आयुर्वेदातील ढवळी गाय, गुत्समद ऋषीच्या आश्रमातील गाय या गवळाऊ असल्याचे संदर्भ आहेत. मराठा राजांनी गवळाऊ जातीच्या जनावरांचा उपयोग गोंड राजावरील आक्रमणासाठी केला होता. इंग्रजांनीच या प्रजातींचा सर्वप्रथम अभ्यास करून या प्रजातींच्या माध्यमातून डोंगरदऱ्यातील वाहतूक सुलभ केली. असा वारसा लाभलेली ही गाय वर्धेशिवाय नागपूर छिंदवाडा जिल्ह्य़ात आढळते. काटक, चपळ तीव्रगतीने धावण्याची क्षमता असणारी ही गाय पाणी किंवा चाऱ्याची कमतरता असली तरी तग धरून राहते. मात्र, गवळाऊ गाईंची संख्या कमी होत असल्याने त्यांच्या वंशविस्तारासाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे.

survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
Tungareshwar Protected Forest is in danger
तुंगारेश्वरचे संरक्षित वन धोक्यात, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रदूषणकारी कारखाने व अतिक्रमण
Loksatta kutuhal Scope of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीची व्याप्ती

वाघांच्या सुरक्षिततेसाठी अभयारण्याचे क्षेत्र विस्तारल्याने थेट श्रीकृष्णाच्या गोकुळाचा वारसा सांगणाऱ्या गवळाऊ गाईंच्याच अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता विशेष प्रजातीच्या केवळ २२०० गाईच शिल्लक असून त्यांच्या वंशविस्तारासाठी अखेरची धडपड सुरू आहे. बोर व्याघ्र प्रकल्प असतांनाच वनक्षेत्र वाढवून बोर-२ अभयारण्य विस्तारले. वाघांसाठी बफ र झोन करण्याचा हा निर्णय वाघांवरील संकट दूर करण्यासाठी झाला. मात्र, त्यामुळे वाघांपेक्षा प्राचीन अधिवास असणाऱ्या गवळाऊ गाईचा वनवास संपला.

जंगल, पहाडी क्षेत्रास अनुकू ल असणारी शरीररचना व चेहरेपट्टी या गाईंचे वेगळेपण आहे. चारा संपल्यामुळे ही गाय पाळीव झाली. अत्यंत वेगळी अशी ही प्रजाती भारतात वर्धा वनक्षेत्रात आढळते. डोंगरदऱ्यात उपयुक्त खोलगट रचनेचे जुळलेले खूर, शेपटीचा काळा गोंडा पायापर्यंत लांबणारा, मागे वळलेले शिंगे, डोळे रुंद व तोंडाकडे निमुळते होते गेलेले, अशी ठेवण आहे. या गाईखेरीज खिल्लार, लाल कंधार, देवळी व डांगी, अशा शुध्द भारतीय गाईंच्या प्रजाती आहेत, पण त्यापैकी गवळाऊचा तोराच न्यारा. कौंडिण्यपूरची राजकन्या रुख्मिणीच्या प्रेमविवाहविषयक आलेल्या पौराणिक कथेत या गाईचा उल्लेख आढळतो. विवाहाच्या वेळी झालेल्या युध्दात श्रीकृष्णाचे सहकारी याच परिसरातील डोंगरकपाऱ्यात वसले. त्यांच्याकडे असणारे गोधन हेच गवळाऊ प्रजातीचे गोधन म्हणून प्रसिध्दीस आले. आयुर्वेदातील ढवळी गाय, गुत्समद ऋक्षीच्या आश्रमातील गाय या गवळाऊ असल्याचे संदर्भ आहेत. मराठा राजांनी गवळाऊ जातीच्या जनावरांचा उपयोग गोंड राजावरील आक्रमणासाठी केला होता. इंग्रजांनीच या प्रजातींचा सर्वप्रथम अभ्यास करून या प्रजातींच्या माध्यमातून डोंगरदऱ्यातील वाहतूक सुलभ केली. असा वारसा लाभलेली ही गाय वर्धेशिवाय नागपूर व छिंदवाडा जिल्ह्य़ात आढळते. काटक, चपळ व तीव्रगतीने धावण्याची क्षमता असणारी ही गाय पाणी किंवा चाऱ्याची कमतरता असली तरी तग घरून राहते. अतिउष्ण किंवा अतिथंड तापमान सहन करणारी ही गाय चरतांना वारंवार मान वर करून कळपाचा अंदाज घेत भ्रमंती करते. सर्वात महत्वाचे म्हणजे, दुधाची गुणवत्ता उत्तम प्रतीची मानली जाते. औषधी तत्वांनी भरपूर असल्याने वैद्यराज आयुर्वेदिक औषधे तयार करताना या गाईच्या तूपास प्रथम पसंती देतात. हातावर तूप चोळल्यास ते त्वचेत झिरपते.

जन्मताच लाल तांबडा टिळा मस्तकावर असणाऱ्या वासराचा हा टिळा २१ दिवसानंतर नष्ट होतो. मात्र, या दुर्मीळ झालेल्या प्रजातीला आता संकटाने घेरले आहे. सर्वप्रथम या प्रजातीचा अभ्यास करणाऱ्या इंग्रजांनी गाईला अभय दिले. नंदागवळी समाजाने जोपासले. शासकीय पातळीवर गोवंश संवर्धन योजनेंतर्गत १९८६ साली कारंजा तालुक्यातील हेटीकुंडी येथे ३२४ हेक्टर जागेत हा वंश जतन करण्यासाठी विशेष क्षेत्र तयार केले. डॉ.अहलावत यांच्या मार्गदर्शनाखाली २००४ साली या प्रजातीचे शास्त्रोक्त पध्दतीने अध्ययन सुरू झाले. २००५ साली वर्धा जिल्ह्य़ात गवळाऊ गायवर्ग नोंदणी व विकास सहकारी संस्था स्थापन झाली. याच संस्थेतर्फे  शासनास प्रस्ताव दिले जातात, पण डोंगरदऱ्यातील चाऱ्यावर जगण्याची सवय असणाऱ्या या गाईला पुढे चाऱ्याचे दुर्भिक्ष जाणवू लागल्याने पशूसंवर्धन विभागाने खास ‘फ ोडर कॅफे टेरिया’ तयार केला. विविध प्रजातींच्या गवताची जोपासना झाली. गवळाऊला मनपसंद चारा उपलब्ध झाला. हे चाराक्षेत्र खास गवळाऊ गाईसाठीच निर्माण झाल्याची माहिती या गाईच्या संवर्धनासाठी धडपडणारे डॉ.सतीश राजू यांनी दिली. चराईबंदी झाल्यानंतर उद्भवलेले संकट आता दूर होत आहे. गवळाऊ प्रजाती नष्ट होऊ नये म्हणून प्रदर्शने, दुग्ध स्पर्धा, कृती शिबिरे घेण्यात येत आहेत. दूधाचे उत्पन्न वाढत आहे. पैदास वाढत आहे, असे डॉ.राजू म्हणाले. मध्यंतरी हेटीकुंडीचे केंद्र मेळघाट-धारणी परिसरात नेण्याचा विचार झाला. काही गाईही पाठविल्या, पण या प्रदेशातील आदिवासींना गोपालकाचे अंग नसल्याने विस्तार थांबला. तेथील पोहरा केंद्र आता बंद झाले आहे. आता आहे त्या गाईचे संवर्धन करण्यासाठी गावरानी गाईला गवळाऊच्या वळूने अपग्रेड करण्याची पद्धत विकसित करण्यात आली आहे. ५०, ७५ व शेवटी १०० टक्के गवळाऊ गाईचा बछडा सात वर्षांत तयार होतो. जर्सी वाण पूर्णत: बाजूला टाकण्यात आले आहे. येत्या पाच वर्षांत गवळाऊंची संख्या लक्षणीय वाढेल, असा विश्वास डॉ.राजू यांना आहे.

गाईच्या दुधाला भाव नसल्याने गवळी समाज मधल्या काळात उदासीन झाला होता. त्या दृष्टीने ऑनलाइन बाजारपेठ विविध संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे. नाशिक-पुण्यापर्यंत तूपास मागणी आहे. गत हिवाळी अधिवेशनात या तुपाची चव चाखणाऱ्या मान्यवरांनी आता सतत मागणी चालविली आहे. १०००-१५०० रुपये प्रती किलो तूप विकले गेले. या तुपाचा सुगंध घेणारा दुसऱ्या तूपाची आठवणही काढणार नाही, असा दावा केला जातो. मंत्रालयातील एका उपसचिवाने १२ किलो तूप आपल्या सहकाऱ्यांना दिले होते. आता मुंबईतून मागणीची आगावू नोंद होत असल्याचे द्वारकाधीश तूप उत्पादक संस्थेतर्फे  सांगण्यात आले. पुढील काळात अधिक चांगले दिवस येण्याची खात्री दिली जाते. पतंजली फू ड पार्क, मदर डेअरी व सिंदी येथील ड्रायपोर्ट या माध्यमातून दूधाला मागणी येईल तेव्हा गवळाऊ गाईच्या तुपाचा सुगंध आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचेल, असा विश्वास संवर्धन करणाऱ्या गवळ्यांना वाटतो. हेटीकुंडीच्या संवर्धन केंद्राचा वळविण्यात आलेला निधी आता परत मिळाला आहे. गवळाऊ गाईचे लोकांमार्फ त संवर्धन करण्याचा हा प्रयत्न आहे.

गवळाऊ गाईंची संख्या घटत असल्याने याकडे शासनाने आणि कृषि विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा शेतकऱ्याला अत्यंत उपयुक्त असणाऱ्या या गवळाऊ गाईची प्रजाती नष्ट होण्याचा धोका आहे. शासनाकडून इतर राज्यातील किंवा विदेशी गाईंचे वाण विकसित करण्याचा सातत्याने प्रयत्न झालेला आहे. आणि महाराष्ट्रात त्याचा विकासही झाला आहे. मात्र, महाराष्ट्रातीलच एका गाईंची जात नष्ट होण्याच्या मार्गावर असताना शासन काय उपाययोजना करणार यासाठी सर्व पातळ्यांवर पाठपुरावा करणे आवश्यक ठरणार आहे. दुग्धोत्पादन वाढविण्यासाठी जर्सी आणि होल्सटीन फ्रिसियन या गाईंच्या वाणास संपूर्ण राज्यात प्रोत्साहन देण्यात आले होते. आज त्याच पाश्र्वभूमीवर वर्धा आणि नागपूर या गवळाऊ गाईंचे अस्तित्व असणाऱ्या भागात सरकारने या गाईंच्या वंशविस्तारासाठी नियोजित कार्यक्रम आखणे आणि शेतकऱ्यांना माहिती देणे शक्य आहे. भाकड गाईंच्या सांभाळासाठी राज्य सरकारने पाऊल उचलले होते. त्यामुळे गवळाऊ गाईंच्या वंशविस्ताराची जबाबदारी शासनासह शेतकऱ्यांनीही घेणे गरजेचे आहे.

  • प्रजाती – गवळाऊ
  • अन्य नावे – आरवी, गौलगनी
  • गोपालनाचा उद्देश – दूध आणि मांसासाठी
  • वैशिष्टय़ – जंगल, पहाडी क्षेत्रास अनुकू ल असणारी , दुधाची गुणवत्ता उत्तम प्रतीची, आयुर्वेदिक औषधे तयार करताना या गाईच्या तुपास प्रथम पसंती.
  • प्रदेश – गवळाऊ गाय महाराष्ट्रात वर्धा, नागपूर येथे मध्य प्रदेशात छिंदवाडा येथे आढळते.

prashant.deshmukh@expressindia.com