30 October 2020

News Flash

भाजीपाला उत्पादनाद्वारे महिला सबलीकरण

काही लोकांना जमीन नाहीत ते लोक शेतमजुरी करून उदरनिर्वाह करतात.

प्रतिनिधिक छायाचित्र

बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे संघटन करून त्यांना आíथकदृष्टय़ा सक्षम करण्याचे काम जिल्हय़ात महिला आíथक विकास महामंडळाने हाती घेतले आहे. हातकणंगले तालुक्यातील मनपाडळे येथे प्रेरणा लोकसंचालित साधन केंद्राच्या माध्यमातून नऊ बचत गटांतील ३० महिलांनी एकत्र येऊन १९ एकर जमिनीमध्ये भाजीपाला उत्पादनाचा यशस्वी प्रयोग करून येथील महिला सक्षमीकरणात नवे पाऊल मनपाडळेच्या महिलांनी टाकले आहे.

महिला आíथक विकास महामंडळामार्फत कोल्हापूर जिल्ह्य़ातील पाच तालुक्यांतील १०८ गावांमध्ये काम सुरू आहे. महिला आíथक विकास महामंडळाच्या माध्यमातून तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत बचत गटातील महिलांचे सहा लोकसंचलीत साधन केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. प्रेरणा लोकसंचालित साधन केंद्र वाठारमधील मनपाडळे हे गाव हातकणंगले तालुक्यात आहे. गावातील लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय असून जास्तीतजास्त लोक शेती व्यवसाय करतात. येथील लोकांना गुंठेवारीवर जमीन आहे. काही लोकांना जमीन नाहीत ते लोक शेतमजुरी करून उदरनिर्वाह करतात. शेतीबरोबर जोडधंदा म्हणून पशुपालन व दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन व कंपन्यांमध्ये मजुरी यांसारखे व्यवसाय करतात. गावातील लोकांचा चरितार्थ शेती व पशुपालनावरच आहे. शेती व दुधाच्या मिळणाऱ्या उत्पन्नातून ते आपले कुटुंब चालवतात.

‘माविम’मार्फत तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्याक्रमांतर्गत स्थापन केलेल्या प्रेरणा लोकसंचालित साधन केंद्राच्या माध्यमातून मनपाडळे गावात बचत गट स्थापन करण्याच्या कामास प्राधान्य दिले. गावाची लोकसंख्या ४ हजार ५०० इतकी असली, तरीही एकही महिला बचत गट नव्हता. परंतु माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब िझजाडे यांच्या  पुढाकाराने सन २०११ साली बचत गट स्थापन करण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला गावामध्ये एकच गट सुरू करण्यात आला. नंतर गावामध्ये ३० बचत गट स्थापन झाले. या गटाच्या माध्यमातून महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिल्याने बचत गटातील महिलांमध्ये आत्मविश्वास वाढीस लागला.

परंपरागत शेतीमध्ये आíथक परिस्थितीमुळे उत्पन्न निघत नव्हते,  त्यामुळे दुसऱ्याच्या शेतावर कामाला जावे लागते. म्हणून गावातील सर्व महिलांनी मिळून व्यवसाय करण्याचे ठरवले. त्यानंतर सहयोगिनींनी गावातील बचत गटाच्या सर्व महिलांना एकत्र करून त्यांना भाजीपाला व्यवसाय करण्याचा सल्ला दिला. यासाठी गावातील नऊ बचत गटांतील ३० महिलांनी पुढाकार घेऊन भाजीपाला व्यवसायाचा प्रस्ताव तयार करून फेब्रुवारी २०१५मध्ये या केंद्राची स्थापना केली. भाजीपाला व्यवसायावर होणारा खर्च कमी करणे व उत्पादनात वाढ करणे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून तयार केला. या केंद्राचा उद्देश साध्य करण्यासाठी माती-पाणी परीक्षण, गाडी व वरंबा पद्धतीचा अवलंब, विविध शासकीय योजनांचा लाभ, नवीन बी-बियाणांचा वापर, खतांची योग्य मात्रा, नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब या गोष्टींना प्राधान्य दिले. बचत गटातील ३० महिलांनी भाजीपाला लागवडीसाठी उपलब्ध १९ एकर जमिनीचा वापर केला. महिलांना भाजीपाला व्यवसायामध्ये बी-बियाणे, ठिबक तसेच तुषार सिंचन, रोपवाटिका यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून तीन लाख, आयसीआयसीआय बँकेकडून नऊ लाखांचे कर्ज उपलब्ध करून प्रगतिशील शेती करण्यास प्रारंभ केला. महिलांना शेतीमध्ये ठिबक तसेच तुषारसिंचन संच बसवून घेतले. तसेच नवीन बी-बियाणे, औषध फवारणी पंप, कटर इत्यादी आवश्यक बाबी खरेदी केल्या. या सर्व महिलांना माविमच्या पुढाकाराने तीन दिवसांचे भाजीपाला व्यवसायाचे  प्रशिक्षण देण्यात आले.

महिलांनी भाजीपाला उत्पादनात वेळोवेळी योग्य खतांचा मात्रा वापरल्यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारले व खतांवरील खर्च कमी झाला. तसेच त्यांच्या भाजीपाल्याला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जुगाई गाव विकास समितीच्या माध्यमातून व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आठवडी बाजार चालू करण्यात आला. त्यामुळे महिलांना भाजी विक्री करण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध झाली. इतर महिलांनाही गावामध्ये ताजा भाजीपाला मिळू लागला. त्यामुळे महिलांच्या उत्पादनात वाढ झाली. भाजीपाला व्यवसायातून महिलांना दरमहा सहा हजार रुपये उत्पन्न मिळू लागले.

srmanenews@gmail.com

(लेखक कोल्हापूर येथे माहिती अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 11, 2017 12:20 am

Web Title: women empowerment through vegetable production
Next Stories
1 डाळिंब विकावं तरी अडचण..
2 परसबागेची चळवळ..
3 कोकणातील भात पिकावर कीड, रोगांचे संकट
Just Now!
X