वृक्षसंवर्धनाची चळवळ जगभर उभारणारे रिचर्ड बेकर यांच्यावरील ‘अवघा देहचि वृक्ष जाहला’ हे वीणा गवाणकर लिखित पुस्तक  राजहंस प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होत आहे. त्यानिमित्ताने पुस्तकातील संक्षिप्त प्रकरण..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केनियातील स्थानिक रहिवाशांच्या मदतीनं नवी जंगलं उभी करण्याचं स्वप्न बेकर पाहत होते. पण हे काम वाटलं तेवढं सोपं नव्हतंच. कुऱ्हाडीचे घाव घालून वृक्षतोड करण्याची आणि आगी लावून जमिनी भाजून काढण्याची परंपरा असणाऱ्या  लोकांना झाड लावायचं असतं, हे माहीतच नव्हतं. रोपं तयार करून ती नेऊन अन्यत्र लावण्यासाठी कोणी तयारच होईना. बेकर यांनी आपली ही समस्या किकूयू नायक अंजोंजो याच्यासमोर मांडली. अंजोंजोशी चर्चा करताना, आपल्या अडचणींविषयी बोलताना बेकरना कारण समजलं : पूर्व आफ्रिकेत स्थानिक टोळय़ांच्या आचारामागे, रिवाजामागे एक परंपरा होती. रूढींची बंधनं होती. धार्मिक समजुती होत्या. विवाहविधी, नवजात बालकांचं स्वागत, फळतोडणी, शेतीची कामं, पीक कापणी.. प्रत्येक विधी परमेश्वरी आदेशानुसार, त्यासाठी असलेल्या खास नृत्यसमारंभात पार पाडला जाई. प्रत्येक कार्यासाठी, विधीसाठी विवक्षित नृत्य असे. वृक्षारोपणाचं नृत्य नव्हतं. म्हणून तो विधी वा संस्कार त्या लोकांत नव्हता.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arboriculture movement worldwide trees forest tradition bond of norms ysh
First published on: 20-02-2022 at 00:02 IST