‘लोकरंग’ (१ सप्टेंबर) मधील डॉ. अरुण गद्रे लिखित ‘डॉक्टरांना कोण वाचवणार?’ हा लेख वाचला. या लेखात सरकारी दवाखान्यातील गैरसोयी, भ्रष्टाचार, राजकारण्यांची अनास्था व डॉक्टरांवर येणारा ताण याबद्दल अतिशय परखडपणे लिहिले आहे. काही निवडक डॉक्टर या व्यवसायाला बदनाम करतात. काही वेळेला रुग्णाची सहनशक्ती बघितली जाते. रुग्णाला व्यवस्थित/ पूर्ण माहिती दिली जात नाही. कट प्रॅक्टिस केली जाते. डॉ. गद्रे यांनी कार्पोरेट हॉस्पिटलमधील भ्रष्टाचारावरही प्रकाश टाकायला हवा होता.– दीपक घाटे, सांगली.

यंत्रणांसाठी मार्गदर्शक लेख

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘लोकरंग’ (१ सप्टेंबर) मधील डॉ. अरुण गद्रे व डॉ. श्रुती जोशी लिखित अनुक्रमे ‘डॉक्टरांना कोण वाचवणार?’ आणि ‘एक दिवस धकाधकीचा’ हे दोन्ही लेख वाचले. किमान एवढीच अपेक्षा आहे की या दोन्हीही लेखांत नमूद केलेल्या परिस्थितीवर ज्यांनी निर्णय घेणे अपेक्षित आहे असे राजकारणी, सरकारी यंत्रणा यांनी हे लेख खरेच एकदा आवर्जून वाचावेत, म्हणजे त्यावर उपाययोजना करताना हे लेख नक्कीच मार्गदर्शक ठरतील.गणेश प्रभाकर परब, ठाणे.