‘महाराष्ट्र सापडला; पुढे काय?’ हा २ नोव्हेंबरचा लेख वाचनीय वाटला. ‘चर्चा संपल्यावर कदाचित फडणवीसांनी कपाळाला हात लावला असेल’ तसेच ‘बोला- कसा काढणार यातून बाहेर महाराष्ट्र तुमचा?’ व ‘आघाडीचे सरकार असल्याने निर्णय घेण्यावर मर्यादा येतात’ हे तीनही उल्लेख महत्त्वपूर्ण आहेत. पण विरोधी पक्षात असताना फडणवीस हे अभ्यासू आमदार असल्याने त्यांना परिस्थितीची योग्य जाणीव आहे. त्यामुळे आता कपाळाला हात लावण्याची वेळ येणार नाही, हे निश्चित. तसेच मोदींनी त्यांना महत्त्वाचा संदेश दिला आहे. तो असा की, ‘तुम्ही निर्भीडपणे जनतेसाठी काम करा, सरकार वाचविण्यासाठी नव्हे. जर सरकार पडले तर जनता पुन्हा निश्चितपणे तुमच्यामागे उभी राहील.’ या संदेशाचे पालन करण्याचे कर्तृत्व देवेंद्र यांच्या अंगी १०० टक्के असल्यामुळे आता महाराष्ट्र प्रगतिपथावरच जाणार असून ‘आघाडीचे सरकार’ हे कारण सांगण्याची वेळच त्यांच्यावर येणार नाही. कारण स्वच्छ व स्पष्ट निर्णय हा त्यांचा स्थायीभाव आहे. आज महाराष्ट्राच्या विकासाची गरुडझेप घेण्यासाठी एक प्रामाणिक तरुण तळमळीने उभा राहिला आहे. तेव्हा महाराष्ट्रातील सर्व तरुणांनी जातपात, धर्म, पक्षीय राजकारण बाजूस ठेवून त्यामागे भक्कमपणे उभे राहावे. कारण प्रथमच एका नि:स्वार्थी व्यक्तीकडे राज्याचे नेतृत्व आले आहे व हेच महाराष्ट्राचे भाग्य आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अर्थभानाची आवश्यकता
‘लोकरंग’मधील श्रद्धा सावंत यांचा ‘विकास आणि गुंतवणूक’ हा लेख वाचला. लेख आवडला. वास्तविक ‘अर्थकारण’ हा माझा अभ्यासाचा विषय नाही. बऱ्यापैकी कमावणारे जे मध्यमवर्गीय आहेत त्यापैकी बहुसंख्यांना अर्थसाक्षरता, गुंतवणूक यापेक्षा आलिप्ततावादाची भुरळ पडते! फार-फार तर त्यांचं क्षेत्र बचतीचं. झालंच तर ढढा, छकउ इ. गुंतवण्याचं..
२००८ ची जागतिक मंदी, बेन बेनार्के (अमेरिकन फेडरल बँकेचे तत्कालीन अध्यक्ष), दिवाळखोरीत गेलेली आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेची लेहमन  ब्रदर्स बँक.. सामान्यांसाठी या सगळ्या गोष्टी काही लेख वाचण्यापुरत्या वा काहींना जमा करून विस्मय करण्यापुरत्याच आहेत. अशा घटनांमुळे बँक/ गुंतवणूक क्षेत्राबाबतची त्यांची अनामिक भीती वाढीस लागते. या भीतीचे पर्यवसान सुरक्षित आणि असुरक्षित गुंतवणूक यातला भेद मिटवण्यात होऊन सामान्य व्यक्ती सोने/ प्लॉट्स अशा अनुत्पादक गुंतवणुकीवर विश्वास दाखवण्यात होते. असा चलनातला पैसा अचल झाल्याने त्याचा विघातक परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो. देशाचा ‘जीडीपी’ पडतो.
मुद्दा हा आहे की, लोकांना शेअर बाजारातील उच्चांक- नीचांक शिकवण्यापेक्षा गुंतवणुकीतील बाबी- बँकेत पैसे भरणे अथवा काढणे इतक्या सोप्या, सहज आणि प्रचलित  बनवणे आवश्यक ठरते. जोपर्यंत विविध माध्यमे, वृत्तपत्रे, सार्वजनिक ठिकाणे, शाळा-कॉलेजांतून गुंतवणुकीबाबत प्राथमिक गोष्टी सांगितल्या जाणार नाहीत, तोपर्यंत लोकांमध्ये अर्थभान येणार नाही, हे खरे!
उदय कदम

मराठीतील सर्व पडसाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta lokrang response
First published on: 09-11-2014 at 01:13 IST