राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सुकन्या आणि बारामती लोकसभा मतदार संघातील पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आज(शुक्रवार) निवडणूक आयोगाकडे आपल्या संपत्तीचे शपथपत्र सादर केले.
सुप्रिया सुळे यांनी आपल्या शपथपत्रात नमूद केल्यानुसार, त्यांची मालमत्ता ३१.६२ कोटी इतकी आहे, तर स्वत: सुप्रिया, पती आणि दोन मुले यांची एकूण मिळून ११३.८७ कोटी इतकी मालमत्ता आहे. यामध्ये बँकेतील ठेवी, दाग-दागिने, जमिन अशा सर्वबाबींचा समावेश आहे.
गेल्या काही दिवसांपासून सर्वपक्षीय उमेदवारांची शपथपत्रातील मालमत्ता पाहून मतदार चकित होत असून उमेदवारीअर्ज भरताना दाखवलेली वैयक्तिक संपत्ती एवढी असेल, तर प्रत्यक्ष संपत्ती केवढी असेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
जाणून घ्या इतर उमेदवारांची मालमत्ता- अबब! दाखवलेली मालमत्ता एवढी, तर.. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawars daughter supriya sule declares rs 31 62 cr assets
First published on: 27-03-2014 at 02:02 IST