‘सत्यभामा’ ही डॉ. श्रीनिवास आठल्ये यांची बाळ गंगाधर टिळक यांची पत्नी सत्यभामाबाई यांच्यावर लिहिलेली कादंबरी होय. टिळकांसारख्या महान व्यक्तीची सहधर्मचारिणी ही भूमिका बजावणं तितकं सोपं नाही, पण सत्यभामाबाईंनी ती समर्थपणे पेलली. टिळकांचे राजकारण-समाजकारण, ब्रिटिशांविरोधात आवाज उठवणं, त्यांचा तुरुंगवास..  अशा अनेक गोष्टींना तोंड देत आपला संसार यशस्वीपणे सांभाळण्याचं शिवधनुष्य सत्यभामाबाईंनी लीलया पेललं. सत्यभामाबाईंचे बालपण, टिळकांची पत्नी, मुलांची आई या भूमिका बजावताना सत्यभामाबाईंना कोणत्या परिस्थितीस सामोरे जावे लागले याचा प्रत्यय  या कादंबरीतून येतो. टिळकांच्या देशकार्यात त्यांना घराकडे फारसे लक्ष देणे शक्य नसे. अशा वेळी सत्यभामाबाईंनीच घराची,  मुलांची जबाबदारी सांभाळली. टिळकांच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांतून सत्यभामाबाईंचे जीवन उलगडत जाते. तापी ते सत्यभामा हा खडतर प्रवास नेमकेपणाने या कादंबरीतून मांडला आहे. या कादंबरीतून आपले जीवन देशकार्याला वाहिलेल्या पतीच्या पाठीशी शांतपणे आणि खंबीरपणे उभी राहणारी कणखर पत्नी- सत्यभामा या कादंबरीतून ठळकपणे जाणवते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सत्यभामा’-  डॉ. श्रीनिवास आठल्ये, प्रकाशक-  टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पाने-१६६, किंमत-२५० रुपये.  

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book review satyabhama book dr shreenivas aathlay dehanagarichi adbhut safar zws
First published on: 30-01-2022 at 01:00 IST