राज्यसभा सभागृहाचे नेते म्हणून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची, तर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्या नावांची सोमवारी घोषणा करण्यात आली. राज्यसभेचे अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी जेटली आणि आझाद यांच्या नावांची घोषणा केली.
राज्यसभेसाठी शरद यादवांसह जदयुचे तीन उमेदवार
पटणा : बिहारमध्ये सध्या राज्यसभेच्या जागांचे राजकारण तापत आह़े  संयुक्त जनता दलाने अध्यक्ष शरद यादव यांच्यासह तीन जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत़  त्यातच अनेक अपक्षांना बंडखोरांनी पाठिंबा दिला आह़े  त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच रंगत आली आह़े  यादव यांच्यासोबतच जदयूतर्फे माजी राजनैतिक अधिकारी पवन वर्मा आणि गुलाम रसूल बल्यावी यांनी पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरले आहेत़  सोमवारी त्यांनी अर्ज भरले, त्यावेळी मुख्यमंत्री जितेन राम मांझी, माजी मुख्यमंत्री नितीश कुमारही उपस्थित होते.
‘समाजमाध्यमांचा न्याय्य वापर व्हावा’
नवी दिल्ली : सामाजिक माध्यमांचा वापर जबाबदारीने व्हावयास हवा. या माध्यमांनी ऐक्य साधण्याचे काम करावयास हवे. मात्र दुर्दैवाने आज ही माध्यमे समाजात दुहीची बीजे पेरणारी साधने ठरीत आहेत, अशा शब्दांत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आपली खंत व्यक्त केली. देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य घटनेनेच दिले आहे. मात्र त्याचा वापर जबाबदारीनेच व्हावयास हवा. स्वातंत्र्य आणि जबाबदारी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सध्या समाजमाध्यमांमधून विखारी मजकूर पसरविला जात आहे. हे चित्र बदलावयास हवे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
‘हा तर ठिगळे लावण्याचा प्रयत्न’
मुंबई : सकल राज्य उत्पन्न वाढले असले तरी महसूल वाढत नसून तूटही वाढत आहे. कर्जाचा डोंगर वाढत असून राज्य आर्थिक संकटात असल्याचे टीकास्त्र विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत सोडले. आतापर्यंत शिलकी अर्थसंकल्प मांडला जात असे व वर्षअखेरीस तो तुटीचा होई. आता मात्र विधानसभेतही पराभूत होणार या हताश जाणीवेने तुटीचाच अर्थसंकल्प मांडून परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे सरकारने दाखवून दिल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले. उद्योगांना पुरेशी वीज नसून मोठय़ा कंपन्या राज्याबाहेर जात आहेत. हा अर्थसंकल्प नसून ठिगळे लावण्याचा प्रकार आहे, अशी टीका त्यांनी केली.