• २०१५-१६ या वर्षांत भारतात २५ हजार ५०० कोटी रुपयांची डाळ आयात करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारकडून संसदेत देण्यात आली आहे.
  • जुलै २०१६ अखेरीस भारतात ६९ हजार टन डाळींचा साठा असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री एस.एस. अहलुवालिया यांनी दिली.
  • टन इतक्या कमी प्रमाणात डाळींचे उत्पादन झाल्यामुळेच ही आयात करण्यात आली. त्याचप्रमाणे २३.५ दशलक्ष टन डाळींची मागणी असल्याने उपलब्ध उत्पादनाद्वारे मागणी पूर्ण करण्यात येत नसल्याचे केंद्राकडून सांगण्यात आले.
  • डाळींची मोठय़ा प्रमाणात होणारी आयात घटविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठय़ा प्रमाणात डाळींचे उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत असल्याचेही केंद्राकडून सांगण्यात आले.

लासलगावला कांद्याचा खुला लिलाव

  • बाजार समिती संचालकांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत कांद्याचा खुला लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • येत्या ४ ते ५ दिवसांत याबाबत कार्यवाही करण्यात येणार असून व्यापाऱ्यांना नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत. या निर्णयात सहभागी न होणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
  • शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी गोणीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, हा निर्णय ६ ऑगस्टपर्यंतच मर्यादित होता. गोणीच्या निर्णयामुळे व्यापारी भाव पाडून कांदा खरेदी करत आणि नफा मिळवत होते. यामुळे शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी खुल्या पद्धतीने लिलावचा निर्णय घेण्यात आल्याचे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.