प्रशांत कुलकर्णी – prashantcartoonist@gmail.com

गेल्या पन्नास-साठ वर्षांत जगात भरभराटीला आलेला उद्योग म्हणजे पर्यटन. लोकांमध्ये विविध अपरिचित ठिकाणी जाऊन तिथला  प्रदेश, संस्कृती, भाषा, खाद्यप्रकार वगैरेचा आनंद घेण्याची वृत्ती वाढीस लागली. यानिमित्ताने प्रवास, हॉटेलिंग, टुरिस्ट गाइड, नवीन वस्तूंची विक्री, इत्यादी व्यवसाय बरोबरीने वाढू लागले. या साऱ्यांचं यथार्थ चित्रण जगभरातील हास्यचित्रकारांनी नेमकेपणाने रेखाटलं आहे.

Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
Industrial production rate advanced 5.7 percent in February
औद्योगिक उत्पादन दर फेब्रुवारीमध्ये ५.७ टक्क्यांपुढे
Mukesh Ambani
जागतिक महाश्रीमंतांमध्ये मुकेश अंबानी नवव्या स्थानी; देशातील धनाढ्याच्या संपत्तीत वर्षभरात ४१ टक्क्यांची वाढ
Nagpur, Beauty Parlors, Emerging , Hub for Prostitution, 220 Young Women, Trapped, in 4 Years, crime news, marathi news,
ब्युटी पार्लर देहव्यापाराचे मुख्य केंद्र, चार वर्षांत उपराजधानीतील २२० मुली देहव्यापारात

चित्रविचित्र प्रकारचे कपडे घालणारे हे पर्यटक म्हणजे उदयाला आलेला एक नवीन प्राणीच म्हणावा लागेल. बर्मुडा पॅन्ट, फुलाफुलांचे ढगळ टी-शर्ट, मोठी टोपी, गळ्यात कॅमेरा, शिवाय दुर्बीण, स्पोर्ट शूज अशा अवस्थेत बरेच पर्यटक स्वत:च प्रेक्षणीय स्थळ बनतात. ही संकल्पना घेऊन ‘पंच’ साप्ताहिकातलं हे चित्र अगदी धमाल म्हणावं असंच आहे. साध्या बदकांचे डोनाल्ड डकविषयीचं मत या चित्रातून व्यक्त होतंय, असं वाटत असलं तरी टिपिकल इंग्लिश-अमेरिकन संबंधही त्यातून सूक्ष्मपणे प्रतीत होतो. (डोनाल्ड डक हा खरा पर्यटक! कारण त्याने अ‍ॅनिमेशनच्या माध्यमातून अख्खं जग बघितलंय!)

व्हेनिस शहर हे कालव्यांसाठी प्रसिद्ध आहे. तिथे शहरातून छोटय़ा बोटीतून फेरफटका मारणं हे रोमँटिक समजलं गेलं आहे. अशा वेळी एका व्यंगचित्रातील नवविवाहित जोडप्यातील नवरा हा बायकोवर इम्प्रेशन मारण्यासाठी म्हणतोय, ‘‘मला व्हेनिस शहर खूप आवडतं. इथे प्रवासात खाचखळगे किंवा खड्डे अजिबात जाणवत नाहीत!!

नवराबायकोने एकत्र कुठे तरी सहलीला जायचं ठरवलं तरी प्रत्यक्ष टूर बुकिंगच्या वेळेस लक्षात येतं की, आपल्या दोघांचं जग वेगळंच आहे. त्यामुळे या कार्टूनमधील पती-पत्नी हे दोन भिन्न जगांत जाऊन आपल्याला हवं असलेलं जग पाहू इच्छित आहेत.

पिटर अर्नो हे जुन्या पिढीतील अमेरिकन व्यंगचित्रकार. अतिशय उत्तम कल्पनाशक्ती, काळ्या-पांढऱ्या रंगांचा प्रभावी वापर, नेमकी- पण मर्यादित अतिशयोक्ती, उत्तम रेखाटन आणि एक्स्प्रेशन्स यांमुळे त्यांची चित्रं खूप लोकप्रिय आहेत. पर्यटनामध्ये बर्ड वॉचिंग हा एक प्रकार असतो. अनेक लोक जंगलात जाऊन विविध प्रकारचे दुर्मीळ पक्षी पाहतात आणि त्यांचा काही जण अभ्यासही करतात. पिटर अर्नो यांचं हे सोबतचं चित्र म्हणजे पक्षी निरीक्षकांच्या वेडाची  केलेली गंमत आहे.

महंमद नौर बिन महंमद खालिद ऊर्फ लाट (LAT) हे मलेशियातील लोकप्रिय व्यंगचित्रकार आहेत. पर्यटन या विषयावरती त्यांनी भरपूर व्यंगचित्रं काढली आहेत आणि ते साहजिकच आहे, कारण मलेशिया हे जगातील पर्यटकांचं आवडतं ठिकाण आहे. राजकीय, सामाजिक भाष्यं असलेली व्यंगचित्रंही ते काढतात. त्यांच्या व्यंगचित्रांचे अनेक संग्रह प्रकाशित झाले आहेत. लहानपणी गरिबीमुळे ते वयाच्या अकरा-बारा वर्षांचे असतानाच मासिकं, दैनिकं यांत चित्रं काढून घरखर्चाला मदत करीत. त्यांच्या सोबतच्या व्यंगचित्रात मलेशियन संस्कृती  दिसते. म्युझियममध्ये अनेक वस्तू आहेत आणि त्यात एक भला मोठा आरसा लावलेला आहे आणि सगळे त्यात निरखून पाहतात- जणू काही ते एखादं पेंटिंग आहे! आणि पाहणाऱ्यांमध्ये अनेक प्रकारचे, विविध वंशांचे लोक आहेत. मलेशियन संस्कृती ही किती बहुविध आहे, याचं खऱ्या अर्थाने प्रतिबिंब यात उमटलेलं दिसतं.

पर्यटन या विषयावरती काही वर्षांपूर्वी नियमितपणे हास्यचित्र काढताना मी एक व्यक्तिरेखा उभी केली- जिच्यामार्फत या पर्यटन संस्कृतीवरती भाष्य होत राहील. ही व्यक्तिरेखा म्हणजे एक तरुण, उत्साही मुलगी होती; अभावितपणे गमतीदार भाष्य करणारी. तिचं नाव ठेवलं ‘मिस गाइड’! या मिस गाइडचे काही नमुने पाहता येतील.

मुंबईतला ‘गेटवे ऑफ इंडिया’ पर्यटकांना दाखवताना ती म्हणते, ‘‘ब्रिटिशांना भारताबाहेर पडणं सोयीचं व्हावं म्हणून हा दरवाजा Get Away Off  India या नावाने भारतीयांनी बांधला.’’

एका अत्यंत प्राचीन इमारतीच्या अवशेषांकडे बोट दाखवून ती म्हणते की, ‘‘ही वास्तू कुणी, कोणासाठी, का आणि कधी बांधली याचे काहीही पुरावे किंवा माहिती उपलब्ध नाही. यावरून ही वास्तू किती प्राचीन असेल याची आपल्याला कल्पना येईल!’’

पावसाळ्यात आपल्याकडे वर्षांसहल काढण्याची टूम असते आणि नामवंत टुरिस्ट कंपन्या एखाद्या सेलेब्रिटींना, विशेषत: कवी वगैरे यांना सोबत घेऊन अशा सहली काढतात. या ठिकाणी मग कविराजांचे काव्यवाचन वगैरे होतं. त्यासाठी प्रस्तावना करताना ही मिस गाइड म्हणते, ‘‘आजूबाजूची हिरवीगार झाडे, रिमझिम पाऊस, छान थंड हवा इत्यादींचा आपणाला विसर पडेल इतके सामथ्र्य कविराजांच्या ‘दुष्काळ’ या कवितेत आहे!’’

अनेक थंड हवेच्या ठिकाणी ‘सन सेट’ दिसणारी खास ठिकाणे असतात. दूर लांब टेकडीवरच्या एका ठिकाणाकडे बोट दाखवत ही मिस गाइड म्हणते, ‘‘तिथून सूर्यास्त खूप सुंदर दिसतो! फक्त तिथे जायचं असेल तर सूर्योदयापासून टेकडी चढायला सुरुवात करावी लागते!!’’

एखाद्या ‘लायन सफारी’सोबत समजा ही मिस गाइड असेल, तर काय प्रसंग ओढवू शकतो हे सोबतच्या चित्रात रेखाटलं आहे. चला तर मग सहलीला, आमच्या मिस गाइडसोबत!!