News Flash

श्यामाप्रसाद यांचे योगदान अमूल्य – पंतप्रधान

जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी देशाला दिलेले योगदान अमूल्य आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुखर्जी यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या.

| July 7, 2014 03:27 am

जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी देशाला दिलेले योगदान अमूल्य आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुखर्जी यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या.
मुखर्जी यांच्या एकशे तेराव्या जयंतीनिमित्त रविवारी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मोदी यांच्यासह लालकृष्ण अडवाणी, लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन, राज्यसभेचे उपसभापती पी. जे. कुरियन, रेल्वेमंत्री सदानंद गौडा, आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन आदी नेते उपस्थित होते. या सर्वानी मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. सेवाभाव हे मुखर्जी यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्टय़ होते. देशातील तरुणांनी अधिकाधिक शिकले पाहिजे, यावर ते नेहमी भर देत असत. त्यांनी देशाला दिलेले योगदान अमूल्य आहे, असे मोदी म्हणाले.  तत्कालीन राष्ट्रपती आर. व्यंकटरामन यांच्या हस्ते ३१ मे १९९१ रोजी सेंट्रल हॉलमध्ये मुखर्जी यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2014 3:27 am

Web Title: delhi bjp pays tribute to syama prasad mookerjee
टॅग : Bjp
Next Stories
1 विरोधी पक्षनेतेपद नाकारल्यास काँग्रेसने न्यायालयात जावे – कमलनाथ
2 उद्धव भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशीच चर्चा करणार
3 ‘ताईच’ पहिल्या महिला मुख्यमंत्री
Just Now!
X