राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राम पंडागळे यांनी बुधवारी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्याप्रमाणेच काँग्रेस-राष्ट्रवादीमधील आणखी काही दलित नेते-कार्यकर्ते शिवसेना-भाजपच्या वाटेवर आहेत. राष्ट्रवादीमधील पंडागळे यांनी इंदू मिलच्या प्रश्नावर विधान परिषदेत आवाज उठविला होता. त्यांचा आमदारकीचा कार्यकाल संपल्यानंतर त्यांना डावलण्यात येऊन अन्य मागासवर्गीय कार्यकर्त्यांची त्यांच्या जागी वर्णी लावण्यात आली. त्यांनी बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश करून राष्ट्रवादीला धक्का दिला.
राष्ट्रवादीत आणखी काही ज्येष्ठ दलित कार्यकर्ते नाराज आहेत. अशा नाराजांची भाजप-सेनेसह अन्य पक्षांत प्रवेश करण्यासाठी चाचपणी सुरू आहे.
दरम्यान सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन राजकारणात उतरलेले माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी नागपुरात बसपमध्ये प्रवेश केल्याची त्या पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. सुरेश माने यांनी माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp mlc ram pandagale joins shiv sena
First published on: 14-08-2014 at 12:01 IST