या दहा हजार
५) कर्ज २ वर्षांसाठी