बाळकृष्ण कवठेकर – lokrang@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘अस्तित्वाची शुभ्र शिडे’ हा डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचा नवा कथासंग्रह. विशेषत: दीर्घकथालेखक म्हणून सर्वज्ञात असणारे डॉ. कोत्तापल्ले यांचा हा संग्रह त्यांच्या लौकिकास साजेसा आहे. ‘जैत्रपाळाचा धर्म’ या कथेसह कोत्तापल्ले यांच्या एकूण सात दीर्घ म्हणता येतील अशा कथा या संग्रहात आहेत. एखादा अपवाद सोडल्यास या सर्व कथांना सामाजिकतेचा संदर्भ असून, त्याच्या ठळक दर्शनासह या कथा लक्षणीय व यशस्वी ठरलेल्या आहेत. दीर्घकथा असूनही त्यांची वाचनीयता कुठेही कमी होत नाही, हाही या कथांचा आणखी एक विशेष. या कथांतून येणारे तपशील अर्थपूर्ण असल्यामुळे स्वाभाविकपणेच या कथांची गुणवत्ता वाढवणारे ठरले आहेत. समीक्षक डॉ. विलास खोले यांची या संग्रहाला लाभलेली विस्तृत आणि विश्लेषक प्रस्तावना ही आणखी एक जमेची बाजू म्हणावी लागेल. ही प्रस्तावना सर्व कथांचे यथायोग्य विश्लेषण तर करतेच, पण वाचकांना या कथांच्या आकलनाच्या दृष्टीनेही मोलाचे सहाय्य करते.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi book review astitwachi shubhra shide pustak prikshan dd70
First published on: 29-11-2020 at 00:01 IST