News Flash

मोदींची विचारसरणी देशासाठी घातक -राहुल गांधी

नरेंद्र मोदी यांच्याशी वैयक्तिक मतभेद नाहीत. परंतु मोदींच्या विचारसरणीला विरोध आहे. ही विचारसरणी देशासाठी घातक आहे.

| March 27, 2014 04:25 am

नरेंद्र मोदी यांच्याशी वैयक्तिक मतभेद नाहीत. परंतु मोदींच्या विचारसरणीला विरोध आहे. ही विचारसरणी देशासाठी घातक आहे. मोदी सत्तेत आल्यास देशाचे मोठे नुकसान होईल, अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. ‘मोदी पंतप्रधान झालेत तर देश उद्ध्वस्त होईल’, या पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यानी दोन महिन्यांपूर्वी केलेल्या विधानाचे जोरदार समर्थन राहुल गांधी यांनी केले. भाजपच्या आक्रमक प्रचाराला ‘इंडिया  शायनिंग’ची उपमा राहुल यांनी दिली. २००४प्रमाणे यंदाही भाजपच्या प्रचाराचा फुगा फुटेल, अशी भविष्यवाणी राहुल यांनी वर्तवली. काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा आज प्रसिद्ध करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना राहुल गांधी म्हणाले की, मोदींची विचारधारा देशाच्या विरोधात आहे. या विचारधारेचा पराभव करण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करीत आहे. उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या ८० जागा परिणामकारक ठरतील, असेही राहुल गांधी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2014 4:25 am

Web Title: modi ideology harmful to nation rahul gandhi
Next Stories
1 अ‍ॅन्टनी, केजरीवाल पाकिस्तानचे दलाल – मोदी
2 मोदींना वाराणसीत कडवे आव्हान देण्याचा सोनियांचा निर्धार
3 केजरीवालांकडून जनतेची फसवणूक
Just Now!
X