29 May 2020

News Flash

बीजोत्पादनातून सुबत्ता

नांदेड जिल्हय़ातील मौजे मांजमरवाडी हे आदिवासीबहुल गाव आहे.

नांदेड जिल्हय़ातील नायगाव तालुक्यातील मांजरमवाडी या गावातील दत्ता शेटेवाड यांच्या शेतातील कारल्याचे बीजोत्पादन.

नांदेड जिल्हय़ातील मौजे मांजमरवाडी हे आदिवासीबहुल गाव आहे. ११० घरांच्या या गावात १९८७पासून कापसाचे बीजोत्पादन घेतले जाते. प्रारंभी एच नंतर नांदेड ४४ आता बिटी कापूस, भाजीपाल्याचे बीजोत्पादन घेण्याकडे गावाचा कल आहे. या गावचा शिवार केवळ ३०० एकराचा. तोही हलक्या जमिनीचा. बहुतेकांना एक एकरपेक्षाही कमीच जमीन आहे, त्यामुळे या गावातील शेतकरी बीजोत्पादनाकडे वळले आहेत.

सध्याची शेती आतबट्टय़ाची झाली असल्यामुळे नवनवीन तंत्रज्ञानातून कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. नवीन वाण बाजारपेठेत दाखल होत असल्यामुळे त्या वाणाचे बीजोत्पादन घेतले तर बाजारपेठेपेक्षा कितीतरी अधिक पटीत अधिक पसे मिळतात, याची प्रचिती शेतकऱ्यांना येते आहे. त्यामुळे बीजोत्पादनाकडे लोकांचा कल चांगलाच वाढतो आहे.

नांदेड जिल्हय़ातील मौजे मांजमरवाडी हे आदिवासीबहुल गाव आहे. महादेव काळी समाजाचे लोक या गावात मोठय़ा प्रमाणावर आहेत. ११० घरांच्या या गावात १९८७पासून कापसाचे बीजोत्पादन घेतले जाते. प्रारंभी एच ४ व नंतर नांदेड ४४ व आता बिटी कापूस, भाजीपाल्याचे बीजोत्पादन घेण्याकडे गावाचा कल आहे. २०१३ साली या छोटय़ाशा गावात कापूस बीजोत्पादनाचे तब्बल १ कोटी रुपये आले होते. या गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतही नाही. मांजरम या ग्रामपंचायतीशी ही गाव जोडले आहेत. या गावचा शिवार केवळ ३०० एकराचा. तोही हलक्या जमिनीचा. बहुतेकांना एक एकरपेक्षाही कमीच जमीन आहे, त्यामुळे या गावातील शेतकरी बीजोत्पादनाकडे वळले आहेत.

प्रत्येक शेतकरी कापसाचे बीजोत्पादन घेतो. घरच्या घरीच काम करून बीजोत्पादन केले जाते. बीजोत्पादनाचे काम संपल्यानंतर वीटभट्टीच्या कामावर किंवा ऊसतोडीला या गावातील लोक जातात आणि जर पाऊस चांगला असेल तर भाजीपाल्याचे बीजोत्पादन घेतात.

नांदेड जिल्हय़ातील मांजरमवाडी या गावातील दत्ता केरबा शेटेवाड या शेतकऱ्याकडे केवळ अर्धा एकर जमीन आहे. दत्ता शेटेवाड यांनी पूर्वी इतरांच्या शेतावर काम केले. त्या पशातून स्वत:च्या शेतात िवधनविहीर घेतली व त्याला पाणी लागल्यानंतर बीजोत्पादन सुरू केले. या वर्षी दहा गुंठे क्षेत्रावर पेप्सी ठिबक बसवून त्यांनी कारल्याचे बीजोत्पादन घेतले. पाच फुटावर बेड पाडून त्यावर मिल्चग अंथरले. २ हजार ६५० रुपयांचे मिल्चग बीजोत्पादन कंपनीने पुरवले. कारल्याची लागवड त्यांनी १० जून रोजी केली. कंपनीकडून त्यांना १५० गॅ्रम मादी व ५० गॅ्रम नर बियाणे मिळाले. या बियाण्यातून मादीच्या १६ ओळी व नराच्या २ ओळी लावल्या. बियाणे लावल्यानंतर ५० दिवसांनी परागसिंचनाचे काम सुरू होते व ते ३० ते ४० दिवस अविरत चालते. रोजच्या रोज या बाबीकडे लक्ष द्यावे लागते. नराप्रमाणे मादीच्या वेलावर पण नर फुले येतात व ती फुले नियमितपणे तोडून टाकावी लागतात. मादी फुलाची कळी जी दुसऱ्या दिवशी उमलणार असते त्या निवडून त्यावर दुपारी २ नंतर लाल रंगाच्या कागदाचे पॉकेट लावून यू पीनने ते बंद केले जाते. अशा कळय़ा उमलल्यानंतर मधमाश्यांद्वारे परागसिंचन होऊ नये याची काळजी घेतली जाते व दुसऱ्या दिवशी सकाळी ७ ते ९ या वेळेत मादी फुलावरील लाल पॉकेट काढले जाते व उमलेल्या मादी फुलावर वेगळे लावलेल्या नर वेलीवरील नराचे फुल आणून घासले जाते. यातून परागसिंचनाचे काम होते. यानंतर मादी फूल पांढऱ्या लिफाफ्यात टाकून पीन लावून बंद केले जाते. त्यानंतर या पाकिटातच कारल्याच्या फळाची वाढ होत राहते. परागसिंचन झाल्यानंतर २० ते २५ दिवसांनी कारल्याचे फळ पिकते. पिकलेली फळे रोज वेलीवरून काढून त्यातून बी वेगळे केले जाते व हे बी नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन कपडय़ाने पुसून कोरडे केले जाते. दोन-तीन दिवस ऊन दिल्यानंतर ते कंपनीकडे पाठवले जाते.

दत्ता शेटेवाड यांनी या वर्षी पाच गुंठय़ातच कापसाचे बीजोत्पादन घेतले. प्रतिबूड साधारण एक किलो सरकीचे उत्पादन त्यांना अपेक्षित आहे. नवरा-बायको दोघेजणच सकाळपासून सायंकाळपर्यंत शेतावर काम करतात. शेत जंगलात असल्यामुळे जंगली प्राण्यांचा त्रास होतो. त्यामुळे ते शेतावरच राहतात. प्रचंड कष्ट केले तरच त्यातून चांगले उत्पादन हाती लागते. कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे आपण नवीन प्रयोग करू शकलो व त्यात यश येत गेल्यामुळे आपण अतिशय आनंदी असल्याचे ते म्हणाले. कारल्याच्या बियाणांचा भाव प्रतिक्विंटल १ लाख, तर कापसाच्या बियाण्याचा भाव ५५ हजार रुपये आहे. दत्ता शेटेवाड यांना या वर्षी केवळ २० गुंठय़ात २ लाख ८४ हजार रुपये मिळतील. शेतीतून आíथक लाभ मिळवण्यासाठी मांजरमवाडी या गावाने प्रयोगाचे जे सातत्य ठेवले आहे ते निश्चितच कौतुकास्पद असून इतर शेतकऱ्यांना ते नेहमीच मार्गदर्शक ठरेल.

दत्ता शेटेवाड यांनी या वर्षी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. टी. एस. मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली दहा गुंठय़ात कारले व पाच गुंठय़ात कापसाचे बीजोत्पादन घेतले आहे. गेल्या १५ वर्षांपासून कापसाचे बीजोत्पादन ते घेतात. या वर्षी पहिल्यांदाच त्यांनी कारल्याचे बीजोत्पादन घेतले. कारल्याच्या बीजोत्पादनातून त्यांना १ लाख ९० हजार तर कापसाच्या बीजोत्पादनातून ९४ हजार रुपये मिळणार आहेत. बीजोत्पादनाच्या कौशल्यामुळे व प्रचंड मेहनतीमुळे त्यांचा कुटुंबाचा गाडा चांगला सुरू आहे.

pradeepnanandkar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2016 12:34 am

Web Title: seed production
Next Stories
1 भात उत्पादनाला आधुनिकतेची जोड
2 ‘सोने देणारी’ शेळी!
3 चाईव्हज : फलदायी शेती!
Just Now!
X