आधुनिक काळातील पालकत्व हे एक आव्हान आहे आणि ते पेलण्यासाठी पालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पालकत्व हे मुलांचे पालन-पोषण, शिक्षण, त्यांना स्वत:च्या पायावर उभं राहायला शिकवणं या यापेक्षाही खूप व्यापक आणि सखोल आहे. आधुनिक काळात  पालकत्वाची भूमिका निभावताना पालकांना अक्षरश: गांगरून जायला होतं. पूर्वीच्या पालकत्वामध्ये आणि आताच्या पालकत्वामध्ये मोठा फरक आहे आणि तो लक्षात घेऊन पालकत्वाची भूमिका साकारायला हवी, तेही कोणताही ताणतणाव न घेता. सकारात्मक पालकत्वासाठी तसंच अधिक सुजाण पालकत्वासाठी ‘पालकशाळा’ हे डॉ. श्रीराम गीत यांची संकल्पना, संयोजन आणि सहभाग असलेल्या पुस्तकात सहजतेने मांडण्यात आलं आहे. या पुस्तकातून मानसोपचारतज्ज्ञ, डॉक्टर्स, समुपदेशक, शिक्षण अभ्यासक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी पालकत्वाचे विविध पैलू उलगडून दाखले आहेत जे पालकांना मार्गदर्शक ठरतील.

प्रसाद मणेरीकर यांच्या ‘पालकत्व : आजचे, उद्याचे’ या लेखात मुलांना कसं समजून घेता येईल, मूल म्हणजे प्रॉडक्ट नव्हे, तर त्यांना प्रेमाचं, पािठब्याचं, सुरक्षित आणि पोषक वातावरण कसं मिळेल यासाठी प्रयत्न करायला हवेत असं नमूद करण्यात आलं आहे.

Mahindra Bolero Neo Plus SUV launch
Force Citiline, Gurkha 5-door विसरुन जाल! टोयोटानंतर आता महिंद्राने देशात दाखल केली ९ सीटर SUV कार, किंमत…
Do not come to ask for votes placards from onion growers in Malwadi
मत मागण्यासाठी येऊ नये, माळवाडीत कांदा उत्पादकांकडून फलक
students election duty marathi news
निवडणुकीच्या कामासाठी आता विद्यार्थ्यांचीही नियुक्ती
Techie doubles his income
वर्षाला १ कोटी रुपये कमावण्यासाठी व्यक्तीने शोधला जुगाड, लाखोंचे शैक्षणिक कर्जही फेडलं, एकाच वेळी केल्या….

‘स्मार्ट पालकत्व’ या डॉ. सुनील गोडबोले  यांच्या लेखात मुलांमधलं नेमकं कौशल्य कसं ओळखावं हे सांगताना हॉवर्ड गार्डनर या शास्त्रज्ञाने  सांगितलेल्या बहुआयामी बुद्धिमत्तेचे आठ पैलू सांगितले आहेत. त्याचबरोबर शारीरिक-गतिबोधक बुद्धिमत्ता, कारक कौशल्यांवर परिणाम करणाऱ्या गोष्टी, निरीक्षणशक्ती, सांगीतिक बुद्धिमत्ता, भाषिक बुद्धिमत्ता यांचा विकास कसा करावा याविषयी मार्गदर्शन केलं आहे. तर डॉ. वैशाली देशमुख यांनी मुलांशी संवादाचा पूल कसा साधता येईल हे सांगितले आहे. डॉ. अविनाश भोंडवे यांनी किशोरवयातील बदलांमध्ये पालकांचा सहयोग कसा असावा याबाबत उत्तम मार्गदर्शन केले आहे. डॉ. अनघा लवळेकर यांनी पालकांनी अतिनियंत्रण, अतिस्वातंत्र्य या द्विधा मन:स्थितीवर कशी मात करावी हे सांगितले आहे.

हे पुस्तक आपल्या पाल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिक व्यापक करतंच, पण पालकांना आधुनिक पालकत्वाच्या समस्यांवर मात करण्यास अचूक मार्गदर्शन करतं. तसंच मुलांची बुद्धिमत्ता, वर्तन याबाबत सविस्तर माहिती देतं. सुजाण पालकत्वासाठी व मुलांना अधिक समजून घेण्यासाठी हे पुस्तक पालकांसाठी उपयुक्त ठरतं.

पालकशाळा- डॉ. श्रीराम गीत

(संकल्पना, संयोजन, सहभाग), मनोविकास प्रकाशन,

पाने-१८०, किंमत-२०० रुपये.