१. रमेश आणि सुरेश यांच्या आजच्या वयाची बेरीज १०० आहे. त्याच्यातील अंतर दहा वर्षे असेल आणि रमेश सुरेशपेक्षा मोठा असेल तर सुरेशचे वय किती?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२. सचिनने एका मालिकेत ४५ च्या सरासरीने धावा काढल्या, त्यामध्ये १००, १०० आणि ९० अशा तीन सामन्यांमधील धावा असतील तर उर्वरित तीन सामन्यांमधील एकूण धावा किती?

३. एका वर्गात २० मुलगे आणि २५ मुली आहेत. गणिताच्या पेपरात १०० पैकी त्या वर्गाला सरासरी ८५ गुण मिळाले. मुलींची या पेपरातील गुणांची सरासरी ८९ असेल तर मुलांची गणितातील गुणांची सरासरी किती?

४. एका झाडाला दहा फांद्या. प्रत्येक फांदीला ५ आंबे. शेतकऱ्याने सर्व आंबे १५ रुपयाला एक याप्रमाणे विकले तर त्याला एकूण किती पैसे मिळतील?

राजू आणि राम यांच्यातील अंतर ४ वर्षे आहे. राम राजूपेक्षा लहान आहे. त्यांच्या आजच्या वयाची बेरीज २२ वर्षे असेल तर रामचे वय किती?

उत्तरे स्पष्टीकरणासहित :

१. उत्तर : ४५; स्पष्टीकरण : सुरेशचे वय क्ष वर्षे मानू. त्यामुळे क्ष+क्ष +१०= १०० म्हणजे २क्ष+१०= १००. म्हणजेच २ क्ष = ९० म्हणजेच क्ष चे वय ४५ वर्षे.

२. उत्तर : २५; स्पष्टीकरण : एकूण सामन्यांची संख्या ६. त्यापैकी तीन सामन्यांमधील एकूण धावसंख्या २९०. सहा सामन्यांची सरासरी ४५ म्हणजेच ४५x६ बरोबर ३१५. ३१५—२९० = उर्वरित तीन सामन्यांमधील धावा म्हणजेच २५.

३. उत्तर : ८०; स्पष्टीकरण : एकूण मुले ४५, वर्गाची एकूण सरासरी ८५ म्हणजेच मळालेल्या एकूण गुणांची बेरीज, ४५x८५ = ३८२५, पैकी मुलींची सरासरी ८९ आणि त्यांची संख्या २५. म्हणजेच मुलींना मिळालेले एकूण गुण, ८९x२५ = २२२५. ३८२५—२२२५ = १६००, हे मुलांनी मिळवलेले एकूण गुण, म्हणजेच १६००/ मुलांची संख्या बरोबर मुलांची सरासरी. म्हणजेच १६००/२० = ८०.

४. उत्तर : ७५० रुपये; स्पष्टीकरण : एकूण रुपये = फांद्यांची संख्या x आंब्यांची संख्या x प्रत्येक आंब्याची किंमत. म्हणजेच १० x ५ x १५ = ७५०.

५. उत्तर :९ वर्षे; स्पष्टीकरण : रामचे वय अ वर्षे मानू. म्हणजेच राजूचे वय अ + ५ वर्षे. म्हणजेच, अ + अ + ५ = २२ म्हणजेच अ = ९ वर्षे.

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Word puzzle
First published on: 21-11-2014 at 01:04 IST