दुसऱ्या टप्प्यात १९ मतदारसंघांमध्ये होणाऱ्या निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या चार सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवारी लातूर आणि शिर्डी मतदारसंघांत त्यांच्या सभा होतील. मंगळवारी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी पुणे आणि हिंगोली मतदारसंघांत सभांचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यात नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या पाश्र्वभूमीवर राहुल गांधी यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. हिंगोलीमध्ये राहुल यांचे निकटवर्तीय अ. भा. युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजीव सातव हे निवडणूक लढवीत आहेत. राहुल यांच्यामुळेच काँग्रेसने रायगडच्या बदल्यात हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडून मिळविला होता. या सभांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत.