अरुंधती देवस्थळे
झूरिकमध्ये असताना तासभर अंतरावरल्या ‘बर्नच्या ‘पॉल क्लेई सेन्ट्रम’ला जा’ असं कोणी वेगळ्याने सांगायची गरज नव्हतीच. ‘तिथलं आईन्स्टाईनचं घरही बघायचं असेल तर रात्री मुक्काम करून दुसऱ्या दिवशी ते पाहून परत ये,’ हा सल्ला मात्र योग्यच होता. तर अशी रामप्रहरी बर्नला पोहोचले.. शहरापासून शांत अंतरावर असलेल्या पॉल क्लेईंच्या (१८७९-१९४०) दारी! प्रशस्त केंद्राच्या स्वागतकक्षातून आत जायला एक दरवाजा.. त्यावर पॉल क्लेईंचा मोठा फोटो. आणि समोर लिहिलेली त्यांची ओळख : Ich bin Malar (मी चित्रकार आहे). पण ते व्हायोलिनवादक, लेखक, संपादक आणि शिक्षकही होते. हे केंद्र क्लेईंच्या ५००० हून अधिक रेखाटनं, तसंच जलरंग, तैलरंग आणि रंगीत पेस्ट बनवून केलेल्या चित्रांचं संग्रहालय आहे. त्यांच्या स्टुडियोतलं सामान अजून तसंच मांडून ठेवलंय. ब्रशेस, रंग, पिगमेंट्स, हाताने केलेले मातीचे वाडगे आणि दोन-तीन कॅनव्हास. ही साधनं कशी वापरावीत याच्याही कार्यशाळा इथे घेण्यात येतात. एवढंच नव्हे, तर येणाऱ्यांमध्ये कोणाला जर क्लेईंची चित्रं पाहून काही पेंट करावंसं वाटलं तर आर्ट गॅलरीच्या केंद्रस्थानी एक वर्तुळाकृती कक्षात तीही मुभा आहे. ठिकठिकाणी चित्रांखाली Painting is an’ oil-reeking brush goddessl, line is a dot that went for a walk does not reproduce the visible, but makes visible’ यांसारखी क्लेईंची मार्मिक उद्धरणं लावलेली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आई आणि वडील दोघेही पाश्चिमात्य शास्त्रीय संगीतात पारंगत असल्याने सुरुवातीला क्लेईंच्या मनात आपण संगीत क्षेत्रात जावं की चित्रकलेत शिरावं याबद्दल संभ्रम होता. ते शिक्षणासाठी म्युनिकला आले. सुप्रसिद्ध फ्रान्झ वान ष्टोक अॅकॅडमीत प्रवेश मिळाला. शिक्षणाचा भाग म्हणून मास्टर्सचं काम बघायला ते इटलीत गेले. तिथली शिल्पं आणि पेंटिंग्ज पाहून ते इतके प्रभावित झाले की चित्र आणि रंगांच्या माध्यमातून स्वत:चा शोध घ्यायचा असं त्यांनी ठरवलं. सुरुवात कार्डबोर्डवर किंवा त्यावर लावलेल्या कॅनव्हासवर.. तैलरंगांनी. या काळात रंगयोजना उदास, मनाची अस्थिरता दाखवणारी. सुरुवातीच्या काळात त्यांचं लक्ष लाईन आणि किआरोस्कुरोमध्ये गुंतलेलं.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bern paul clay centre einstein paul clay centrum amy
First published on: 11-09-2022 at 01:31 IST