हरयाणा, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर व झारखंड या चार राज्यांतील निवडणुकांच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाकडून पुढील आठवडय़ात होण्याची शक्यता आहे.
हरयाणात २७ ऑक्टोबरला, तर महाराष्ट्रात ८ नोव्हेंबरला विधानसभेची मुदत संपत आहे. झारखंड विधानसभेची मुदत ३ जानेवारीला, तर जम्मू व काश्मीर विधानसभेची मुदत १९ जानेवारीला संपत आहे. विधानसभा निवडणुकांच्या मुदती संपण्यापूर्वी या राज्यांमध्ये निवडणुका होणे अपेक्षित
आहे.
निवडणूक आयोगाने निवडणूक याद्यांची छाननी केली आहे. महाराष्ट्र व झारखंडमध्ये भाजपला, तर हरयाणात भाजप व मित्र पक्षांना यशाची आशा आहे.
हरयाणा व महाराष्ट्र या राज्यांत सध्या काँग्रेसची सत्ता असून झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे अल्पमतातील सरकार आहे, त्याला काँग्रेसचा पाठिंबा आहे.
यावर तारखा अवलंबून
 गणेश चतुर्थी, दसरा व दिवाळी तसेच केंद्रीय दलांची तैनाती यावर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा अवलंबून आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये थंडी, अधिकाऱ्यांची तैनाती तर नक्षलग्रस्त झारखंडमध्ये सप्टेंबरमधील पाऊस हे निवडणूक तारखा ठरवण्यातील महत्त्वाचे घटक आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ec to announce maharashtra haryana poll dates present week
First published on: 25-08-2014 at 01:59 IST