‘कादंबरी’ हा साहित्यप्रकार काळाचा व आशयाचा व्यापक पट उलगडणारा आहे. निव्वळ मराठी कादंबऱ्यांकडे कटाक्ष टाकला तरी हे ध्यानात येऊ शकते. त्या त्या काळाचे संदर्भ, त्यातले राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक आशयद्रव्य कथानकाच्या ओघात आपसूकपणे कादंबरीतून येत असते. त्यात कथापात्रांची सापेक्षता असली तरी कथनांतर्गत काळ व त्याचा पात्रांच्या जगण्यावर असलेला प्रभाव आणि त्याला त्यांनी दिलेला प्रतिसाद यांची एक व्यामिश्र गुंतागुंत कादंबरी वाचकासमोर ठेवत असते. शुक्रतारा प्रकाशनातर्फे प्रकाशित व अनिल देशपांडे लिखित ‘कर्मयोगी’ ही चरित्रात्मक कादंबरी याचे उदाहरण ठरते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९१३ ते २०१६ हा या कादंबरीचा कथनकाळ. देशात स्वातंत्र्याचे वारे वाहात असताना शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या नगर जिल्ह्यतल्या कळस गावातील एका आई-मुलाची ही कहाणी आहे. घरामध्ये शिक्षणाची परंपरा नाहीच आणि नवऱ्याचीही संसारात साथ नाही अशा स्थितीत पार्वती सासऱ्याच्या मदतीने घराचा भार उचलते. गरीबीचे चटके सहन करत असतानाच काही प्रमाणात प्राथमिक अक्षरओळख असलेली पार्वती आपल्या मुलांना शिकवण्याचा ध्यास घेते. पण मोठा मुलगा वडिलांच्या वळणावर गेला. त्याने शिक्षण तर घेतले नाहीच, उलट धाकटा सोमनाथ शिक्षण घेतोय म्हटल्यावर त्यालाही त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. त्याचा या शिक्षणाला विरोध होता. सोमनाथच्या शिक्षणाचे समर्थन करणाऱ्या आपल्या आईला- पार्वतीला तो शिवीगाळ करतो. त्यामुळे ती घर सोडून जाते. सोमनाथलाही तो यासाठी मारहाण करतो. मात्र सोमनाथने चिकाटी सोडली नाही. शिक्षण पूर्ण करण्याचे स्वप्न उराशी बाळगत तोही मग घराबाहेर पडतो. नातेवाईकांकडे, ओळखीच्या लोकांकडे राहून तो शिक्षण पूर्ण करतो. सोमनाथच्या या प्रयत्नांना आई- पार्वतीही खंबीरपणे साथ देते.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta book review karmayogi
First published on: 08-10-2017 at 03:04 IST